साप आणि खेकडा
एक साप आणि एक खेकडा एकमेकांचे मित्र होते. खेकडा सरळ वागणारा होता. त्याने सापाला चांगल्या रीतीने वागण्याचा खूप वेळा उपदेश केला, परंतु सापाने तिकडे लक्ष दिले नाही.
एके दिवशीसाप अंग ताणून विश्रांती घेत असताना खेकड्याने त्याला मारून टाकले व त्याच्याकडे बघून तो म्हणाला, 'तू आता जसा सरळ आहेस तसाच नेहमी राहिला असतास तर ही स्थिती कशाला झाली असती ?
तात्पर्य
- राजमार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणारा मनुष्य नेहमीच संकटात सापडतो.