सटवाई आणि पिसू
एका माणसास एक पिसू चावली, त्या वेदनेनं त्याला इतकं दुःख झालं की त्या पिसूचा नायनाट करण्यासाठी त्याने सटावाईची प्रार्थना केली. इतक्यात ती पिसू उडून गेली ते पाहून तो मनुष्य म्हणाला,
'देवी, पिसवेसारख्या क्षुल्लक प्राण्याला मारण्यासाठी देखील तू मला मदत करत नाहीस, तर मोठ्या शत्रूशी सामना करण्याचा प्रसंग आल्यास तू काय मदत करणार ?'
तात्पर्य
- अगदी क्षुल्लक गोष्टीसाठी देखील देवाकडे गार्हाणे सांगणे, हा मूर्खपणा होय.