पशु, पक्षी आणि शहामृग
एकदा पशु आणि पक्षी यांच्यात मोठी लढाई चालली होती. तेव्हा पक्ष्यांनी शहामृगाला पकडून नेले व त्याला शिक्षा करू लागले. तेव्हा शहामृग म्हणाले, 'मित्रांनो, मी पशु नाही. मी पक्षीच आहे. हे पहा माझे पंख आणि ही पहा चोच.' पक्ष्यांना वाटले, खरेच हा तर पक्षी आहे म्हणून त्यांनी त्याला सोडून दिले.
यानंतर पशूंनी त्याला पकडून नेले आणि त्याला काय शिक्षा करावी त्याचा विचार करू लागले. तेव्हा शहामृग म्हणाला, 'मित्रांनो, मी पक्षी नाही, पशूच आहे. हे पहा, माझे पाय तुमच्याच पायांसारखे आहेत!'
पशूंना ते खरे वाटले आणि त्यांनीही त्याला सोडून दिले.
तात्पर्य
- आपण दोन्ही बाजूंचे आहोत असे भासविणे कधी कधी फायदेशीर ठरते.