देव आणि प्रवासी
एकदा एक मनुष्य प्रवास करीत असता, त्याच्या मनात देवाची थट्टा करावी असे आले व त्याने आपल्याला काय मिळेल त्याचा अर्धा हिस्सा देवास देऊ, असा नवस केला. पुढे दुसर्या प्रवाशाची एका खारकांची पिशवी त्याला सापडली. तेव्हा त्याने त्यातील सगळ्या खारका स्वतः खाल्ल्या व त्यांच्या बिया नेऊन त्या देवापुढे ठेवून तो म्हणाला,
'देवा, मी नवस केल्याप्रमाणे माझ्या मिळकतीतला अर्धा वाटा तुझ्यापुढे ठेवला आहे.'
तात्पर्य
- नुसते शब्द फिरवून देवालाही फसवू पहाणारे काही लबाड लोक असतात.