Get it on Google Play
Download on the App Store

कोंबडा, कुत्रा आणि कोल्हा

एक कोंबडा आणि एक कुत्रा प्रवास करीत होते. एकदा रात्र पडल्यावर कोंबडा एका वृक्षावर चढून बसला. आणि कुत्रा बुंध्यापाशी झोपी गेला. सकाळी उठल्यावर कोंबडा जोरात आरवला. ते ऐकून एक कोल्हा तेथे आला व त्याला म्हणाला, 'अरे, तुझा स्वर किती मधुर आहे. तुझं गायन ऐकून मला, तुला अगदी कडकडून भेटावस वाटतं आहे,.' तेव्हा त्याच्या बोलण्यातली लबाडी लक्षात येऊन कोंबडा म्हणाला, 'मित्रा, खाली जो पहारेकरी झोपला आहे, त्याला जागा करून दरवाजा उघडायला सांग. म्हणजे मी खाली येतो.'

हे बोलणे खरे वाटून कोल्ह्याने कुत्र्यास उठविले. कुत्रा जागा झाला अन् ताबडतोब त्याने कोल्ह्याला मारून टाकले.

तात्पर्य

- काही काही वेळा सामान्य लोकांकडूनही लबाड माणसाची फजिती होते.

इसापनीती चरित्र आणि कथा १-५०

इसाप
Chapters
श्लोक १२ वा अनंत-स्तोत्र इसापचे चरित्र कोल्हा, रानमांजर आणि ससा सिंह, लांडगा आणि कोल्हा धनगर आणि लांडग्याचे पिलू डोमकावळा आणि साप दुर्दैवी जोडपे कावळा आणि कुत्रा कोल्हा आणि खेकडा लांडगा आणि कोकरू माकड आणि मासा मुलगा आणि चणे मुंगीची उत्पत्ती मूर्ख गवई पाकोळी आणि कावळा पाणबुडा पक्षी पाणी गढूळ करणारा कोळी डुक्कर आणि लांडगा गाढव, माकड आणि चिचुंद्री गाढव आणी निर्दय मालक गरुड व घुबड झाड आणी कुर्‍हाडीचा दांडा कावळा आणि कालव रानडुक्कर आणि गाढव सिंह आणि गाढव उंदीर आणी चिचुंद्री पशु, पक्षी आणि शहामृग पिंगळा आणि कावळा राजहंस आणि डोमकावळा साप आणि खेकडा साळुंकी आणि कवडा ससे, कोल्हे आणि गरुड शेजारी बेडूक वाघूळ, काटेरी झाड आणि समुद्रपक्षी गाढव आणि कावळा भविष्यवादी देव आणि नास्तिक मनुष्य देव आणि प्रवासी धनगर व्यापारी झाला होता दोन कोंबडे गाढव आणि लांडगा गप्पीदास गरुड आणि मनुष्य घोडा आणि रानडुक्कर होडीतील दोन प्रवासी जुने झाड उपटून पुन्हा लावले करडू, बोकड आणि लांडगा कवडा आणि कोंबडा खाटीक आणि कुत्रा कोल्हा आणि कोंबडा कोल्हा आणि वानर कोल्ही आणि सिंहीण निराश झालेले कोळी कुत्रा आणि लांडगा लहान मासा मोठा मासा लांडगा आणि सिंह म्हातारे मांजर आणि उंदीर मनुष्य आणि त्याचा लाकडी देव मोलकरीण आणि कोंबडी दोघे मुलगे आणि दुकानदार मुरलीवाला कोळी पारधी आणि पारवा पोपट आणि चिमणी प्रवासी आणि ज्योतिषी रानमांजर आणि वाघूळ शेळी, करडू आणि लांडगा शेळी आणि कावळा शेतकरी आणि बकरे शेतकरी आणि त्याचे मुलगे सिंह आणि बैल उंटाचे प्रथमदर्शन वैद्य आणि रोगी गांधीलमाशा आणि मधाची कुपी चिचुंद्री व तिची आई दारुबाज नवरा दोन बेडूक डुकरी आणि मांजरी गांधीलमाशा, कवडे आणि शेतकरी खंडोबा आणि सर्प कोळी व त्याचे दैव कोंबडा, कुत्रा आणि कोल्हा माळी आणि त्याचा कुत्रा मनुष्य आणि पिसू म्हातारी आणि वैद्य मुलगा आणि साप गाणारा पक्षी आणि वाघूळ पारधी आणि भारद्वाज पारधी आणि कवडा सटवाई आणि पिसू सिंह गाढव आणि कोंबडा सिताफळ, रामफळ आणि अंजीर वानरी आणि तिची पोरे उंदीर आणि बेडूक सूर्य आणि वायु सिंह आणि हत्ती सिंह आणि गाढव सिंहाचे कातडे पांघरलेले गाढव सिंह आणि बोकड उंदीर आणि वडाची फळे सुभेदार व त्याचा घोडा शिंपले शेतकरी आणि उंदीर