गांधीलमाशा, कवडे आणि शेतकरी
काही गांधीलमाशा आणि कवड्यांना एकदा भयंकर तहान लागली म्हणून ते एका शेतकर्यापाशी गेले आणि त्यांनी पिण्यासाठी पाणी मागितले. त्या बदल्यात कवडयांनी त्याचे शेत उकरून देण्याचे कबूल केले आणि गांधीलमाशांनी चोरापासून शेताचे रक्षण करण्याचे कबूल केले. परंतु शेतकरी म्हणाला, 'ही दोन्ही कामं माझे बैल नि कुत्रे करतील. तेव्हा त्यांच्या खाण्यापिण्याची सोय मला आधी बघितली पाहिजे.'
तात्पर्य
- जवळच्या माणसास उपाशी ठेवून इतरांस तृप्त करणे हे व्यवहार्य नाही.