गाणारा पक्षी आणि वाघूळ
एकदा एका पिंजर्यातील पक्षी रात्रीचा गाऊ लागला. ते ऐकून एक वाघूळ तेथे आले व म्हणाले, 'अरे, तू रात्रीऐवजी दिवसा कां गात नाहीस?'
तेव्हा तो पक्षी म्हणाला, 'मी एकदा दिवसा गात असताना पकडला गेलो, तेव्हापासून मी रात्रीचा फक्त गातो. यावर वाघूळ म्हणाले, 'हा विचार तू आधी करायला हवा होतास. आता तर तू पिंजर्यातच आहेस तेव्हा तुला कोण पकडणार?'
तात्पर्य
- जी गोष्ट एकदा घडून गेली, ती टाळण्याचा प्रयत्न मागाहून करून काही उपयोग नाही.