प्रवासी आणि ज्योतिषी
एकदा एक ज्योतिषी दुर्बिणीने आकाशातल्या तार्यांचे निरीक्षण करीत जात असता चुकून खड्ड्यात पडला. ते एका प्रवाशाने पाहिले. तो त्याला म्हणाला, 'मित्रा, आकाशातल्या तार्यांचे मार्ग ठरलेले आहेत. त्या मार्गांनी ते खुशाल येतील जातील. पण आपलं मात्र तसं नाही. आपल्या मार्गात खाचखळगे आहेत. तेव्हा त्या तार्यांचे वेध घेण्यापेक्षा ह्या खळग्यांकडेच विशेष लक्ष देणं योग्य नाही का?
तात्पर्य
- दुसर्यास उपदेश करणारे पण स्वतः त्याप्रमाणे न वागणारे लोक मूर्ख असतात.