झाड आणी कुर्हाडीचा दांडा
एक लाकूडतोड्या रानातले एक मोठे झाड कुर्हाडीने तोडत होता. त्यामुळे त्या झाडास खूप वेदना होऊ लागल्या. तेव्हा ते झाड दुःखाने म्हणाले, 'काय ही माझी स्थिती ! हा माणूस किंवा ही कुर्हाड करते आहे ते काही चूक नाही. पण माझ्याच शरीरापासून बनवलेला हा कुर्हाडीचा दांडा मात्र मलाच मारायला मदत करतो आहे, याचं फार वाईट वाटतं.'
तात्पर्य
- आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यावर संकट आणावे, यासारखी दुःखदायक गोष्ट नाही.