Get it on Google Play
Download on the App Store

"# शब्द शुद्धी"

मराठी भाषकांचे राज्य म्हणून १९६० साली महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर,अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुरस्कृत केलेल्या मराठी लेखनविषयक चौदा नियमांना महाराष्ट्र शासनाने १९६२ साली मान्यता दिली. पुढे १९७२ मध्ये आणखी चार नवीन नियमांची भर घालून पूर्वीच्या नियमांतील त्रुटी महामंडळाकडून दूर करण्यात आल्या. अ. भा. मराठी साहित्य महामंडळ हे महाराष्ट्रातील साहित्य संस्थांचे प्रातिनिधिक मंडळ असल्यामुळे त्याने केलेल्या नियमावलीला महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिली आणि राज्यकारभारात व शिक्षणाच्या सर्व क्षेत्रांत तिचे पालन करण्याचे ठरविले. 

हे नियम पुढीलप्रमाणे आहेत-

(A)-अनुस्वार

(नियम १) 

नियम १.१-स्पष्टोच्चारित अनुनासिकाबद्दल शीर्षबिंदू द्यावा: उदाहरणार्थ: गुलकंद, चिंच, तंटा, आंबा

नियम १.२- तत्सम शब्दातील अनुनासिकाबद्दल विकल्पाने पर-सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.मात्र अशा वेळी अनुस्वारानंतर येणाऱ्या अक्षराच्या वर्गातील अनुनासिकच पर-सवर्ण म्हणून वापरावे. उदाहरणार्थ: 'पंकज=पङ्कज', पञ्चानन, पंडित=पण्डित, अंतर्गत=अन्तर्गत, अंबुज=अम्बुज.

नियम १.३- पर-सवर्ण लिहिण्याची सवलत फक्त तत्सम शब्दांपुरती मर्यादित आहे. संस्कृत नसलेले मराठी शब्द शीर्षबिंदू (अनुस्वार) देऊनच लिहावेत. उदाहरणार्थ: 'दंगा, झांज, बंड, खंत, संप' हे शब्द 'दङ्गा, झाञ्ज, बण्ड, खन्त, सम्प' असे लिहू नयेत.

नियम १.४- अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी कधीकधी पर-सवर्ण जोडून शब्द लिहिणे योग्य ठरते. उदाहरणार्थ: वेदांत=वेदांमध्ये, वेदान्त= तत्वज्ञान, देहांत=शरीरांमध्ये, देहान्त= मृत्यू.

नियम १.५- काही शब्दांमधील अनुस्वारांचा उच्चार अस्पष्ट असतो. कधीकधी तो उच्चारलादेखील जात नाही. अशा शब्दांवर अनुस्वार देऊ नये. उदाहरणार्थ: 'हंसणे, धांवणे, जेव्हां, कोठें, कधीं, कांही' हे शब्द 'हसणे, धावणे, जेव्हा, कोठे, कधी, काही' असे लिहावेत.

(नियम २) 

नियम २.१- य्, र्, ल्, व्, श्, ष्, स्, ह् यांच्यापूर्वी येणाऱ्या अनुस्वारांबद्दल केवळ शीर्षबिंदू द्यावा. 'ज्ञ' पूर्वीचा नासोच्चारही केवळ शीर्षबिंदूने दाखवावा. उदाहरणार्थ: संयम, संरचना, संलग्न, संवाद, दंश, दंष्ट्रा, मांस, सिंह, संज्ञा' हे शब्द 'संय्यम, संव्रचना, संल्लग्न, संव्वाद, दंव्श, दंव्ष्ट्रा, मांव्स, सिंव्ह, संव्ज्ञा' असे लिहू नयेत.

(नियम ३)

 नियम ३.१ नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. उदाहरणार्थ: लोकांना, मुलांनी, तुम्हांस, लोकांसमोर, घरांपुढे.

 नियम ३.२ आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे. उदाहरणार्थ: राज्यपालांचे, मुख्यमंत्र्यांचा, तुम्हांला, आपणांस, शिक्षकांना, अध्यक्षांचे.

(नियम ४) 

अनुस्वार वरील नियमांव्यतिरिक्त कोणत्याही कारणांसाठी - व्युत्पत्तीने सिद्ध होणारे वा न होणारे - अनुस्वार देऊ नयेत. या नियमानुसार 'घंरे, पांच, करणें, काळीं, नांव, कां, कांच, जों, घरीं' हे शब्द 'घरे, पाच, करणे, काळी, नाव, का, जो, घरी' असे लिहावेत.

(B)-ऱ्हस्व-दीर्घ नियम

(नियम ५) 

नियम५.१- मराठीतील तत्सम इ-कारान्त आणि उ-कारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. उदाहरणार्थ : कवि=कवी, बुद्धि=बुद्धी, गति=गती. 
इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा.  उदाहरणार्थ: पाटी, जादू, पैलू

नियम५.२- 'परंतु, यथामति, तथापि', ही तत्सम अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.

नियम ५.३- व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे ऱ्हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत. उदाहरणार्थ: हरी, मनुस्मृती, वर्गीकरण, पद्धती, कुलगुरू.

नियम ५.४- 'आणि' व 'नि' ही मराठीतील दोन अव्यये ऱ्हस्वान्त लिहावीत.

नियम ५.५- सामासिक शब्द लिहिताना समासाचे पूर्वपद (पहिला शब्द) तत्सम ऱ्हस्वान्त असेल (म्हणजेच मुळात संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असेल) तर ते पूर्वपद ऱ्हस्वान्तच लिहावे. दीर्घान्त असेल तर दीर्घान्तच लिहावे. उदाहरणार्थ: बुद्धि -बुद्धिवैभव, लक्ष्मी -लक्ष्मीपुत्र.
साधित शब्दांनाही हाच नियम लावावा. उदाहरणार्थ: बुद्धि-बुद्धिमान, लक्ष्मी-लक्ष्मीसहित.

नियम ५.६- 'विद्यार्थिन्, गुणिन्, प्राणिन्, पक्षिन्' या सारखे इन्-अन्त शब्द मराठीत येतात तेव्हा त्यांच्या शेवटी असलेल्या न् चा लोप होतो व उपान्त्य ऱ्हस्व अक्षर दीर्घ होते. परंतु हे शब्द समासात पूर्वपदी आले असता (म्हणजेच समासातील पहिला शब्द असता) ते ऱ्हस्वान्तच लिहावेत.  उदाहरणार्थ: विद्यार्थिमंडळ , गुणिजन, प्राणिसंग्रह, स्वामिभक्ती, पक्षिमित्र, योगिराज.


(नियम ६)

मराठी शब्दातील शेवटचे अक्षर दीर्घ असेल तर त्याचा उपान्त्य (म्हणजेच शेवटच्या अक्षराच्या अलीकडचा) इकार किंवा उकार ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ: किडा, विळी, पिसू, इथे, निघो, फुगा, खुनी, सुरू, कुठे, उठो. 
मात्र तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. तत्सम शब्दातील उपान्त्य इकार किंवा उकार मुळाप्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ: पूजा, गीता, अनुज्ञा, दक्षिणा

 (नियम ७)

नियम ७.१-मराठी अ-कारान्त शब्दाचे उपान्त्य इकार व उकार दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ: कठीण, नीट, रतीब, विहीर, ऊस, चिरूट, तूप, मूल.
तत्सम(मुळात संस्कृत असलेल्या) अ-कारान्त शब्दांतील उपान्त्य इकार व उकार मुळ प्रमाणे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ: गणित, विष, गुण, मधुर, दीप, न्यायाधीश, रूप, व्यूह

नियम ७.२- मराठी शब्दांतील अनुस्वार,विसर्ग,किंवा जोडाक्षर, यांच्या पूर्वीचे इकार व उकार सामान्यत: ऱ्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ: चिंच, डाळिंब, भिंग, खुंटी, पुंजका, भुंगा, छि:, थु:, किल्ला, भिस्त, विस्तव, कुस्ती, पुष्कळ, मुक्काम.
परंतु तत्सम शब्दांत ते मुळाप्रमाणे ऱ्हस्व, किंवा दीर्घ लिहावेत. उदाहरणार्थ: अरविंद, चिंतन, कुटुंब, चुंबक, नि:पक्षपात, नि:शस्त्र, चतू:सूत्री, दु:ख, कनिष्ठ, मित्र, गुप्त, पुण्य, ईश्वर, नावीन्य, पूज्य, शून्य.

(नियम ८)

नियम ८.१- उपान्त्यी दीर्घ ई किंवा ऊ असलेल्या मराठी शब्दांचा उपान्त्य ई-कार किंवा ऊ-कार उभयवचनी सामान्यरूपांच्या वेळी ऱ्हस्व लिहावा. उदाहरणार्थ: गरीब-गरिबाला,गरिबांना,चूल-चुलीला,चुलींना.
अपवाद-दीर्घोपान्त्य तत्सम शब्द. उदाहरणार्थ:परीक्षा-परीक्षेला, परीक्षांना, दूत-दूताला, दूतांना.

नियम ८.२-  मराठी शब्द तीन अक्षरी असून त्याचे पहिले अक्षर दीर्घ असेल तर अशा शब्दाच्या सामान्यरूपात उपान्त्य ई-ऊ यांच्या जागी 'अ' आल्याचे दिसते. उदाहरणार्थ: बेरीज-बेरजेला,बेरजांना,लाकूड-लाकडाला,लाकडांना. 
मात्र पहिले अक्षर र्‍ह्स्वअसल्यास हा 'अ' विकल्पाने (पर्यायी) होतो. उदाहरणार्थ: परीट-पर(रि)टास,पर(रि)टांना

नियम ८.३- शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर अशा शब्दाच्या उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'ई' च्या जागी 'य' आणि 'उ' च्या जागी 'व' असे आदेश होतात. उदाहरणार्थ: काईल-कायलीला,देउळ-देवळाला,देवळांना

नियम ८.४ -पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास त्या जागी उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो.('श्या' होत नाही) उदाहरणार्थ: घसा-घशाला,घशांना,ससा-सशाला,सशांना

नियम ८.५- पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'जा' असल्यास उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी तो तसाच राहतो (त्याचा 'ज्या' होत नाही.) उदाहरणार्थ: दरवाजा- दरवाजाला,दरवाजांना; मोजा-मोजाला,मोजांना.

नियम ८.६- तीन अक्षरी शब्दातील मधले अक्षर 'क' चे किंवा 'प' चे द्वित्व असेल तर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हे द्वित्व नाहीसे होते. उदाहरणार्थ: रक्कम-रकमेला,रकमांना; छप्पर-छपराला,छपरांना

नियम ८.७-  मधल्या 'म' पूर्वीचे अनुस्वारसहित अक्षर उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी अनुस्वारविरहित होते. उदाहरणार्थ: किंमत-किमतीला,किमतींना; गंमत-गमतीला,गमतींचा

नियम ८.८ ऊ-कारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही. उदाहरणार्थ: गणू-गणूस; दिनू-दिनूला.

नियम ८.९-  धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' आणि 'वून' अशी रूपे होतात.पण धातूच्या शेवटी 'व' नसेल तर 'ऊ' किंवा 'ऊन' अशी रूपे होतात  उदाहरणार्थ: धाव-धावू,धावून; गा-गाऊ,गाऊन; कर-करू,करून.


(C) किरकोळ (इतर) नियम

(नियम ९) 

पूर हा ग्रामवाचक कोणत्याही ग्रामनामास लावताना दिर्घोपान्त्य लिहावा. उदाहरणार्थ : नागपूर,तारापूर,सोलापूर

(नियम १०) 

"कोणता,एखादा' ही रूपे लिहावीत. 'कोणचा,एकादा' ही रूपे लिहू नयेत.

(नियम ११) 

'खरीखरी,हळूहळू' यासारख्या पुनरुक्त शब्दांतील दुसरा व चौथा हे स्वर मूळ घटक शब्दांमध्ये ते दीर्घ असल्याने ते दीर्घ लिहावेत, परंतु पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे ऱ्हस्व लिहावेत. उदाहरणार्थ: दुडुदुडु,रुणुझुणु,लुटुलुटु.

(नियम १२) 

एकारान्त नामाचे सामान्यरूप या-कारान्त करावे.ए-कारान्त करू नये. उदाहरणार्थ : करणे-करण्यासाठी,फडके-फडक्यांना.

(नियम १३) 

लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी लागते.त्या वेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे अनुस्वारयुक्त असावे. उदाहरणार्थ: 'असं केलं , मी म्हटलं;त्यांनी सांगितलं अन्य प्रसंगी ही रूपे ए-कारान्त लिहावीत. उदाहरणार्थ : असे केले;मी म्हटले;त्यांनी सांगितले

(नियम १४)  

'क्वचित्, कदाचित्,अर्थात्,अकस्मात्,विद्वान्,' यांसारखे मराठीत रूढ झालेले तत्सम शब्द अ-कारान्त लिहावेत.  उदाहरणार्थ : 'क्वचित, कदाचित,अर्थात,अकस्मात,विद्वान,'
कोणत्याही अन्य भाषेतील शब्द लिहिण्याची गरज पडेल तेव्हा त्या भाषेतल्या उच्चाराप्रमाणे लेखन करावे.  उदाहरणार्थ : 'डिक्शनरी,ब्रिटिश,हाऊस.
इंग्रजी शब्द ,पदव्या किंवा त्यांचे संक्षेप यांच्या शेवटचे अक्षर आता व्यंजनान्त म्हणजे पाय मोडके लिहू नये.  उदाहरणार्थ :'एम.ए. , पीएच.डी., अमेरिकन,वॉशिंग्टन .

(नियम १५)

 केशवसुतपूर्वकालीन पद्य व विष्णुशास्त्री चिपळूणकरपूर्वकालीन गद्य यांतील उतारे छापताना ते मुळानुसार छापावेत तदनंतरचे (केशवसुत व चिपळूणकर यांच्या लेखनासह) लेखन 'अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या प्रस्तुत लेखन नियमांस अनुसरून छापावे.
केशवसुतांचा काव्यरचना काल १८८५ -१९०५
चिपळूणकरांचा लेखनकाल १८७४-१८८२

(नियम १६) 

राहणे, पाहणे, वाहणे अशी रूपे वापरावीत 'रहाणे, राहाणे, पहाणे, वहाणे, वाहाणे, अशी रूपे वापरू नयेत. आज्ञार्थी प्रयोग करताना मात्र 'राहा, पाहा, वाहा' या बरोबरच 'रहा, पहा, वहा' अशी रूपेही वापरण्यास हरकत नाही.


खाली दिलेले शब्द जसे दिले आहेत तसेच लिहावेत:

माहिती पाहिजे पाहिला पाहिले राहिले लिहिला लिहिलेले पाहिलेला पलीकडे , राहवले नाही, निघाला पाहता सातही दिवस दिवसाला मिळेल विजेच्या वीज
नेहमी येऊन घेऊन घेऊन जाऊन  तिचा तिचं तिच्या तिने तिघे जेवताना असताना नसताना विसरत येताना इतरच कुतूहलमिश्रित वळून 
आधुनिक पिढीसाठी गृहीत डयूटी रुपये चेहरा येऊ का?  दीड मध्यभागी हालणे हालू लागला यू (तू) , वैचारिक काहीतरी खूप सुचले
किरकिरा तरीही शुद्धिचिकित्सक महती आणि जिवंत यूके यूएस कुतूहल भारीत कौटुंबिक चिकित्सेची चिकित्सा कृपया तुम्ही सुधारल्यानंतरच 
सूचना पुसावी. शुद्धलेखन सुधारण्याविषयी  तर त्या स्वतंत्र लेखाचे स्वरूपात शुद्धलेखनाच्या सर्व चुका  मांडाव्या प्रशासक नाइट नेटवर्किंग मेसेज नथिंग
सीरियस बिल्डिंगच्या अ‍ॅक्टिव्हिटी मिनिट नेटवर्किंग मोबाइल जीन्स तुम्हाला काही अडचणी/सुचवणी असतील बाइक चॅटिंग कीबोर्ड फाइल सुगम सुगरण सुंदर सुरक्षित सुलभ सुवासिक सूर्य उदा. सूर्यप्रकाश
अडविणे अडवणूक  किरण उदा. सूर्यकिरण पूर्व मुळाक्षर भरपूर भावी भूक माहिती उदा. मूळ उदा. झाडाची मुळे मौसमी रूप उदा. स्वरूप आणि लिखाण सुपूर्त करावे. 

वाचनस्तु

Nimish Navneet Sonar
Chapters
""पुस्तके कशाला वाचायची?"" ""माझा वाचक मित्र आणि मी"" "@दिवाळी अंक लेख २०१६: आम्ही सोशल सोशल!" "# Similar Words Different Meanings" "# महासुविचारांचा महासंग्रह" "# शब्द शुद्धी" "कविता संग्रह" (निसर्ग) "कविता संग्रह" (प्रेम) "कविता संग्रह" (राजकारण) "कविता संग्रह" (विडंबन) "कोडे संग्रह" "ग्राफिटी" "चारोळी संग्रह" "धम्मक लाडू" "नाही" चा महिमा! "हलके फुलके" [शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य" @बॉलीवूड बाईट्स <जगावं तरी कसं?> 4 महत्वाचे प्राणायाम अनुभव: त्यानंतर असे झाले असेल तर अनुभव: फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान! अनुभव: सावधान!!! पुढे "माहितीचा धोका" आहे!! कथा: अपूर्ण स्वप्न कथा: असा डाव उलटला कथा: आघात कथा: जलजीवा कथा: बाबाजार कथा: रशियन एजंट ज्याने जगाला वाचवले कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य कथा: शापित श्वास कथा: शिकारी साखळी कथा: सवाशेर तडका कथा: हेल्मेट कॉमेडी: 'कोलावरी डी' चे विडंबन कॉमेडी: 'सांगू काय' गाण्याचे विडंबन कॉमेडी: अजब महिलांदोलन कॉमेडी: अफलातून जाहीराती कॉमेडी: आनंद आणि अंत कॉमेडी: कौन बनेगा हास्यपती कॉमेडी: क्रांतीकारी कुटुंब कॉमेडी: गोलू गलबले कॉमेडी: चित्रमानपत्र कॉमेडी: दबंग बाम कॉमेडी: धृतराष्ट्र का लैपटॉप कॉमेडी: नको तेव्हा नको तिथे नको तेच... कॉमेडी: पुणेरी बसमधील सूचना कॉमेडी: फिल्मी नावांची गम्मत कॉमेडी: मार्जारी आगलावे कॉमेडी: मुद्राराक्षसाचे विनोद (पूर्ण संग्रह) कॉमेडी: मेमरी लॉस कॉमेडी: रजनीकांतचे सुपरहीट कारनामे कॉमेडी: सरपटणारे विनोद कॉमेडी: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई कॉमेडी:अशीही प्रस्तावना गूढकथा - आग्या वेताळ चित्रपट परीक्षणः २०१२ (एक मायावी सत्यानुभव) चित्रपट परीक्षणः क्रिश ३ चित्रपट परीक्षणः रजनीकांतचा रोबोट चित्रपट परीक्षण: अवतार चित्रपट परीक्षण: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय! चित्रपट परीक्षण: हनुमान रिटर्न्स- अदभुत कल्पनाशक्ती छोटा पडदा टीव्ही: ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी टीव्ही: मालिका- चक्रवर्तीन अशोक सम्राट! टीव्ही: स्टार प्लस - साईबाबा : अत्युत्कृष्ट मालिका टीव्ही: स्टार प्लसवरचे महाभारत नटसम्राट: एक ओझरता दृष्टीक्षेप! निमिष मूव्ही ट्वीस्ट (जरा गम्मत) पुस्तक परीक्षण: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली भटकयात्रा: ठेंगोडे चे जागृत सिद्धिविनायक मंदिर भटकयात्रा: प्रवासवर्णन पुस्तके लेख: "अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी" लेख: "गैर"समज! लेख: "गॉड पार्टीकल्स​" बिग बॅन्ग थेअरी? लेख: अक्सर जिंदा गद्दार डार्लिंग मर्डर लेख: अध्यात्म आणि विज्ञान: तुलना योग्य की अयोग्य? लेख: अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार लेख: उलटे समीकरण घातक! लेख: कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी! लेख: चर्चा नको? वाद हवा?? लेख: चित्रपटांची कैची लेख: चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेख: जीवनाची गाडी! लेख: झोपलेले बर्फ लेख: तर्कहीन सात गोष्टी आणि त्यांचे एकच वैज्ञानिक स्पष्टीकरण? लेख: तुलनेचा तराजू लेख: दांभिक लोक कसे ओळखावेत? लेख: नात्यातले लहान मोठे लेख: निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा || लेख: निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!! लेख: नेहेमीची वाट लेख: पाश्चात्य संस्कृती- भौगोलिक की प्रतीकात्मक? लेख: पैसोबा पुराण लेख: पोस्टर वरचे उजवे डावे लेख: प्रत्येक नात्याचा पाया- संवाद आणि सुसंवाद! लेख: प्रेरणादायी प्रकाश लेख: बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा लेख: भाकरीचा चंद्र लेख: भारत का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश? लेख: भारतीय पादचारी बनणार क्रिश लेख: भारतीय संस्कृतीची विरोधाभासी शिकवण लेख: मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता लेख: महाभारताचे जीवन सार लेख: मानवी स्पंज आणि स्प्रिंग! लेख: मुलगा मुलगी हक्क कर्तव्य लेख: मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!! लेख: यशाची ९ सूत्रे लेख: यशाची प्रभावी दशसूत्री!! लेख: यशाचे सूत्र- वॉच गॉड लेख: रिंगटोन्सच्या राज्यात लेख: विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य लेख: विश्वातील पहिला सजीव आणि निर्जीव कोण? लेख: श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी लेख: संकटकाळी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांचे काम? लेख: सकारात्मक दृष्टीकोन लेख: सकारात्मक भाषा लेख: समान "वाटा" हवा? लेख: सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत का? लेख: सर्वेक्षण आणि ज्योतिष लेख: सासू ही आई का होवू शकत नाही? लेख: सासू-सून-नणंद-जावा-भावजयी लेख: स्त्री-पुरुष समानता आणि कायद्यातील विषमता लेख: स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ? लेख: हीएइ ह्योए ह्याई हीयेहे सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका शाहरुखचा "राईस" सोनी टीव्हीवरील पेशवा बाजीराव मालिकेबद्दल live चर्चा डोंबिवली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अफलातून जाहिराती: आमचे शिमेंट सर, मी बँकेतून बोलतेय! कॉपी कॅट बिस्किट्स राजा राणी गुलाम ब्रेकिंग न्यूज: "जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद: काही विचार (#Nimishtics) सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा! वर्तमानपत्र की जाहिरातपत्र? अमिताभ - तेव्हा आणि आता चारोळ्यांचे चांदणे टीका आणि प्रशंसा - एक आढावा! पुस्तक परीक्षण: "माझं काय चुकलं?" मराठी बोला चळवळ बॉलीवूड बाईट्स कलर गीतानो - संगीत प्रेमींनी हे जरूर वाचा!