लेख: जीवनाची गाडी!
जीवनाच्या गाडीत प्रबळ इच्छाशक्तीचे इंधन टाका.
या इंधनाची टाकी कधीही रिकामी होवू देवू नका.
सकारात्मक विचारसरणीचे हॅण्डल तुम्हाला जीवनात योग्य मार्गावर नेण्यास मदत करेल.
समस्यांच्या अंधारात आशेचा हेडलाईट नेहेमी चालू ठेवा.
उदंड उत्साहाची दोन्ही चाके अखंड फिरु द्या.
शरीराचे व मनाचे मशीन नीट टिकण्यासाठी योग्य आहार, व्यायाम हे सर्व्हिसिंग आणि मनोरंजनाचे, सुविचारांचे ऑईलींग नियमीत द्या.
नकारात्मक विचार आणि वाईट सवयी यांचा धूर हवेत विरून जावू द्या.
वाईट कृत्य आणि मोह असणार्या रस्त्याकडे जाण्याची इच्छा झाल्यास संयमाचा ब्रेक लावा.
जीवनात अचानक येणारी बदलांची वळणे घाई न करता हळू पार करा.
संकटांचे स्पीड ब्रेकर समोर आल्यास आधीच वेग हळू करा, संयमाने संकटाचा सामना करा. त्या संकटाचा वेगाने आणि अविचाराने सामना केल्यास आदळून आपटण्याची शक्यता असते.
आपले अंतर्मन वेळोवेळी जे हिरवे-पिवळे-लाल सिग्नल देवून आपल्याला सावध करते, ते नेहेमी पाळा.
अशी ही जीवनाची गाडी जीवनाच्या शेवटापर्यंत निर्धोकपणे धावू द्या...