चारोळ्यांचे चांदणे
(मी year २०१७ आणि त्यानंतर लिहिलेल्या चारोळ्यांचा संग्रह आहे!)
27-मे-2017
पावसा पावसा ये लवकर
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार
तळं साचू दे अंगणभर
पड तू चांगला मुसळधार
ओसाड मन कर हिरवेगार
6-Jul-2017
विसरण्याची तुला
वेळ येते तोवर
का नियती आणते तुला
अचानक माझ्या समोर
वेळ येते तोवर
का नियती आणते तुला
अचानक माझ्या समोर
***
आपले मिलन शक्य नाही हे जाणून
जेव्हा येते तुला विसरण्याची वेळ
तेव्हा तुला पुन्हा पुन्हा माझ्या समोर आणून
का खेळते नियती असा भावनेशी खेळ
आपले मिलन शक्य नाही हे जाणून
जेव्हा येते तुला विसरण्याची वेळ
तेव्हा तुला पुन्हा पुन्हा माझ्या समोर आणून
का खेळते नियती असा भावनेशी खेळ