कॉमेडी: पुणेरी बसमधील सूचना
नव्या विनोद प्रकारात मी वेगवेगळ्या ठीकाणी लिहिलेल्या सुचना किंवा घोषवाक्ये किंवा वाक्ये एकत्र करून, तसेच त्यात आणखी मसाला टाकून त्यांची मिसळ करून तुम्हाला देणार... ती मिसळ खाल्ल्यावर तुम्हाला कसे वाटले जरूर कळवा!
या वेळेस मी बसमध्ये लिहिलेल्या वाक्यांची मिसळ बनवणार आहे.
•ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीशिवाय बस मागे घेवू नये.
•सुरुवातीच्या स्थानका व्यतिरीक्त प्रौढ महिलांना मागच्या दरवाज्यातून उतरणास मनाई आहे.
•चालत्या बसमधून उतरू नका. त्याने बसच्या ड्रायव्हरला धोका आहे.
•कंडक्टर आल्याशिवाय सीटवर बसू नका.
•डावीकडील आसनांवर बसणाऱ्या स्त्रीयांना उजवीकडे बसण्यास मनाई नाही
•पुरुषांना बसण्यास मनाई आहे. उभे राहाण्यास सुद्धा मनाई आहे.
•पहिली दोन आसने गरोदर स्त्रीयांसाठी राखीव. नसल्यास लहान बाळ असणाऱ्या स्त्रीयांसाठी राखीव. नसल्यास कुणीच बसू नये.
•तिकीट दिल्याशिवाय कंडक्टरला बसमध्ये चढू देउ नये.
•काचेवर ड्रायव्हरसाठी सूचनाः झेब्र्याने रस्ता क्रॉस केल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही.
•काचेवर ड्रायव्हरसाठी सूचनाः आज आमच्याकडून जास्तीत जास्त फक्त पाचच पादचारी मरतील अशी आम्ही शपथ घेतो.
•पुढच्या दरवाज्यातून मागे सरकत राहा.
•मागच्या दरवाज्यातून चढलेल्यांनी पुढून उतरू नये. त्याने इतर प्रवाशांना धोका आहे.
•बसच्या सिट खाली बघत राहावे, ते आपल्याच सुरक्षिततेसाठी आहे.
•धुम्रपानास मनाई नाही. धुरास आहे. पानास नाही.
•खिडकीच्या बाहेर शरिराचा कोणताही अवयव काढू नये. काढल्यास त्या अवयवाला घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची नाही.
•ऍक्सिडेंट झाल्यास ओरडू नये, शांत राहावे. ओरडुन काही साध्य होणार नाही.
•तिकीटाचे शक्यतो सुटे पैसे द्यावेत. नसल्यास पुढच्या दरवाज्याने हळूच उतरून जावे. ड्रायव्हर तोपर्यंत गाडी थांबवेल.
•कंडक्टर ला परत परत त्रास देवू नये.