लेख: नेहेमीची वाट
बऱ्याच तथाकथित आणि स्वयंघोषित बंडखोराना वाटते की जन्म, बालपण, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, मुले, त्याना मोठे करणे वगैरे गृहस्थाश्रम ही नेहेमीची आणि सोपी वाटचाल आहे. त्यात काय मोठे?
मग हे बंडखोर "वेगळी" वाट चोखाळतात:
कुणी लग्न करायचे नाही म्हणतो तर कुणाला मुले नको असतात.
कुणी हा "सरळ" रस्ता सोडून देतात आणि बंडखोरीचा आव आणत स्वत: ला हिम्मतवान म्हणवतात.
त्याना वाटते की आपण ही नेहेमीची सोपी वाट तोडली, समाजाचे नियम तोडले आणि "हिम्मत" केली....
बाकी त्या वाटेवर चालणारे भित्रे आहेत!! पण तसे नसते!!
ही नेहेमीची वाटणारी वाटच बिकट वाट असते.
त्यातच जास्त कसोटी असते.
ही नेहेमीची वाट चालणे कधीच सोपे नसते.
हे या बंडखोरांना माहित असते.
म्हणून ते या वाटेला जात नाहीत कारण त्यांच्यात हिम्मत नसते.
मग कुणी सन्यास घेतो आणि या वाटेपासून बचाव करतो तर कुणी काही दुसरे करतो आणि बचाव करतो....
या "सरळ" वाटणाऱ्या पण "कठीण" असणाऱ्या वाटेवर हिमतीने चालणाऱ्या सर्वांना माझा प्रणाम!!