कथा: सवाशेर तडका
एका न्यूज चैनेल चा फोटोग्राफर पाऊस न पडणाऱ्या एका भागात जातो.
पाऊस न पडल्याने चिंतेत असलेला एक शेतकरी आकाशाकडे खूप आशेने बघत असतो.
फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो.
फोटोग्राफर त्याचा फोटो काढतो. त्या शेतकऱ्याला खूप राग येतो. तो फोटोग्राफरच्या कानाखाली एक ठेवून देतो. त्याचा कैमेरा हिसकावून घेतो आणि भेग पडलेल्या जमिनीत टाकून देतो.
कैमेरा गेल्यामुळे फोटोग्राफर रडतो व शेतकऱ्याला मारायला धावतो. झाडामागून शेतकऱ्याचा मित्र बाहेर येतो आणि रडणाऱ्या व शेतकऱ्यावर हल्ला करणाऱ्या फोटोग्राफर चा फोटो काढतो व त्याच्या मित्राच्या न्यूज चैनेल ला पाठवतो.
शेतकरी म्हणतो: " काय रे तुम्ही सगळे माध्यम वीर !! लोकांच्या प्रत्येक भावनांशी खेळत राहाता आमच्या चेहेऱ्यावरची चिंता लाईव्ह कैच करून ती विकता तुम्ही? आणि छापता? तुम्हाला कुणाच्या भावनांशी घेणे देणे नाही. फक्त त्या भावना बंदिस्त करून ती विकण्यात तुम्हाला स्वारस्य असते, त्या भावनांशी तुम्ही स्वत:ला जोडत नाहीत. आणि हे सिद्ध झाले आहे जेव्हा तू मला मारायला धावलास!! हा तुझा फोटो कुठे छापुन येवू नये असे वाटत असेल तर येथून बऱ्या बोलाने चालता हो. पावसाचे काय करायचे ते मी पाहून घेईन."