Get it on Google Play
Download on the App Store

कॉमेडी: रजनीकांतचे सुपरहीट कारनामे

* रजनीकांत सफरचंदामधून आंब्याचा रस काढू शकतो.

* रजनीकांत कॉफी च्या बीयांपासून चहा बनवून पीतो.

* फार फार पूर्वी , रजनीकांतला चौकोनी पृथ्वी आवडली नव्हती, म्हणून त्याने पृथ्वीला गोल केले.

* रजनीकांत लाल रंगाच्या मदतीने बिल्डींगला पिवळा रंग देतो.

* रजनीकांतने पाठवलेला एस.एम्.एस. फॅक्स मशीन मधून बाहेर येतो.

* एकदा 'किंग कोब्र्याने' रजनीकांत ला दंश केला , ५ दिवसांनंतर 'किंग कोब्रा' मेला

* तुम्ही एका दगडात २ पक्षी मारत असाल तर तो एका पक्ष्याने २ दगड खतम करू शकतो.


* रजनीकांत मॉनिटर, सिपीयु, कीबोर्ड, माऊस, चार्जर या सगळ्यांना एकत्रीत सिलेक्ट करून डीलीट करु शकतो.

* जेम्स बॉण्ड जवळ कुणालाही मारण्याचे लायसन्स आहे, म्हणजे "लायसन्स टू किल एनीबडी" पण रजनिकांतजवळ "जेम्स बॉण्ड ला मारण्याचे लायसन्स" आहे.

* रजनीकांतला एकदा तो कोळी चावला जो स्पायडरमॅनला चावला होता. आज तो कोळी एकटा सहा कोळ्यांना पीटून काढतो.

* कांद्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल पण 'रजनीकांत' कांद्याच्या डोळ्यात पाणी आणू शकतो

* फक्त रजनिकांतच "मुक्ताफळ" खाऊ शकतो.

* रजनीकांत 'रिसायकल बिन' डिलीट करू शकतो

* रजनीकांत 'कॉर्डलेस फोन' च्या साह्याने गळफास देउ शकतो

* रजनीकांत पीयानो मधून 'व्हायोलीन' वाजवू शकतो

* तो खोलीत प्रवेश केल्यावर तेथील अंधार दूर करण्यासाठी तो लाईट चालु करत नाही, त्याऐवजी तो अंधार बंद करतो

* त्याला एकदा 'हार्ट-ऍटॅक' आला होता, तेव्हापासून त्याचे हृदय बेपत्ता आहे

* रजनीकांतच्या दिनदर्शीकेत १ एप्रील ही तारीख नाही , कारण त्याला कोणीच मुर्ख बनवू शकत नाही.

* तो आरश्यात पाहतो तेव्हा आरशाचे तुकडे होतात कारण दोन दोन रजनीकांतांच्या मध्ये आरश्याची हिंमत होत नाही

* जर 'ब्रेट ली' ताशी १५० किमी वेगाने चेंडू फेकत असला तरी रजनीकांत 'ब्रेट ली' ला त्यापेक्षा जास्त वेगाने फेकून देउ शकतो

* गणिती व्याख्येमध्या 'पाय' चा शेवटाचा अंक रजनीकांत आहे की ज्याला कधीच अंत नाही

* रजनिकांतला त्याचा शत्रू कुठे राहतो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही पण तो कुठे मरणार आहे हे 'रजनीकांत' ठरवतो.

* कुठल्याही बंदूकीची गोळी त्याचे शरीर भेदण्यास समर्थ नाही पण तो आरामात गोळीचे २ तुकडे करू शकतो

* 'अंपगांसाठी असलेल्य पार्कींगच्या जागेचा' खरा अर्थ 'हा रजनीकांत चा एरिया आहे तेव्हा येथे पार्कींग केल्यास तुम्ही अपंग होण्याची शक्यता आहे' असा आहे.


* जर तुम्ही 'गूगल सर्च' मध्ये रजनीकांतचे 'स्पेलींग' चूकीचे लिहले तर 'तुम्हाला रजनीकांत म्हणायचे आहे का ?' ह्या एवजी 'पळा, तुमच्याकडे अजून संधी आहे' असा संदेश येतो.


* आजचे सर्वोत्तम किटकनाशक ९९.९९% किटकांचा सफाया करण्याचा दावा करते, पण रजनीकांत ला जर कुणाला मारायचे असेल तर तो मरण्याची शक्यता केवळ १०० % च असते.

* 'जागतीक तापमान वाढ ' ही संकल्पना खोटी आहे, एकदा रजनीकांतला थंडी वाजत असल्याने त्यानेच 'सुर्याचे' तापमान वाढवले होते ते आता तसेच राहिले आहे.

* रजनीकांत रात्री 'भिंगाच्या' साह्याने आगपेटी पेटवतो.

* त्याने एकदा जोराने आरोळी ठोकून 'अमेरिकन फायटर प्लेन' पाडले होते.

* खोलीत असणाऱ्या कोणत्याही वस्तूने तुम्हाला रजनीकांत मारू शकतो , यात त्या खोलीचाही समावेश होतो.

* असे म्हणतात की 'प्रत्येक यशामागे एक स्त्री असते" , तर "प्रत्येक मारल्या गेलेल्या माणसामागे एकच रजनीकांत असतो".

* त्याला चालकाचा परवाना वयाच्या '१६ व्या सेकंदाला' मिळाला.

* दुख्खाचे वर्गमूळ रजनीकांत आहे पण जर तुम्ही त्याचा वर्ग करायला गेलात तर त्याचा परिणाम मृत्युच आहे.

* जर तुम्ही त्याला "नो बडी इज परफेक्ट" हे ऐकवले तर तो हा त्याचा वैयक्तीक अपमान मानून तुमच्यावर पुढील योग्य कारवाई करेल

* देव स्वर्गात राहतात कारण त्यांना रजनीकांत सोबत पृथ्वीवर राहणे परवडणार नाही.

* जेव्हा तो व्यायामासाठी 'पुश-अप्स' काढतो तेव्हा तो स्वताला वर उचलत नसून जमीनीला खाली ढकलतो

* त्याच्या पळण्याचा वेग प्रचंड आहे, तो कुठल्याही वस्तू भोवती जोरात गोल पळून स्वताच्या 'पाठीला धप्पा ' देउ शकतो

* तो घड्याळ घालत नाही, कारण तो स्वत: वेळ ठरवतो

* 'मोनालीसा'ने जेव्हा रजनीकांतला पाहिले तेव्हा तिच्या चेहऱ्यावर जगप्रसिध्ध हास्य उमटले

* त्याच्या घराला दारे/खिडक्या नाहीत , तो जाण्या-येण्यासाठी भिंतींचा वापर करतो

* कॉफी करताना तो कॉफीची पूड दाताने बारीक करून ती स्वताच्या अंगातल्या गरमीने गरम केलेल्या पाण्यात टाकतो

* गूगल-सर्च मध्ये 'रजनीकांत मार खाताना' शोधाचे "०" परिणाम येतात

* ईराकमध्ये कुठलेही अतिसंहारक शस्त्रे सापडली नाहीत कारण रजनीकांत चेन्नई मध्ये राहतो व ते भारतात आहे

* एकदा त्याने झोपेच्या गोळ्याची बाटली खाल्ली होती , त्यामुळे त्याला थोडी झोप आली.

गणपतीच्या घरी 10 दिवस रजनीकांतची स्थापना केली जाते.

संता आणि बंता हे दोघे रजनीकांतला 999 कोटी रुपये भेट देणार आहेत. टोकन मनी
म्हणून.. लोकांचं लक्ष त्यांच्यावरून उडवल्याबद्दल.

एकदा क्रिकेट खेळत असताना रजनीकांतने एक चेंडू फक्त स्थिर बॅटने नुसताच
तटवला.. आज त्या चेंडूला लोक प्लुटो या नावाने ओळखतात.

अशोक चव्हाणांना का जावे लागले? ते हल्ली ब-याच भाषणांमध्ये जाहीरपणे म्हणाले
होते, ‘रजनी कान्ट!’

एकटय़ाने समूहगीत कोण गाऊ शकतो?अर्थातच रावण यार! प्रत्येक गोष्ट रजनीकांत कसा
करेल?

रजनीकांतने एकदा ठरवलं की आपल्याकडचं किमान एक टक्का ज्ञान तरी जगाला द्यायचं..
त्यातूनच ‘गुगल’चा जन्म झाला.

एक ईमेल पुण्याहून मुंबईला पाठवलं गेलं.. रजनीकांतने ते लोणावळय़ातच अडवलं
म्हणे!

रजनीकांत एकदा चेन्नईमध्ये मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडला, दुपारी त्याला
अमेरिकन पोलिसांनी अटक केली.. बिना पासपोर्ट-व्हिसा अमेरिकेत प्रवेश
केल्याबद्दल.

एक भूत मध्यरात्री 12 वाजताच्या ठोक्याला दुस-या भुताला म्हणालं, ‘‘उगाच थरथर
कापू नकोस. वेडय़ासारखं घाबरू नकोस. हे सगळे मनाचे खेळ असतात. रजनीकांत वजनीकांत
जगात काहीही नसतं!’’

एक दिवस रजनीकांत सूर्याकडे एकटक पाहात राहिला.. शेवटी सूर्याचीच पापणी लवली.

‘रोबो’ सिनेमा हिट झाला, तेव्हा रजनीकांतने ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला चार स्टारचे
रेटिंग दिले.

देवाला जेव्हा जेव्हा मानसिक धक्का बसतो, तेव्हा तो ‘अरे रजनीकांता’ असे
उद्गारतो.

रजनीकांत घडय़ाळ घालत नाही. कोणत्याही वेळी किती वाजलेत, हे तोच ठरवतो.

त्सुनामी कशा तयार होतात..
अर्थातच, समुद्राच्या पोटात भूकंप झाल्यामुळे..
प्रत्येक गोष्ट रजनीकांत करेल की काय?

लहानपणी रजनीकांतची खेळणी एकदा हरवली.. ती जागा आज ‘एस्सेलवर्ल्ड’ म्हणून
प्रसिद्ध आहे.

न्यायदेवतेने एकदा रजनीकांतकडे क्रुद्ध नजरेने रोखून पाहिले होते.. ती
आजतागायत आंधळी आहे.

रजनीकांत खिडकी उघडी ठेवून एसी चालू करतो, तेव्हा देशात हिवाळा सुरू होतो.

रजनीकांतशी गप्पा मारताना.. राज ठाकरेही तामिळ बोलतात.

पॉवर ऑफ रजनीकांत! तुम्ही रजनीकांतचा जोक एका माणसाला फॉरवर्ड करता.. तो एका
तासात एक कोटी माणसांपर्यंत पोहोचतो.

इजिप्तमधील पिरॅमिड हे खरेतर रजनीकांतचे चौथीतले भूगोलाचे प्रोजेक्ट्स आहेत.

रजनीकांतचा फोन व्हायब्रेटर मोडवर असला, तरी कोयना धरणाला धोका नाही.
-कार्यकारी अभियंता, कोयना धरण विभाग

मुंबईतली वीज कधी कधी अचानक थोडय़ा वेळासाठी गायब होते.. कारण, तेव्हा
रजनीकांतने आपला फोन चार्जिगला लावलेला असतो.

रजनीकांतने एक दिवस शाळेला बुट्टी मारली.. शाळेने तो दिवस रविवार असल्याचे
जाहीर करून टाकले.

रजनीकांतला एकदा एका रिपोर्टरने विचारले, ‘‘मोबाइल आणि इंटरनेटवर फिरणाऱ्या
रजनीकांत जोक्सविषयी तुझं मत काय?’’ रजनीकांतने गंभीरपणे प्रतिप्रश्न केला, ‘‘
तुला खरंच वाटतं की ते काल्पनिक विनोद आहेत म्हणून?’’संता-बंता आत्महत्या करणार आहेत. रजनीकांतमुळे आपल्याकडे कुणी लक्षच देत नाही,
अशी त्यांची तक्रार आहे.रजनीकांत एका मुलाबरोबर पत्ते खेळत होता. रजनीकांतकडे तीन एक्के होते. तरीही तो
डाव हरला.. का?
कारण त्या मुलाकडे तीन
रजनीकांत होते.रजनीकांतच्या घरी मादाम तुसॉचा मेणाचा पुतळा आहे.प्रागैतिहासिक काळात डायनॉसोरांनी रजनीकांतकडून पैसे उसने घेतले होते, ते परतच
केले नाहीत.. तेव्हापासून आजतागायत डायनॉसोर कोणाला दिसलेले नाहीत.एकदा एका ट्रेनची सायकलशी टक्कर झाली आणि ट्रेन रुळावरून घसरली.. सायकलचालक
रजनीकांत फरारी झाला आहे.रजनीकांतने एकदा पाकिस्तानातल्या एका अतिरेक्याला ठार मारले.. भारतात बसून,
ब्लूटुथवरून.‘‘बेटा रजनीकांत आपल्या सोलर वॉटर हीटरमधून गार पाणी येतंय रे,’’ आईने ओरडून
सांगितले.
रजनीकांत तडक छतावर गेला आणि सूर्य दुरुस्त करून आला.रजनीकांतच्या गर्लफ्रेंडने एकदा त्याला सांगितलं, ‘‘मला सतत अशी भावना होते की
कुणीतरी माझा पाठलाग करतंय.’’
दुस-या दिवशी अचानक ती चित्कारली, ‘‘माय गॉड, माझी सावली कुठे गेली?’’प्राध्यापकाने एका मुलाला विचारले, ‘‘तुला भविष्यात काय करायचे आहे?’’
मुलगा उत्तरला, ‘‘एमबीबीएस झाल्यावर आयएएसची परीक्षा देऊन पोलिस फोर्समध्ये
जायचंय. नंतर चांगल्या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी करता करता उत्तम वकील म्हणून
नाव कमावायचंय. भव्य बिल्डिंग उभारून मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये संशोधन करून
नोबेल मिळवायचंय आणि अभिनयाचं ऑस्कर.’’
प्रोफेसर म्हणाले, ‘बाप रे, तुझं नाव काय?’’
‘‘सजनीकांत.. सन ऑफ रजनीकांत.’’‘‘आई आई, तो बघ तारा तुटला!’’
‘‘नाही रे बाळा, आजकाल काही भरवसा नाही. रजनीकांतने एखादा दगड फेकून मारला असेल
सूर्याला नाहीतर चंद्राला!’’एकदा एका माणसाने रजनीकांतच्या प्रेयसीची छेड काढली.. आज जग त्याला बॉबी
डार्लिग या नावाने ओळखते.एकदा रजनीकांत पावसात क्रिकेट खेळत होता.. त्या दिवशी खेळामुळे पाऊस थांबवण्यात
आला.एकदा रजनीकांतने दोन हत्ती, दोन ऊंट, दोन घोडे पाळले आणि लष्कराकडून काही सैनिक
मागवून घेतले.. त्याला बुद्धिबळ खेळण्याची हुक्की आली होती.एकदा जेम्स बाँडने एका माणसावर गोळी झाडली आणि तो म्हणाला, ‘‘आय अ‍ॅम बाँड,
जेम्स बाँड.’’ त्या माणसाने ती गोळी हातात झेलली आणि बाँडवर फेकून मारली. बाँड
जागीच गतप्राण झाला, तेव्हा तो माणूस म्हणाला, ‘आय अ‍ॅम कांत, रजनीकांत. येन्ना
रास्कला.’’एकदा एका माणसाने जळती सिगारेट हवेत भिरकावली. ती एका ग्रहावर जाऊन पडली. तो
ग्रह धडाडून पेटला.. त्यालाच सूर्य असे म्हणतात आणि त्या माणसाला रजनीकांत असे म्हटले जाते.

वाचनस्तु

Nimish Navneet Sonar
Chapters
""पुस्तके कशाला वाचायची?"" ""माझा वाचक मित्र आणि मी"" "@दिवाळी अंक लेख २०१६: आम्ही सोशल सोशल!" "# Similar Words Different Meanings" "# महासुविचारांचा महासंग्रह" "# शब्द शुद्धी" "कविता संग्रह" (निसर्ग) "कविता संग्रह" (प्रेम) "कविता संग्रह" (राजकारण) "कविता संग्रह" (विडंबन) "कोडे संग्रह" "ग्राफिटी" "चारोळी संग्रह" "धम्मक लाडू" "नाही" चा महिमा! "हलके फुलके" [शतशब्दकथा स्पर्धा] "सृजनचौर्य" @बॉलीवूड बाईट्स <जगावं तरी कसं?> 4 महत्वाचे प्राणायाम अनुभव: त्यानंतर असे झाले असेल तर अनुभव: फसवणुकीच्या "आयडीयांपासून" सावधान! अनुभव: सावधान!!! पुढे "माहितीचा धोका" आहे!! कथा: अपूर्ण स्वप्न कथा: असा डाव उलटला कथा: आघात कथा: जलजीवा कथा: बाबाजार कथा: रशियन एजंट ज्याने जगाला वाचवले कथा: विश्वरचनेचे "अज्ञात" भविष्य कथा: शापित श्वास कथा: शिकारी साखळी कथा: सवाशेर तडका कथा: हेल्मेट कॉमेडी: 'कोलावरी डी' चे विडंबन कॉमेडी: 'सांगू काय' गाण्याचे विडंबन कॉमेडी: अजब महिलांदोलन कॉमेडी: अफलातून जाहीराती कॉमेडी: आनंद आणि अंत कॉमेडी: कौन बनेगा हास्यपती कॉमेडी: क्रांतीकारी कुटुंब कॉमेडी: गोलू गलबले कॉमेडी: चित्रमानपत्र कॉमेडी: दबंग बाम कॉमेडी: धृतराष्ट्र का लैपटॉप कॉमेडी: नको तेव्हा नको तिथे नको तेच... कॉमेडी: पुणेरी बसमधील सूचना कॉमेडी: फिल्मी नावांची गम्मत कॉमेडी: मार्जारी आगलावे कॉमेडी: मुद्राराक्षसाचे विनोद (पूर्ण संग्रह) कॉमेडी: मेमरी लॉस कॉमेडी: रजनीकांतचे सुपरहीट कारनामे कॉमेडी: सरपटणारे विनोद कॉमेडी: स्पायडरमॅनच्या जीवाची मुंबई कॉमेडी:अशीही प्रस्तावना गूढकथा - आग्या वेताळ चित्रपट परीक्षणः २०१२ (एक मायावी सत्यानुभव) चित्रपट परीक्षणः क्रिश ३ चित्रपट परीक्षणः रजनीकांतचा रोबोट चित्रपट परीक्षण: अवतार चित्रपट परीक्षण: मी शिवाजीराजे भोसले बोलतोय! चित्रपट परीक्षण: हनुमान रिटर्न्स- अदभुत कल्पनाशक्ती छोटा पडदा टीव्ही: ई टिव्ही मराठी वरची मालिका: श्रीमंत पेशवा बाजीराव - मस्तानी टीव्ही: मालिका- चक्रवर्तीन अशोक सम्राट! टीव्ही: स्टार प्लस - साईबाबा : अत्युत्कृष्ट मालिका टीव्ही: स्टार प्लसवरचे महाभारत नटसम्राट: एक ओझरता दृष्टीक्षेप! निमिष मूव्ही ट्वीस्ट (जरा गम्मत) पुस्तक परीक्षण: संन्यासी ज्याने आपली संपत्ती विकली भटकयात्रा: ठेंगोडे चे जागृत सिद्धिविनायक मंदिर भटकयात्रा: प्रवासवर्णन पुस्तके लेख: "अशा" चित्रपटांची "ऐशी-तैशी" लेख: "गैर"समज! लेख: "गॉड पार्टीकल्स​" बिग बॅन्ग थेअरी? लेख: अक्सर जिंदा गद्दार डार्लिंग मर्डर लेख: अध्यात्म आणि विज्ञान: तुलना योग्य की अयोग्य? लेख: अनियंत्रित लोकसंख्यावाढ आणि भ्रष्टाचार लेख: उलटे समीकरण घातक! लेख: कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी! लेख: चर्चा नको? वाद हवा?? लेख: चित्रपटांची कैची लेख: चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्य लेख: जीवनाची गाडी! लेख: झोपलेले बर्फ लेख: तर्कहीन सात गोष्टी आणि त्यांचे एकच वैज्ञानिक स्पष्टीकरण? लेख: तुलनेचा तराजू लेख: दांभिक लोक कसे ओळखावेत? लेख: नात्यातले लहान मोठे लेख: निंदक असती घरा | आत्मविश्वासाचा होई कचरा || लेख: निसर्ग नियम आणि मानवी जीवन..!! लेख: नेहेमीची वाट लेख: पाश्चात्य संस्कृती- भौगोलिक की प्रतीकात्मक? लेख: पैसोबा पुराण लेख: पोस्टर वरचे उजवे डावे लेख: प्रत्येक नात्याचा पाया- संवाद आणि सुसंवाद! लेख: प्रेरणादायी प्रकाश लेख: बसमध्ये डावीकडील स्त्रीयांची राखीव जागा लेख: भाकरीचा चंद्र लेख: भारत का होतोय सगळ्यात जास्त खुन्यांचा/खुनांचा व अपघातांचा देश? लेख: भारतीय पादचारी बनणार क्रिश लेख: भारतीय संस्कृतीची विरोधाभासी शिकवण लेख: मराठी चित्रपटांची/मालिकांची मुलगा-सून द्वेष्टी मानसिकता लेख: महाभारताचे जीवन सार लेख: मानवी स्पंज आणि स्प्रिंग! लेख: मुलगा मुलगी हक्क कर्तव्य लेख: मुलींचे स्कार्फ आणि विरोधाभास!!! लेख: यशाची ९ सूत्रे लेख: यशाची प्रभावी दशसूत्री!! लेख: यशाचे सूत्र- वॉच गॉड लेख: रिंगटोन्सच्या राज्यात लेख: विचार रथ सारथ्य आणि संवाद धनुष्य लेख: विश्वातील पहिला सजीव आणि निर्जीव कोण? लेख: श्वानत्रस्त विरुद्ध श्वानप्रेमी लेख: संकटकाळी प्रसारमाध्यमांच्या छायाचित्रकारांचे काम? लेख: सकारात्मक दृष्टीकोन लेख: सकारात्मक भाषा लेख: समान "वाटा" हवा? लेख: सर्व मराठी वर्तमानपत्रे उभ्या आकाराची असावीत का? लेख: सर्वेक्षण आणि ज्योतिष लेख: सासू ही आई का होवू शकत नाही? लेख: सासू-सून-नणंद-जावा-भावजयी लेख: स्त्री-पुरुष समानता आणि कायद्यातील विषमता लेख: स्पष्टवक्ता की भ्रष्टवक्ता ? लेख: हीएइ ह्योए ह्याई हीयेहे सोनी टीव्ही: पेशवा बाजीराव मालिका शाहरुखचा "राईस" सोनी टीव्हीवरील पेशवा बाजीराव मालिकेबद्दल live चर्चा डोंबिवली साहित्य संमेलनाच्या निमित्ताने अफलातून जाहिराती: आमचे शिमेंट सर, मी बँकेतून बोलतेय! कॉपी कॅट बिस्किट्स राजा राणी गुलाम ब्रेकिंग न्यूज: "जलजीवा" आणि बर्मुडा ट्रँगल चा रहस्यभेद: काही विचार (#Nimishtics) सद्गुणाचा पुतळा बनतो विनाशाचा सापळा! वर्तमानपत्र की जाहिरातपत्र? अमिताभ - तेव्हा आणि आता चारोळ्यांचे चांदणे टीका आणि प्रशंसा - एक आढावा! पुस्तक परीक्षण: "माझं काय चुकलं?" मराठी बोला चळवळ बॉलीवूड बाईट्स कलर गीतानो - संगीत प्रेमींनी हे जरूर वाचा!