कथा: अपूर्ण स्वप्न
शंभू शेवाळे हा माझा परम मित्र. पुण्यात असतो. मी मुंबईला बँकेत नोकरीला लागलो आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून आपला संसार सांभाळायला लागलो. माझी पत्नी घर सांभाळते आणि मला आठ महिन्यांचा मुलगा आहे. शंभू लहानपणापासून संशोधक वृत्तीचा. त्या वृत्तीमुळेच तो आज मोबाईल अॅप्लीकेशन बनवणार्या एका कंपनी चा मालक बनला आहे. अजूनही तो स्वतः अनेक अॅप बनवत असतो.
मला लहानपणापासून अंतराळवीर बनण्याचे स्वप्न होते. आकाशातल्या ग्रहतार्यांचे खूप आकर्षण वाटे. अर्थात परिस्थिती मुळे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही. पण मला अधूनमधून अंतराळवीर असल्याची स्वप्न पडत आणि जसा का मी एकदा यानात बसून अंतराळात झेपावणार असतो, त्याच वेळेस मला हमखास जाग येते. म्हणजे स्वप्नातही माझे स्वप्न अपूर्ण राहत होते. काही वेळेस मी अंतराळात पोहोचलो पण अवकाशातच हरवलो. ग्रहावर पोहोचलोच नाही.
एकदा कामानिमित्त शंभूकडे जाण्याचा योग आला. आमची घरची मंडळी झोपल्यावर आम्ही एका रूम मध्ये रात्री गप्पा मारत बसलो होतो. एकमेकांची विचारपूस झाली.
तो अचानक काहीतरी आठवत म्हणाला, "अरे अर्जुन, तुझे अंतराळवीर होण्याचे स्वप्न होते? बरोबर?"
"होय", मी म्हणालो.
काहीतरी आठवून तो उठला आणि लॅपटॉप जवळ जात म्हणाला, "आण तुझा मोबाईल इकडे. अँड्रॉइड आहे ना?"
"होय", मी म्हणालो.
आता काहीतरी छान अॅप मला फुकटात मिळणार असे वाटून आनंद झाला. आजपर्यंत चाचणी म्हणून मला शंभू कडून असे अनेक अॅप फ्री मिळाले होते.
शंभू ने एक अॅप माझ्या मोबाईल मध्ये टाकून तो मला परत दिला आणि म्हणाला, " अरे, बरे झाले तू घरचा माणूस मला हे अॅप टेस्ट करायला सापडलास. हे अॅप एकदा बाजारात आले की क्रांती होणार क्रांती! मला तर जास्त स्वप्न पडत नाहीत. म्हणून माझ्या स्वप्नाळू मित्राला मी निवडत आहे!"
"अरे आहे काय एव्हढे त्यात?"
"तुला नेहमी स्वप्न पडतात करेक्ट? आणि तेही अंतराळवीर बनण्याचे! आणि तुझी खर्या जीवनात ती इच्छा पूर्ण झाली नाही आणि स्वप्नात सुद्धा पूर्ण होत नाही करेक्ट? तर मग हे अॅप तुझ्यासारख्यांसाठीच आहे मित्रा!"
"काय सांगतो? म्हणजे नेमके कसे वापरायचे हे अॅप? ताणू नकोस बाबा लवकर सांग!"
"तू रोज रात्री हे अॅप चालू कर आणि मोबाईल डोक्याच्या बाजूला असलेल्या टेबलवर किंवा खुर्चीवर अशा रीतीने ठेव की त्याच्या इन्फ्रारेड ची दिशा तुझ्या बरोबर डोक्यावर असेल. यात स्वप्न रेकॉर्ड होत नाही तर त्याच्या लहरी रेकॉर्ड होतात. स्वप्न जसेच्या तसे आपण रेकॉर्ड करून मोबाईल मध्ये मध्ये पाहू शकत नाही. कारण मेंदूतल्या लहरी या नेहमीच्या टेलिव्हिजन मॉड्युलेशन साठी वापरण्यात येणाऱ्या लहरी नसतात. मात्र या लहरी पुन्हा मेंदूवर प्रोजेक्ट केल्या तर तेच स्वप्न पुन्हा मेंदूत पाहता येते. एकदा का या अॅप च्या मदतीने तू तुझे स्वप्न नैसर्गिकरीत्या पूर्ण पाहू शकलास की ते पुन्हा पुन्हा प्रोजेक्ट करून परत परत पाहू शकतोस."
" पण मग हे अॅप स्वप्न संपेपर्यंत आपल्याला झोपेतून उठू देणार नाही असे होईल का?"
"होय. ऐक! जेव्हा स्वप्न सुरू होते तेव्हा एक विशिष्ट सिग्नल मेंदूतून निघतो तसाच स्वप्न संपताना निघतो, तो हे अॅप ओळखेल आणि पूर्ण स्वप्नांच्या लहरी अॅप मध्ये साठवल्या जातील. स्वप्नातून जागे न होण्यासाठी तू फक्त एकच करायचे. जेव्हा तुला वाटेल की आता स्वप्न तुटत आहे तेव्हा स्वप्नात कोणतीही तुला आवडणारी वस्तू धरून ठेवायची. जोपर्यंत ती वस्तू तू धरली आहेस तोपर्यंत तोपर्यंत तुझे स्वप्न तुटणार नाही!"
"हे कसे शक्य आहे?"
"हो. जेव्हा तू आवडीची वस्तू पकडशील तेव्हा तुझ्या मेंदूतून निघणाऱ्या लहरी खूप तीव्र असतील आणि त्या लहरी अॅप पकडेल आणि अॅप द्वारे मोबाईल मधून सिग्मा किरण निघतील जी तुला झोपेतून उठू देणार नाहीत. मग एकदा तू पूर्ण स्वप्न पहिले की स्वप्न संपल्याचा सिग्नल मेंदूतून निघेल, तो हे अॅप ओळखेल, मग सिग्मा बंद आणि अर्जुन झोपेतून जागा होईल! काय कसे काय वाटले? "
मी हे ऐकून एक आवंढा गिळला आणि एक शंका विचारली, "अरे पण जर सिग्मा किरण बंद झालेच नाहीत तर?"
"तसे होणार नाही. मेंदू एका विशिष्ट वेळेपेक्षा जास्त स्वप्न पाहूच शकत नाही. ती वेळ व्यक्तीपरत्वे वेगळी असते. ज्या व्यक्तीची कल्पनाशक्ती चांगली त्याच्या मेंदूची स्वप्न पाहण्याची क्षमता जास्त!"
माझ्या या परम मित्राचे अफाट ज्ञान पाहून आश्चर्याने पुढे बोलूच शकलो नाही...
त्या रात्री मला झोपच आली नाही तर स्वप्न पडायचा प्रश्नच नव्हता. मला केव्हा एकदा ते अॅप ट्राय करतो असे झाले होते.
दुसऱ्या दिवशी बँकेतून घरी आल्यावर कशातच मन रमेना. मी बायकोलाही याबद्दल सांगितले नव्हते. रात्र झाली. जेवण केले. बायकोशी जुजबी बोलल्यानंतर मी, शेजारी माझा आठ महिन्यांचा मुलगा परीक्षित आणि शेजारी बायको असे झोपलो. तत्पूर्वी मोबाईल चे अॅप चालू करून ठेवायला मी विसरलो नाही. ड्रेसिंग टेबलवर मी तो मोबाईल ठेवला होता.
...सकाळ झाली. रात्री स्वप्न पडले नाही. अनेक दिवस गेले. स्वप्न पडलेच नाही. बरोबर आहे. आपण आपल्या मर्जीनुसार स्वप्न बघू शकत नाही...
पंधरा दिवस निघून गेले. शंभू सारखा फोन करून विचारात होता पण मला स्वप्न पडलेच नाही तर तो तरी काय करणार? आणि मी तरी काय करणार?
नंतर आम्ही एकदा दोन दिवस माथेरान ला मुक्कामी होतो. दुसऱ्या दिवशी सगळी ठिकाणे पाहून झाली आणि उद्या सकाळी निघायचे होते. ते अॅप मी सतत चालूच ठेवले होते.
थकून झोप लागली आणि अवकाशयान अंतराळात झेपावले. आम्ही दोन जण होतो यानात. दुसरा अमेरिकन. नासा तर्फे नेपच्यून ग्रहावर आम्ही प्रवेश करणार होतो. यान नेपच्यून ग्रहाजवळ पोहोचले. जेरेमी मला म्हणाला," माझ्या भारतीय मित्रा, अर्जुना! मी यानात थांबतो. ठरल्याप्रमाणे तू ग्रहावर उतर."
यानाचे दार उघडताच एक विचित्र वास जाणवला आणि वेगळाच अंधुक प्रकाश दिसला. समोर दाट धुके होते. अनेक छोटे तारे उडत उडत माझ्या हेल्मेटच्या काचेवर आदळले जात होते. समोर आइसक्रीम कोन सारखे काहीतरी दिसले आणि कानठळ्या बसवणारा रडण्याचा आवाज आला. माझा मुलगा रडत होता. स्वप्न भंगले. मी पुढचे पाहू शकलो नाही. त्याने हातात खुळखुळा धरला होता. तो मी बाजूला केला. बायको आधीच उठली होती.
मुंबईला परतल्यावर मी ते शंभू ला सांगितले आणि म्हणालो, " अरे, स्वप्न संपायच्या वेळेस मला कुठली आवडीची वस्तू अंतराळात कुठे भेटणार?" तेव्हा तो म्हणाला, "ऐक, आता पुढची स्टेप. तुझी रेकॉर्ड झालेली पहिली फाइल सेट कर आणि मग बघ आज रात्री गंमत! तुला स्वप्न पडायला सुरुवात होताच ते अॅप ओळखेल आणि कालचे स्वप्न पुन्हा दाखवेल."
दोन दिवसांनी स्वप्न पडले. तेच! ...यानाचे दार उघडताच एक विचित्र वास जाणवला आणि वेगळाच अंधुक प्रकाश दिसला. समोर दाट धुके होते. अनेक छोटे तारे उडत उडत माझ्या हेल्मेटच्या काचेवर आदळले जात होते. समोर आइसक्रीम कोन सारखे काहीतरी दिसले आणि एक अंतराळवीर बालक आइसक्रीम कोन धरायला उडत होता... आकाशात कोठून आला हा चिमुकला अंतराळवीर? कोन धरून तो प्लुटोवर उतरला आणि धुक्यात नाहीसा झाला...मोबाइलची बेल वाजली, स्वप्न भंगले...
शंभूला फोनवर हे सांगताच तो विचारात पडला आणि हसायला लागला.
"अरे मित्रा! आता उलगडा झाला. त्या माथेरानच्या रात्री तुझी बायको तुझ्या आधी उठली होती बरोबर?"
"हो", मी म्हणालो.
"तेच तर! म्हणजेच तिचा चुकून मोबाईल ला धक्का लागला असणार आणि त्याची दिशा बाळाकडे झाली असणार... आणि तेच स्वप्न तुझ्या परी ला पडले असणार आणि तो ओरडून जागा झाला असणार, त्याने तुझ्या स्वप्नात कोन पकडला कारण पाळण्यात त्याचेजवळ खुळखुळा होता. मग त्याचे स्वप्न जे तू पाहिले नाही ते रेकॉर्ड झाले आणि ते तू दुसऱ्या दिवशी पाहिले. अरे! म्हणजे या अॅप चा हा आणखी एक उपयोग झाला. आता एक कर! पुन्हा जेव्हा तुला स्वप्न पडेल तेव्हा त्या बालकाला धर. तोच तर तुझा आवडता आहे. म्हणजे तुझे स्वप्न भंगणार नाही."
पुन्हा एका रात्री ....समोर दाट धुके होते. छोटे तारे उडत उडत माझ्या हेल्मेटच्या काचेवर आदळले जात होते. समोर आइसक्रीम कोन सारखे काहीतरी दिसले..एक अंतराळवीर बालक आइसक्रीम कोन धरायला उडत होता... मी बालकाला धरायला त्याचेकडे जायला लागलो. अचानक एक छोटी उल्का आली आणि त्या कोनावर आदळली. आइसक्रीम फुटले. बालक सैरभैर झाला आणि वेगाने पुढे जाऊ लागला आणि मी त्याचे मागे....
बायको मला आणि मुलाला केव्हापासून जागे करण्याचा प्रयत्न करीत होती. पण आम्ही जागेच होत नव्हतो...
... त्या छोट्या अंतराळविराला पकडण्यासाठी मी सुद्धा वेगाने त्याचे मागे जाऊ लागलो... असे आम्ही बरेच दूर गेलो आणि एका ब्लॅक होल मध्ये खेचले गेलो आणि अचानक मी आणि माझा मुलगा दोघे पलंगावरून खाली पडलो...
नंतर सगळा उलगडा झाल्यावर माझ्या बायकोची आणि शंभूची हसता हसता पुरेवाट झाली... तर अशा रीतीने माझे स्वप्न कधी "पूर्ण" झालेच नाही कारण दर वेळेस त्याला नवनवीन कलाटणी मिळायची...अर्थात स्वप्नात मी अंतराळवीर झालो आणि अनेक ज्ञात अज्ञात ग्रह फिरून आलो हे मात्र खरं! आणि बायको देश विदेशातल्या मॉल्स मध्ये रोज फिरून येते...

(समाप्त)
कृपया आपल्या प्रतिक्रिया कथेच्या खाली आपल्या gmail ने login करून जरूर द्या किंवा मला इमेल ने प्रतिक्रिया पाठवा.कथा आवडल्यास माझा ब्लॉग सर्वाना वाचायला सांगा तसेच फेसबुक, ट्विटर वर जरूर शेअर करा. धन्यवाद!! sonar.nimish@gmail.com