लेख: "गैर"समज!
गैरसमज हे परस्पर आणि दुतर्फा संवादाने दूर होतात.
वादविवादाने गैरसमज वाढतात.
संवादाने आणि एकमेकांचे ऐकून घेतल्याने गैरसमज संपतात.
संवादच होवू दिला नाही तर गैरसमज कधीच दूर होणार नाहीत.
गैरसमज हा रुसलेला असतो. हटून बसतो. जातच नाही!
त्याचे रुसणे दूर करायला संवाद हवा असतो.
गैरसमज हा शेवटी "गैर" असतो. परका असतो. आपला नसतो!
त्याच्या नावातच परकेपणा आहे. "गैर"समज!
म्हणजे तो कधी ना कधी गैर होतोच आणि उरतो फक्त समज!
ही समज ज्याला जितक्या लवकर येते तितक्या लवकर तो संवादाला तयार होतो आणि गैरसमजाला कायमचे "गैर" करतो आणि समजाला समजून घेतो.
समजलं का?