पूर आला आनंदाचा । लाट...
पूर आला आनंदाचा । लाटा उसळती प्रेमाच्या ॥१॥
बांधूं विठ्ठल सांगडी । पोहुनि जाऊं पैलथडी ॥२॥
अवघे जन गडी । घाला उडी भाईंनो ॥३॥
हें तों नाहीं सर्वकाळ । अमूप अमृताचे जळ ॥४॥
तुका म्हणे थोरा पुण्यें । ओघ आला पंथें येणें ॥५॥