शब्दीं गौरवीत वाणी । भाव ...
शब्दीं गौरवीत वाणी । भाव आंत वरी दोनी ॥१॥
शोभे तरीच हे वेडी । नग्न होय धडफुडी ॥२॥
नाहीं जीवित्वाची आस्था । लज्जा भय शंका चित्ता ॥३॥
काय न पाहों आणिकां । मागें दुजें म्हणे तुका ॥४॥