सून सासूचें ऐकेना । रांड ...
सून सासूचें ऐकेना । रांड सुदीसी नांदेना ॥१॥
बळेंच आपण रुसावें । जीव देतें हें म्हणावें ॥२॥
गरीब पाहून दादल्यासी । हिंसाळती घोडी जैसी ॥३॥
दादला देखोनियां वेडा । म्हणे माझी इष्टा फेडा ॥४॥
ऐसी डंकीण त्या गांवीं । तुका म्हणे व्हा गोसावी ॥५॥