भक्ति हे कठिण सुळावरिल पो...
भक्ति हे कठिण सुळावरिल पोळी । निवडे तो बळी विरळा एक ॥१॥
जेथें पाहे तथें देखीचा पर्वत । पायाविणें भिंत तांतडीची ॥२॥
कामाविलें जरी पाका ओज घडे । तेचि आणि गोडी घेतां बरे ॥३॥
तुका म्हणे मना पाहिजे अंकुश । नित्य नवा दिवस जागृतीचा ॥४॥