आतां पांडुरंगा काय वर्णूं...
आतां पांडुरंगा काय वर्णूं किर्ति । थोर केली ख्याति जगामाजी ॥१॥
आवढया देऊळीं आरंभी कीर्तन । म्हणतसे जन नामयासी ॥२॥
राऊळाचे मागें जाऊनियां उभा । मुख पद्मनाभा फिरविलें ॥३॥
तुका म्हणे तुज भक्ति संस्थापणें । अवतार घेणें युगायुगीं ॥४॥