जाय तिकडे पीडी लोकां । जो...
जाय तिकडे पीडी लोकां । जोडी भांडवल थुंका ।
थोर झाल्या चुका । वर कां नाहीं घातली ॥१॥
भूमी कांपे याच्या भारें । कुंभपाकाचीं शरीरें ।
निष्ठुर उत्तरें । पापदृष्टि मळिण चित्त ॥२॥
दुराचारी तो चांडाळ । पाप-सांगातें विटाळ ।
तुका म्हणे खळ । म्हणोनियां निंदितों ॥३॥