जन्मुनी मरावें आमुची हे म...
जन्मुनी मरावें आमुची हे मिरासी । जरी निवारिसी तरिच थोरी ॥१॥
उभा राहें करीं खोटा खरा वाद । आम्ही झालों निंद्य लंडीपणें ॥२॥
उभयतां आहे करणें समान । तुम्हा ऐसा म्हणे मीहि देवा ॥३॥
तुका म्हणे हातीं सांपडलें वर्म । अवघाचि श्रम फेडिन आतां ॥४॥