त्यासी घडले सकळ नेम । मुख...
त्यासी घडले सकळ नेम । मुखीं विठोबाचें नाम ॥१॥
कांहीं नलगे शिणावें । आणिक वेगळिया भावें ।
वाचे उच्चारावें । रामकृष्ण गोविंद ॥२॥
फळ पावे अवलीळा । भोगी वैकुंठ सोहळा ॥३॥
तुका म्हणे ज्याच्या नांवें। तोचि होईजे स्वभावें ॥४॥