गुण ज्याचा जो अंतरीं । त...
गुण ज्याचा जो अंतरीं । तोचि त्यासी पीडा करी ॥१॥
विंचू वागवी विखार । त्यासी पैजाराचा मार ॥२॥
करी चोरीकर्म । खोडा पडे भोगी भ्रम ॥३॥
हर्षें चाहडी सांगे । ग्वाही देतां दंड मागे ॥४॥
परद्वार करी । दुःखभरें बोंबा मारी ॥५॥
तुका म्हणे संतां निंदी । पडे यमाचिये बंदी ॥६॥