उगीच गेलों पंढरीला । घरीं...
उगीच गेलों पंढरीला । घरीं ठाऊक नव्हतें मला ॥१॥
चंद्रभागेचें रेंदा पाणी । नाहीं प्यालों ओंगळवाणी ॥२॥
गांवा भोंवतालें फिरावें । वेळे उपवासी मरावें ॥३॥
टाळ मृदंगाचे घाई । माझें कपाळ उठते बाई ॥४॥
देऊळासी जातां । तोबे मारिताती हाता ॥५॥
तुका म्हणे रांड लेका । जिकडे तिकडे खासी ठोका ॥६॥