Get it on Google Play
Download on the App Store

इंदु 18

“आणि त्या मित्रावर त्यांचे फार प्रेम.”

“तो रामरावांचा मुलगा, गुणा. सारंगी वाजवणारा. त्यांचाहि पत्ता नाही ना? कर्जाने गांजले गेले.”

“त्यालाच जगन्नाथ शोधीत असेल. मित्राचे घर त्याने दुस-या कोणाला घेऊं दिले नाही. त्या घराची तो कशी व्यवस्था ठेवी! रोज ते घर झाडून ठेवीत असे. म्हणे की, गुणा येईल. एखादे वेळेस रात्री गेला तसा रात्री येईल. घर स्वच्छ असावे झाडलेले. आणि जगन्नाथ गेला तरी त्याची पत्नी ते घर स्वच्छ ठेवते. खरी पतिव्रता आहे ती. सारखा ध्यास घेऊन बसली आहे.”

“देवाला येईल दया.”

“कधी येईल ती? देव निष्ठुर आहे, अनुदार आहे. शेतक-यांची येते का त्याला दया? ज्यांची दया यायला हवी त्यांचीच त्याला येत नाहीं.”

“शेतक-यांनी आपण होऊन उठावे, अन्यायाविरुद्ध उठावे असे देवाला वाटते. आई का मुलाचा सारखा हात धरून चालवील? म्हणेल, तूं चाल आतां. पडलास तरी चालेल. आपले लोक दुबळे. अन्यायाची कोणाला चीडच येत नाही.”

“पाचोरे आले वाटते?”

“आतां चाळीसगांवला उतरून दुस-या डब्यांत पाहू जागा. तेथे गाडी जरा जास्त थांबते.”

“झोप आली बुवा.”

“घ्या बसल्या बसल्या डुलकी.”

अशी त्या मंडळींची बोलणी चालली होती. गुणा सर्व इंद्रियांचे कान करून ऐकत होता. कितीदां तरी आपण प्रश्न विचारावे असे त्याच्या मनांत आले. परंतु त्याने संयम राखला. जगन्नाथची कितीतरी दिवसांनी त्याला हकीगत कळली. तो का माझ्या शोधार्थ हिंडत आहे? आणि त्याचे आईबाप दु:खी आहेत. इंदिरा रडत आहे. मी एकहि पत्र त्याला लिहिले नाही. माझ्यामुळे सर्वांना दु:ख. आईबापापासून मुलगा दूर गेला. पत्नीचा पति दुरावला. कोठे असेल जगन्नाथ? तो का हिंदुस्थानभर भटकणार? आम्ही म्हणत असो की, आपण दोघे भिकारी होऊं व हिंदुस्थानभर भटकू. जगन्नाथ का खरोखरच भिकारी होऊन गेला? एकटाच गेला? माझ्या शोधार्थ गेला?

मनमाडला डब्यांतील बरीच गर्दी कमी झाली. गुणा आतां झोपला. इंदूची उशी घेऊन झोपला. जगन्नाथचा विचार करीत झोपला. तो कल्याणला जागा झाला. तेथे तो उतरला. नवाच्या सुमारास पुण्याकडे जाणारी गाडी आली, परंतु ती मळवलीस थांबणार नव्हती. तरी तींतच तो बसला. लोणावळ्याहून टॅक्सी करून जाऊ. इंदूजवळ जाण्याची त्याला इच्छा होती. पैशाची काय पर्वा?

लोणावळ्यास उतरून एक टॅक्सी करून तो मळवलीस गेला. इंदु बाहेर हिंडत होती. मोटार थांबताच ती पुढे गेली तो गुणा दृष्टीस पडला.

“ये, गुणा ये.”

गोड शेवट

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
कर्जबाजारी रामराव 1 कर्जबाजारी रामराव 2 कर्जबाजारी रामराव 3 कर्जबाजारी रामराव 4 मित्रांची जोडी 1 मित्रांची जोडी 2 मित्रांची जोडी 3 मित्रांची जोडी 4 मित्रांची जोडी 5 मित्रांची जोडी 6 मित्रांची जोडी 7 मित्रांची जोडी 8 मित्रांची जोडी 9 मित्रांची जोडी 10 मित्रांची जोडी 11 मित्रांची जोडी 12 मित्रांची जोडी 13 कोजागरी 1 कोजागरी 2 कोजागरी 3 कोजागरी 4 कोजागरी 5 कोजागरी 6 कोजागरी 7 कोजागरी 8 कोजागरी 9 कोजागरी 10 कोजागरी 11 कोजागरी 12 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 1 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 2 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 3 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 4 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 5 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 6 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 7 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 8 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 9 आपण दोघे भिकारी होऊन हिंडूं 10 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 1 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 2 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 3 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 4 दयाराम भारतींस हद्दपारीची शिक्षा 5 राष्ट्रीय मेळा 1 राष्ट्रीय मेळा 2 राष्ट्रीय मेळा 3 राष्ट्रीय मेळा 4 राष्ट्रीय मेळा 5 राष्ट्रीय मेळा 6 राष्ट्रीय मेळा 7 राष्ट्रीय मेळा 8 जगन्नाथचे लग्न 1 जगन्नाथचे लग्न 2 जगन्नाथचे लग्न 3 जगन्नाथचे लग्न 4 जगन्नाथचे लग्न 5 जगन्नाथचे लग्न 6 जगन्नाथचे लग्न 7 जगन्नाथचे लग्न 8 जगन्नाथचे लग्न 9 जगन्नाथचे लग्न 10 जगन्नाथचे लग्न 11 जगन्नाथचे लग्न 12 येथें नको, दूर जाऊं 1 येथें नको, दूर जाऊं 2 येथें नको, दूर जाऊं 3 येथें नको, दूर जाऊं 4 येथें नको, दूर जाऊं 5 येथें नको, दूर जाऊं 6 येथें नको, दूर जाऊं 7 येथें नको, दूर जाऊं 8 येथें नको, दूर जाऊं 9 येथें नको, दूर जाऊं 10 येथें नको, दूर जाऊं 11 येथें नको, दूर जाऊं 12 येथें नको, दूर जाऊं 13 येथें नको, दूर जाऊं 14 गुणा कोठें गेला गुणा? 1 गुणा कोठें गेला गुणा? 2 गुणा कोठें गेला गुणा? 3 गुणा कोठें गेला गुणा? 4 गुणा कोठें गेला गुणा? 5 गुणा कोठें गेला गुणा? 6 गुणा कोठें गेला गुणा? 7 गुणा कोठें गेला गुणा? 8 आगगाडींत भेटलेला देव 1 आगगाडींत भेटलेला देव 2 आगगाडींत भेटलेला देव 3 आगगाडींत भेटलेला देव 4 आगगाडींत भेटलेला देव 5 आगगाडींत भेटलेला देव 6 आगगाडींत भेटलेला देव 7 आगगाडींत भेटलेला देव 8 आगगाडींत भेटलेला देव 9 दु:खी जगन्नाथ 1 दु:खी जगन्नाथ 2 दु:खी जगन्नाथ 3 दु:खी जगन्नाथ 4 दु:खी जगन्नाथ 5 दु:खी जगन्नाथ 6 दु:खी जगन्नाथ 7 दु:खी जगन्नाथ 8 इंदूर 1 इंदूर 2 इंदूर 3 इंदूर 4 इंदूर 5 इंदूर 6 इंदूर 7 इंदूर 8 इंदूर 9 इंदूर 10 इंदूर 11 इंदूर 12 इंदूर 13 इंदूर 14 इंदूर 15 इंदूर 16 इंदूर 17 इंदूर 18 इंदूर 19 इंदिरा 1 इंदिरा 2 इंदिरा 3 इंदिरा 4 इंदिरा 5 इंदिरा 6 इंदिरा 7 इंदिरा 8 इंदिरा 9 इंदिरा 10 इंदिरा 11 इंदिरा 12 इंदिरा 13 इंदिरा 14 जगन्नाथ 1 जगन्नाथ 2 जगन्नाथ 3 जगन्नाथ 4 जगन्नाथ 5 जगन्नाथ 6 जगन्नाथ 7 जगन्नाथ 8 जगन्नाथ 9 जगन्नाथ 10 जगन्नाथ 11 जगन्नाथ 12 जगन्नाथ 13 जगन्नाथ 14 जगन्नाथ 15 जगन्नाथ 16 जगन्नाथ 17 जगन्नाथ 18 जगन्नाथ 19 जगन्नाथ 20 जगन्नाथ 21 जगन्नाथ 22 जगन्नाथ 23 इंदु 1 इंदु 2 इंदु 3 इंदु 4 इंदु 5 इंदु 6 इंदु 7 इंदु 8 इंदु 9 इंदु 10 इंदु 11 इंदु 12 इंदु 13 इंदु 14 इंदु 15 इंदु 16 इंदु 17 इंदु 18 इंदु 19 इंदु 20 इंदु 21 इंदु 22 इंदु 23 इंदु 24 इंदु 25 इंदु 26 इंदु 27 इंदु 28 इंदु 29 इंदु 30 इंदु 31 इंदु 32 एरंडोलला घरीं 1 एरंडोलला घरीं 2 एरंडोलला घरीं 3 एरंडोलला घरीं 4 एरंडोलला घरीं 5 एरंडोलला घरीं 6 एरंडोलला घरीं 7 एरंडोलला घरीं 8 एरंडोलला घरीं 9 एरंडोलला घरीं 10 एरंडोलला घरीं 11 एरंडोलला घरीं 12 एरंडोलला घरीं 13 एरंडोलला घरीं 14 एरंडोलला घरीं 15 एरंडोलला घरीं 16 एरंडोलला घरीं 17 एरंडोलला घरीं 18 एरंडोलला घरीं 19 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 1 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 2 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 3 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 4 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 5 ही चंद्रभागा नको,त्या चंद्रभागेंत पवित्र हो 6 शेवटी सारे गोड होतें 1 शेवटी सारे गोड होतें 2 शेवटी सारे गोड होतें 3 शेवटी सारे गोड होतें 4 शेवटी सारे गोड होतें 5 शेवटी सारे गोड होतें 6 शेवटी सारे गोड होतें 7 शेवटी सारे गोड होतें 8 शेवटी सारे गोड होतें 9