Get it on Google Play
Download on the App Store

तरवारीचें व फांसाचें थैमान 53

- ३ -

ख्रिश्चन धर्म अंगीकारून अगर त्याला चुकीनें जो ख्रिश्चन धर्म वाटला तो घेऊन व रोमचा तो राष्ट्रधर्म करून कॉन्स्टंटाइननें आपल्या पत्नीचा, वडील मुलाचा व एका पुतण्याचा खून केला व रोमवर अनियंत्रित राजसत्ता गाजविण्यास सुरूवात केली.  त्याच्या पूर्वी डायोक्लिशन अंगावर रेशमी कपडे घाली, हातीं राजदंड व डोक्यावर पर्शियन सम्राटांचा मुकुट धारण करी.  पण कॉन्स्टंटाइन त्याच्याहि पुढें जाऊन आपल्या राष्ट्राच्या भवितव्याचा एकमेव विधाता बनला.  त्यानें सीनेटची सर्व सत्ता संपुष्टांत आणली, पर्शियन सम्राटांप्रमाणें निरनिराळे मंत्री व अधिकारी निर्माण केले, चॅन्सेलर, खजीनदार शरीररक्षक दलांचे सेनापती, वगैरे पदाधिकारी नेमले.  नाना रंगांचे व सोनेरी पदरांचे झगे तो अंगावर घाली.  त्याच्या भेटीस येणार्‍यांना त्याला साष्टांग प्रणाम करावा लागे.  बॉस्फरसच्या सामुद्रधुनीवर बायझंटियम शहर पुन: बांधून त्यानें त्याला कॉन्स्टँटिनोपल (म्हणजे कॉन्स्टँटाइनचें शहर) असें नांव दिलें.  आशियांतील राजांमहाराजांप्रमाणें भव्य-दिव्य वैभवांत राहूं पाहणार्‍या रोमन सम्राटांच्या निवासासाठीं हें शहर बांधण्यांत आलें.  त्यानें सुरू केलेल्या या नव्या अनियंत्रित सुलतानशाहीचा थाटमाट टिकविण्यासाठीं त्यानें आधींच जबर असलेले कर वाढविले.  पुष्कळशा रोमन नागरिकांस त्यानें केवळ गुलाम केलें.

रोमन सुलतानांमध्यें तो सर्वांत निरंकुश होता.  अर्वाचीन काळांतील सारे झार व केसर यांची अवलाद त्याच्याचपासून सुरू झाली. 'रोमन इतिहासाची रूपरेषा' या आपल्या पुस्तकांत प्रो० मोरे लिहितो, ''अर्वाचीन युरोपांतील साम्राज्यांत ऑगस्टसचा तो पहिला साम्राज्यवाद नसून नंतरचा कॉन्स्टंटाइनचा साम्राज्यवाद आहे.  तो पुन: प्रकट झाला आहे.''

निकाई येथें ख्रिश्चन धर्मोपदेशकांचें संमेलन भरविल्याबद्दल कॉन्स्टंटाइन विशेष प्रसिध्द आहे.  इ.स. ३२५ मध्यें हें संमेलन भरलें होतें.  ख्रिस्ताच्या दैवी विभूतिमत्वाबाबतच्या नाना मतांच्या चर्चेसाठी कॉन्स्टँटिनोपलनजीकच्या नाइस शहरीं ही धर्म-परिषद् भरली होती.  आजच्याप्रमाणेंच कॉन्स्टंटाइनच्याहि काळांत मॉडर्निस्ट, फंडामेंटॅलिस्ट, पुराणमतवादी, नवमतवादी असे नाना विरोधी संप्रदाय होते व ते परस्परांचे गळे कापण्यास सदैव सज्ज असत.

नाईस येथें भरलेल्या धर्मपरिषदेकडे आपण आतां जरा नजर फेंकूं या.

- ४ -

नाइस येथें भरलेल्या परिषदेंतील नवमतवाद्यांना एरियन म्हणत ; कारण ते अ‍ॅरियसचे अनुयायी होते.  आजच्या युनिटेरियन मताशीं या एरियन पंथाचें सादृश्य होतें.  अ‍ॅरियस म्हणे, ''ख्रिस्त ही पवित्रांहून पवित्र व थोरांहून थोर विभूति होय.  पण तो कितीहि थोर असला तरी कांहीं देव नव्हे.'' या उलट फंडामेंटॅलिस्ट, पुराणमतवादी किंवा सनातनी होते.  ते म्हणत, ''ख्रिस्तामध्यें ईश्वर, त्याचा पुत्र व पवित्र आत्मा असे तीन अंश आहेत.  पिता+पुत्र+पवित्र आत्मा अशा विविध स्वरूपांची एक मूर्ति म्हणजे ख्रिस्त.'' हे मतभेद मिटविण्यासाठीं भरविलेल्या त्या संमेलनाला सुमारें अडीच हजार धर्मभिक्षु व तीनशें अठरा बिशप हजर होते.  त्यांना कॉन्स्टंटाइननें आपापलें म्हणणें आपल्या समक्ष मांडण्यांत सांगितलें.  ही चर्चा ग्रीक भाषेंतून चाले.  कॉन्स्टंटाइनला ग्रीक बोललां येत नसे व समजतहि नसे.  पण या चर्चेतला एक विशिष्ट भाग मात्र त्याला सहज समजला ; तो म्हणजे सनातन्यांपैकीं एकानें वादाच्या भरांत अ‍ॅरियसला केलेला प्रहार.  हा मुद्दा त्याला अगदीं स्पष्टपणें कळला.  त्याला त्यांतील तर्कशुध्दता, तद्वतच सरळपणा नीट पटला !

मानवजातीची कथा

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
मानवजातीचें बाल्य 1 मानवजातीचें बाल्य 2 मानवजातीचें बाल्य 3 मानवजातीचें बाल्य 4 मानवजातीचें बाल्य 5 मानवजातीचें बाल्य 6 मानवजातीचें बाल्य 7 मानवजातीचें बाल्य 8 मानवजातीचें बाल्य 9 मानवजातीचें बाल्य 10 मानवजातीचें बाल्य 11 मानवजातीचें बाल्य 12 मानवजातीचें बाल्य 13 मानवजातीचें बाल्य 14 मानवजातीचें बाल्य 15 मानवजातीचें बाल्य 16 मानवजातीचें बाल्य 17 मानवजातीचें बाल्य 18 मानवजातीचें बाल्य 19 मानवजातीचें बाल्य 20 मानवजातीचें बाल्य 21 मानवजातीचें बाल्य 22 मानवजातीचें बाल्य 23 मानवजातीचें बाल्य 24 मानवजातीचें बाल्य 25 मानवजातीचें बाल्य 26 मानवजातीचें बाल्य 27 मानवजातीचें बाल्य 28 मानवजातीचें बाल्य 29 मानवजातीचें बाल्य 30 मानवजातीचें बाल्य 31 मानवजातीचें बाल्य 32 मानवजातीचें बाल्य 33 मानवजातीचें बाल्य 34 मानवजातीचें बाल्य 35 मानवजातीचें बाल्य 36 मानवजातीचें बाल्य 37 मानवजातीचें बाल्य 38 मानवजातीचें बाल्य 39 मानवजातीचें बाल्य 40 मानवजातीचें बाल्य 41 मानवजातीचें बाल्य 42 मानवजातीचें बाल्य 43 मानवजातीचें बाल्य 44 मानवजातीचें बाल्य 45 मानवजातीचें बाल्य 46 मानवजातीचें बाल्य 47 मानवजातीचें बाल्य 48 मानवजातीचें बाल्य 49 मानवजातीचें बाल्य 50 मानवजातीचें बाल्य 51 मानवजातीचें बाल्य 52 मानवजातीचें बाल्य 53 मानवजातीचें बाल्य 54 मानवजातीचें बाल्य 55 मानवजातीचें बाल्य 56 मानवजातीचें बाल्य 57 मानवजातीचें बाल्य 58 मानवजातीचें बाल्य 59 मानवजातीचें बाल्य 60 मानवजातीचें बाल्य 61 मानवजातीचें बाल्य 62 मानवजातीचें बाल्य 63 मानवजातीचें बाल्य 64 मानवजातीचें बाल्य 65 मानवजातीचें बाल्य 66 तरवारीचें व फांसाचें थैमान 1 तरवारीचें व फांसाचें थैमान 2 तरवारीचें व फांसाचें थैमान 3 तरवारीचें व फांसाचें थैमान 4 तरवारीचें व फांसाचें थैमान 5 तरवारीचें व फांसाचें थैमान 6 तरवारीचें व फांसाचें थैमान 7 तरवारीचें व फांसाचें थैमान 8 तरवारीचें व फांसाचें थैमान 9 तरवारीचें व फांसाचें थैमान 10 तरवारीचें व फांसाचें थैमान 11 तरवारीचें व फांसाचें थैमान 12 तरवारीचें व फांसाचें थैमान 13 तरवारीचें व फांसाचें थैमान 14 तरवारीचें व फांसाचें थैमान 15 तरवारीचें व फांसाचें थैमान 16 तरवारीचें व फांसाचें थैमान 17 तरवारीचें व फांसाचें थैमान 18 तरवारीचें व फांसाचें थैमान 19 तरवारीचें व फांसाचें थैमान 20 तरवारीचें व फांसाचें थैमान 21 तरवारीचें व फांसाचें थैमान 22 तरवारीचें व फांसाचें थैमान 23 तरवारीचें व फांसाचें थैमान 24 तरवारीचें व फांसाचें थैमान 25 तरवारीचें व फांसाचें थैमान 26 तरवारीचें व फांसाचें थैमान 27 तरवारीचें व फांसाचें थैमान 28 तरवारीचें व फांसाचें थैमान 29 तरवारीचें व फांसाचें थैमान 30 तरवारीचें व फांसाचें थैमान 31 तरवारीचें व फांसाचें थैमान 32 तरवारीचें व फांसाचें थैमान 33 तरवारीचें व फांसाचें थैमान 34 तरवारीचें व फांसाचें थैमान 35 तरवारीचें व फांसाचें थैमान 36 तरवारीचें व फांसाचें थैमान 37 तरवारीचें व फांसाचें थैमान 38 तरवारीचें व फांसाचें थैमान 39 तरवारीचें व फांसाचें थैमान 40 तरवारीचें व फांसाचें थैमान 41 तरवारीचें व फांसाचें थैमान 42 तरवारीचें व फांसाचें थैमान 43 तरवारीचें व फांसाचें थैमान 44 तरवारीचें व फांसाचें थैमान 45 तरवारीचें व फांसाचें थैमान 46 तरवारीचें व फांसाचें थैमान 47 तरवारीचें व फांसाचें थैमान 48 तरवारीचें व फांसाचें थैमान 49 तरवारीचें व फांसाचें थैमान 50 तरवारीचें व फांसाचें थैमान 51 तरवारीचें व फांसाचें थैमान 52 तरवारीचें व फांसाचें थैमान 53 तरवारीचें व फांसाचें थैमान 54 मध्ययुगांतील रानटीपणा 1 मध्ययुगांतील रानटीपणा 2 मध्ययुगांतील रानटीपणा 3 मध्ययुगांतील रानटीपणा 4 मध्ययुगांतील रानटीपणा 5 मध्ययुगांतील रानटीपणा 6 मध्ययुगांतील रानटीपणा 7 मध्ययुगांतील रानटीपणा 8 मध्ययुगांतील रानटीपणा 9 मध्ययुगांतील रानटीपणा 10 मध्ययुगांतील रानटीपणा 11 मध्ययुगांतील रानटीपणा 12 मध्ययुगांतील रानटीपणा 13 मध्ययुगांतील रानटीपणा 14 मध्ययुगांतील रानटीपणा 15 मध्ययुगांतील रानटीपणा 16 मध्ययुगांतील रानटीपणा 17 मध्ययुगांतील रानटीपणा 18 मध्ययुगांतील रानटीपणा 19 मध्ययुगांतील रानटीपणा 20 मध्ययुगांतील रानटीपणा 21 मध्ययुगांतील रानटीपणा 22 मध्ययुगांतील रानटीपणा 23 मध्ययुगांतील रानटीपणा 24 मध्ययुगांतील रानटीपणा 25 मध्ययुगांतील रानटीपणा 26 मध्ययुगांतील रानटीपणा 27 मध्ययुगांतील रानटीपणा 28 मध्ययुगांतील रानटीपणा 29 मध्ययुगांतील रानटीपणा 30 मध्ययुगांतील रानटीपणा 31 मध्ययुगांतील रानटीपणा 32 मध्ययुगांतील रानटीपणा 33 मध्ययुगांतील रानटीपणा 34 मध्ययुगांतील रानटीपणा 35 मध्ययुगांतील रानटीपणा 36 मध्ययुगांतील रानटीपणा 37 मध्ययुगांतील रानटीपणा 38 मध्ययुगांतील रानटीपणा 39 मध्ययुगांतील रानटीपणा 40 मध्ययुगांतील रानटीपणा 41 मध्ययुगांतील रानटीपणा 42 मध्ययुगांतील रानटीपणा 43 मध्ययुगांतील रानटीपणा 44 मध्ययुगांतील रानटीपणा 45 मध्ययुगांतील रानटीपणा 46 मध्ययुगांतील रानटीपणा 47 मध्ययुगांतील रानटीपणा 48 मध्ययुगांतील रानटीपणा 49 मध्ययुगांतील रानटीपणा 50 मध्ययुगांतील रानटीपणा 51 मध्ययुगांतील रानटीपणा 52 मानवजातीची जागृती 1 मानवजातीची जागृती 2 मानवजातीची जागृती 3 मानवजातीची जागृती 4 मानवजातीची जागृती 5 मानवजातीची जागृती 6 मानवजातीची जागृती 7 मानवजातीची जागृती 8 मानवजातीची जागृती 9 मानवजातीची जागृती 10 मानवजातीची जागृती 11 मानवजातीची जागृती 12 मानवजातीची जागृती 13 मानवजातीची जागृती 14 मानवजातीची जागृती 15 मानवजातीची जागृती 16 मानवजातीची जागृती 17 मानवजातीची जागृती 18 मानवजातीची जागृती 19 मानवजातीची जागृती 20 मानवजातीची जागृती 21 मानवजातीची जागृती 22 मानवजातीची जागृती 23 मानवजातीची जागृती 24 मानवजातीची जागृती 25 मानवजातीची जागृती 26 मानवजातीची जागृती 27 मानवजातीची जागृती 28 मानवजातीची जागृती 29 मानवजातीची जागृती 30 मानवजातीची जागृती 31 मानवजातीची जागृती 32 मानवजातीची जागृती 33 मानवजातीची जागृती 34 मानवजातीची जागृती 35 मानवजातीची जागृती 36 मानवजातीची जागृती 37 मानवजातीची जागृती 38 मानवजातीची जागृती 39 मानवजातीची जागृती 40 मानवजातीची जागृती 41 मानवजातीची जागृती 42 मानवजातीची जागृती 43 मानवजातीची जागृती 44 मानवजातीची जागृती 45 मानवजातीची जागृती 46 मानवजातीची जागृती 47 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 1 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 2 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 3 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 4 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 5 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 6 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 7 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 8 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 9 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 10 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 11 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 12 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 13 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 14 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 15 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 16 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 17 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 18 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 19 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 20 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 21 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 22 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 23 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 24 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 25 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 26 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 27 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 28 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 29 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 30 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 31 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 32 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 33 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 34 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 35 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 36 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 37 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 38 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 39 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 40 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 41 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 42 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 43 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 44 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 45 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 46 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 47 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 48 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 49 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 50 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 51 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 52 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 53 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 54 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 55 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 56 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 57 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 58 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 59 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 60 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 61 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 62 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 63 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 64 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 65 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 66 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 67 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 68 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 69 खर्‍या संस्कृतीचा प्रारंभ 70