Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह १७

उचकी लागयिली का ग उचकी तुझी घाई

आत्ती माजी तू मावळणी सई काडली कशापाई ।

जिवाला जड भारी कोर्‍या कागदी जल्दी लिवा

आत्ती माजी ती मावळन दुरल्या देशाची यील कवा ।

हिरव्या चोळीवरी कुनी काडिली गवळण

सया नारीला सांगू किती हाई हौसची मावळन ।

मावळनी आत्याबाई एका म्हायारी दोगी जावू

माजे बापाजी तुमचे भाऊ ।

मावळन आक्काबाई तुमच्या बुगडयाखाली काई

तुमची भावज आमची आई ।

तुळशी घाली पानी त्याबी तुळशीखाली झरा

बया माज्या मालनीचा पतीव्रतीचा नेम खरा ।

जिवाला माझ्या जड कसं कळालं माज्या आई

अंगनी हुती जाई कळ्या पडती घाईघाई ।

पंढरीला मी जाते संगं न्ह्यावं मावशीला

सोन्याच्या कळशीत पानी घालिते तुळशीला ।

अंबारीचा हत्ती साजासकट उबा केला

वडील बोलत्याती बाळ अंदान दिला तुला ।

पावन्या परकारु करतो शोजीचा मलीदा

वडील म्हेवयीनी आली जिवाचा कलीदा ।

दिव्याला भरयानं घाला दिव्याला जोडवात

वडील म्हेवयीनी गुज बोलू या सारी रात ।

देऊनी घेऊयीनी न्हाई पुरत डोंगर

वडील भयीयीनी तुज्या बोलाचा आदार ।

पाटानं जातं पानी ऊस पिवूनी खपलीला

आज्जी मालन हांक मारी लेकीसंगट नातीयीला ।

सासुरवासनीला तिला कोंबडा वयीयीरी

पाटच्या पार्‍यामंदी भांग देतूया दुयीयीरी ।

लेन्याबीमंदी लेनं मनी डोरलं कानी फुलं

कपाळीचं ग माजं कुंकू जसं आकाशी चंद्र डुलं ।

मावळ्याचा घरी भाची पावनी चंद्रावळी

केली चिंचची पत्रावळी ।

लावनीचा आंबा त्येला मुरबाची भर

शामा नटव्या बंदुजीला मी का न्ह्याळीती खालीवर ।

लेण्यामंदी लेणं जोडवी चांदी चोख

ह्या सर्वा ग मंदी बाई कुंकू माज मारी झाक ।

थोरलं माजं घर हंडीगल्लास लोंबत्याती

माजं ती बाळराज धनी वाडयाला सोबत्याती ।

पंढरीची ग कुंकू मला महिन्याला लागी धडा

बया माजीला किती सांगू लेकी सुनांनी भरला वाडा ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४