Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ३३

बहिणीच्या गावा जाया भाऊ सांगतो बारा गडी

सासरवाडी जाया सोडी नांगर जुंपी गाडी ।

सासरवाडी गेला तुला पेहरावा काय केला

हावशा बंधु माझा पाय तोडयाचा दावी मला ।

सासरवाडी जातो मला म्हणतो जतरेला

बुंदीच्या लाडवाची खूण नकीच्या धोतराला ।

उन्हाळ्यांच ऊन नकी तापली धोतराची

ताईत बंधवाची सुरत कोमेली चतुराची ।

हावशा माझा बंधु उद्या जायाचा जतरला

परटीण धुणं धुती साबण लावी धोतराला ।

परटीण धुणं धुती लावी साबण पटक्याला

हावशा माझा बंधु उद्या जायाचा नाटकाला ।

लावणीचा छान ऊस उभा निरगुडी फोंकात

ताईत माझा बंधु उभा कॉंग्रेस लोकात ।

हिरवीगार चोळी कुण्या हौशानं घेतली

चतुर बंधुजींनी वर मुंबई लिहिली ।

समोरच्या सोप्यां मी ग टाकिते खुर्ची बाक

बंधुचया संगतीनं इथं येतात राजेलोक ।

काम करिते घरामधी जीव माझा रानामधी

माझ्या ग बंधवाच्या जोडी खिल्लारी हातामधी ।

उन्हाळ्याचं ऊन चैतापरास वैशाखाचं

माझ्या ग बंधुजीचं गोरेपण सायासाचं ।

गावाला गेला कुण्या माझ्या झुब्याची तोडेकरी

चतुर माझा बंधु सखा दृष्टीनं झाला जार ।

गावला गेला कुण्या खरं वाटना कामिनीला

तान्ही ग मैना माझी शेला बघती वलनीला ।

गावला गेला कुण्या मला वाटतं येडयावाणी

चतुर माझा बंधु गाव दिसतं खेडयावाणी ।

गावाला गेला कुण्या जीव लागला माझा सारा

पुढं पाऊस मागं वारा ।

गावाला गेला कुण्या जाते सायकल घरोघरा

धरतरी घाली वारा जीव लागला माझा सारा ।

लेकी मैनाचं चांगुलपण झाली सोयिर्‍याची धन

हावशा बंधु माझा चंद्र वाडयाला राकण ।

काळी ग गरसोळी माझ्या कंठी लहर्‍या मारी

चतुर माझा बंधु तुझ्या सोन्याला मागं सारी ।

चुडयाचं ग सोनं पिवळं हाडूळ

हावशा बंधवानी केली पारख वाडूळ ।

मोटईचं पाणी पाणी वाजतं पुरावाणी

चतुर माझा बंधु नाचे मोरक्या मोरावाणी ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४