Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ७०

आई आई म्हणू, आई साखरफुटाणा

आई सांगे गोष्टी मला उठूशी वाटेना ।

बारीक बांगडी, मला भरुशी वाटली

आईच्या ठिकाणी मला मावशी भेटली ।

कपाळीचं कुंकू, पाण्यात पाहू नय

लग्नाच्याजोडयाला, नांवं ठेवू नये ।

बाबाने दिली लेक, वाटेवरच्या गोसाव्याला

तिच्या नशिबाला पालखी ग बसायाला ।

शेजारीण बाई धन्य तुझ्या ग शेजाराची

सय नाही माहेराची बारा वर्षे ।

गोरी भावजय नको ग करु फुणफूण

सांगेन ग तुझे गुण भाईरायाला ।

भाऊराया ग आपुला, वहिनी बाई ग लोकाची

मनं राखावी दोघांची सिंधूताई ।

सावळ्या मेहुण्याला नाही सुपारीची चाड

दिलं ग लवंगाचं झाड, सिंधूताई ।

नवरी पाहू आले, बसू टाकावा दोरव

शालू घ्यावा ग हिरवा वरमाईला ।

सोनसळे गहू त्याला तूपाचे ग मोहन

भाऊबिजेचे जेवण भाऊरायाला ।

पाहुण्याला पाहूणचार, मेहुण्याल बुंदी लाडू

एका पंक्ती दोघी वाढू वहिनीबाई ।

मधूपर्की कोण बैसलासे हिरा

सखे तुझा ग नवरा इंदूताई ।

दळण दळिताना अंगाचे होत पाणी

माय बाई जरी हिने मला चारिले सायलोणी ।

सासरी जाताना गाडी लागली जाईला

हाका मारिते आईला, बेबीताई ।

माझ्या ग दारावरनं कोण गेली सवाशीण

काजळ कुंकू बाळंतीण शांताबाई ।

भरली कृष्णाबाई, पाणी लागलं दोन्ही कडया

माझा पोहणार टाकी उडया भाईराया ।

भरली कृष्णाबाई, नाव चाले ग भरा भरा

नको रागावू भाईराया मायबाई ।

वाटेचा ग वाटसर, करितो पाणी पाणी

भाऊच्या मळ्यामधी चावर्‍या मोटा दोन्ही ।

भाऊची कमाई, पहायला गेले शेती

होती काळी माती वर उमलले मोती ।

सासू आणि सासरा, दीर तो तिसरा

ओव्या गाईन भ्रतारा तू ये रे बा विठ्‌ठला ।

दळण जी दळीले, पीठ जी भरीले

सासू पुढे तू ठेविले ये रे बा विठ्‌ठला ।

शेजीचे ग उपकार हे ग फेडीते भाजीपाला

मायबाईचे उपकार फिटेना काही केल्या ।

औक्ष मी ग चिंतीते शेजीच्या ग बाळाला

माझ्या त्या राजसा बरोबर खेळायाला ।

लांब लांब केस, भांग पडतो कंगणी

वहिनी ग बाई उभी मामाच्या अंगणी ।

तुळशीचा पाला, वारियाने गेला

देव विठ्‌ठलाने आवडीने गोळा केला ।

तुळशीबाई तुझ्या खाली काळी माती

तुझ्या भेटीसाठी देव आले अर्ध्या राती ।

माऊलीची माया काय करील चुलती

पंढरीची खण चोळी होईना पुरती ।

सासर्‍याची वाट टाकी लावून घडीवली

बंधु माझ्या ग गणेशाला बघा वाट ती नवी केली ।

सासुरवाशिणीच्या पाठी लागतो सारा वाडा

माझ्या त्या बाळाईचा कंत भिंतीच्या आड झाला ।

पाया ग पडू आता नको पायाचा मला भान

माझे ग सूनबाई बाळ कांखेला आहे तान्हं ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४