Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ९४

जावाई पाटीलाची उशी कशानी गळंदली

मालन बाई माझी मैना उशीरा नाहली

जावाई पाटीलांची सूर्यमूख खोली

बाई माझी चांदणी चमकली

पाण्याला निघाल्या ग मोठया घरच्या दोघी तिघी

लाहणा घरची सीता उभी माझी भावजई

पाण्याला ग गेली गोरी लालाच्या विहीरी

बहिणीच्या माझ्या बाई हिरवा रंग चोळीवरी

जावाई आले आले घरा संतोसली माझी छाती

मैना मागून येत होती शारदाबाई

जावाई पाटीलाची पहांटेची ग अंघोळ बाईला

तरी माझ्या मैनाला पाणी दूर

निघाला ग नारायण पाहा झाडा झुडावरी

बाई तरी माझ्या तेज मैनाच्या चुडयावरी

निघाला ग नारायण आहे चाफा ग येवढा

सर्व ग दूनीयात त्यांचा प्रकाश केवडा

निघाला ग नारायण निघतां मी पाहीन

गंध अक्षदा वाहीन

निघाला नारायण निघाला ग घाई घाई

मार्कंडयाचा गोसाई

सनाचा पाडवा माय बसली रागानं

गाडी जुंपली राघोबानं

मांडवाच्या दारी नूपर गेल्या डेरी

नवर्‍याबाईचे ग मामाजी लावे केळी

मांडवाच्या दारी नूपर गेल्या जांबा

नवर्‍या मुलीचे मामाजी लावे लांबा

मांडवाच्या दारी चिखल कशाचा ग झाला

मामा नवरीचा नाहाला

माहेरी मी जाईन मान कोणाचा पाहीन

सूना मातेच्या लहान

माझ्या बंधुला झाले पुत्र आम्हाला झाला भासा

साखर वाटली ग पसा पसा

वले ग वले गहू सेवयासाठी केले

भाऊ पंडीत गावा गेले

पाणी ग पडतो मोत्याचा ग शीरवा

बाग बंधूचा हिरवा

पाणी ग पडतो मोतीयाचे

सडे माझ्या बंधुच्या गावाकडे

पाणी ग पडतो कुठे पडतो कुठे नाही

बंधु गावाला गेला नाही

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४