Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ३४

कळवातणीबाई सांग नदीचा उतार

माझ्या बंधुजीचं भिजं जानवं धोतर ।

कळवातणीबाई तुझ्या दारीचं पिवळं पाणी

माझ्या बंधुची कवळी ज्यानी ।

सावळ्या सुरतीला नार न्हयाळिती कवाची

माझ्या ग बंधुजीची रास बक्‌शी गव्हाची ।

सावळी सुरत लई नसावी पुरुषाला

बंधुच्या संगतीनं नारी निघाल्या उरसाला ।

शेताला गेली कुरी उभी बांधाच्या आसर्‍याला

चतुर माझा बंधु मोती दुयिरी कासर्‍याला ।

माझा ग बंधुराया कधी पाहीन असं झालं

लाटांच्या अंतरात बिंब चंद्राचं थरारलं ।

माझ्या ग भाऊराया इतका कसा विसरला

उद्याच्या पाडव्याला चार वर्षाचा भाचा झाला ।

मावळला सूर्यराजा गेला अंधार करुन

माहेराच्या आठवानं आलं हुरदं भरुन ।

माझ्या ग बंधुजीला फेटा शोभतो भरजरी

सूर्य डोलतो नभावरी ।

दुपारच्या सूर्या कुठं जातोस पलीकडं

गौरीबाईला न्यायला गाडी घुंगुराची धाड ।

बहिणीला घालवाया दोघं मुराळी नटतात

चतुर माझे बंधु गाडी खिडक्यांची रेटतात ।

वाट मी किति पाहू दोन्ही दरवाजे धरुन

बंधूला देखूनी ग आली नेतरं भरुन ।

दुबळ्या बहिणीला भाऊ पुरवितो चंदी

त्याचा उत्सव काशीमंदी ।

बहिणीचा सासुरवास बंधु बघतो सोप्या वाटं

चतुर बंधुजीच्या गंगा लोटल्या डोळ्यावाटं ।

पाठीचा बंधू माझा तुटेल दुयाधन

नाही करीत भाची सून ।

भावाची कन्या केली तिला काय सांगायाची चोरी

परघरची राधा बरी ।

तडावलं गाव, गाव दिसतं बामणीवजा

बंधुला किती सांगू बहिणी दिल्यात लेकी द्या जा ।

बंधु इवाई करु गेली दीर दाजीबा संग चला

तुम्ही हुंडयाची बोली करा माझ्या बंधूची भीड मला ।

जासूदाच्या मुला सांग सांगावा एवढा

बया मालनीच्या दारी तुळस केवडा ।

गोरे भावजई तुझा मला राग आला

जेवता बंधु माझा उठूनी पाणी प्याला ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४