Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ६२

दिवाळीच्या दिवशी तबकी ग खण

आता कमी करते माझ्या बाप्पाजीचे ऋण ।

उगवला सूर्य ऊन पडलं दारात

सासूच्या मनामधी सून नसावी घरात ।

पोतेरा घालते चुली आधी देव्हार्‍याला

भोजनाचं ताट लेकी आधी जावयाला ।

लेकूरवाळीला ग नका म्हणू नादान

काम तिचं बाळाच्या स्वाधीन ।

चिक्कण सुपारी माझ्या बंधूच्या विडयाला

बाळा माझ्या चातुराणी राणी लावल्या कामाला ।

सक्रान्तिचा सण पर्वकाळाचा दिवस

भाऊबाई सीता आधी तुळशीला ववस ।

उन्हाळ्या दिवसात ऊन लागतं गालाला

छत्री शोभती माझ्या बाई लालाला ।

जावळाची वेणी मामांनी उकलली

सावळी राधा कन्यादाना उभी केली ।

दिवसा करिते काम रात्री बसते निश्चिंत

सांगते भाइ राजा तुला औक्ष चिंतीत ।

देहाचा देह मुठीच्या करीते समया

येथून आरती माझी तुला गुरुराया ।

अशी झाली दृष्ट माझ्या राजस बाळीला

तीनी वाटांची माती आणते लिंबाचाबी पाला ।

काय बोलला मूर्खा वतनदाराला

पांढरीचा भेंडा एकदा बसेल थराला ।

लावणीचा आंबा पाणी घालिते पळीनं

आंब्या ग शेजारी केला फैलाव केळीनं ।

गावाला गेल्याची ग काळजी मी किती करु

भाई राजाच्या पाठीशी दत्तगुरु ।

शेजी हिनवीती तुला भाऊ किती जण

पृथ्वीच्या पाठीवर चंद्रसूर्य दोघे जण ।

लावणीचा अंबा पाणी घालते वेळोवेळी

आंब्याचीहि झाली केळ ।

गाव नेवाशाची नदी कडी कोट

लक्ष्मीबाईला घडीते सरी गोठ ।

सकाळी उठूनी धरणीमाते नमस्कार

लागतात पाय अपराध क्षमा कर ।

थोर माझ घर माझं आणीक होणार

धाकटे माझे दीर बागणीगावचे शाहीर ।

सकाळी उठूनी हात जोडीते हरीला

आयुष्य मागते माझ्या कुंकाच्या चिरीला ।

दाहाचा पोशीणारा दहाचं मन धरी

पडला नाही बाई लेकीला वाटेवरी ।

हर्षाची गुडी माध्यान रात्री आली

भाई राजाला माझ्या आज कन्या झाली ।

नेणतेपणी पुत्राचा बाप झाला

भाई राजाला माझ्या हिर्‍याची माळ घाला ।

भाऊ भावजया दोन्ही आधाराच्या मेढी

मावली नसतानी माहेरी गेली वेडी ।

कोनी नाही कोनाचं भाऊ नाही बहिनीचा

कैवार घेतो सखा आपल्या राणीचा ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४