Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ६४

सावळी सुरत अशी पाहिली नाही कुठं

माझ्या ग राजसाचं ओठ बारीक डोळ नीट ।

मोठ नी मोठ डोळ जशी लिंबाची टोपणं

शेजीला कशी सांगू रुप कांताचं देखणं ।

रुक्मीनबाई बोल सुभद्राला धाडा मेणा

द्रुपदाबाईची स्वारी रथामधी आधी आणा ।

पहाटेच्या पार्‍यामंदी कोणी वाजवीला वीणा

काकड आरतीला उभ्या भाऊ बोदल्याच्या सुना ।

पहाटेच्या पार्‍यामधी कर्णा सुरु झाला

दह्या दुधानं देव न्हाल ।

पहाटेच्या पार्‍यामंदी कर्णा वाजतो मंजूळ

पांडुरंगाला माझ्या दह्यादुधाची आंघोळ ।

पहिल्या पंगतीला रुक्‌मीन बैसली रांगूळीला

सावळा पांडुरंग देव गेला आंघोळीला ।

दुसर्‍या पंगतीला रुक्मीन टाकीती पान

भोजना बैसले बार्शीचे भगवान ।

तीसर्‍या पंगतीला रुक्मीन वाढीती पोळी

भोजना बैसला अरनगावचा सावता माळी ।

चवथ्या पंगतीला रुक्मीन वाढीती भात

भोजना बैसले पैठणीचे एकनाथ ।

पाचव्या पंगतीला तुपा तळीती मेथी

रुक्‌मीन बोलती विठ्‌ठला साधु पंगतीला आले किती ।

आपण गुरु बहिणी देशो देशींची पांखरं

पांडुरंगाच्या माझ्या एका वाफ्याची लेकरं ।

तुझ्या त्या ओसरीला येल लवंगाचा केर

तुझ्या नवतीचा गेला भर ।

लेकीचं चांगूलपण रुप आईन्यात मावेना

बापासारखी माझी मैना ।

चांगुलपणाची लांब गेलीया आवई

बंधुसारखी भावजई ।

नेसली चंद्रकळा तुझी बारीक कंबर

निरी पडली शंभर ।

थोरलं माझं घर घराशेजारी पाणई

सून गवळ्याची ठाणई ।

भाजीमधी भाजी, भाजी बारीक हरबर्‍याची

माझ्या बंधूजीची नार नाजूक वंजार्‍याची ।

जाल्या तू ईसवरा तुला सुपारी बांधिली

नवर्‍या हळद लाविली ।

जाल्या तू इसवरा तुला बक्षी गव्हाचा बा घास

नवरा मोतीयाचा घोस ।

बंधू मी करते याही दीर दाजीबा संगं चला

मांडव नारळीचा पायघडयांची बोली करा ।

बंधू मी करते याही जावा नंदाच्या मेळ्यात

सोन्याची मोहनमाळ सून राध्याच्या गळ्यात ।

घाणा ग भरीयला खंडीभर जीरीयाचा

मंडप हि‍र्‍याचा लखलखाट ।

घाणा ग भरीयला खंडीभर गव्हायाचा

मंडप मोत्याचा दणका थोर ।

घाणा ग भरीयला खंडीभर बाजरीचा

मंडप देवाचा शोभीवंत ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४