Get it on Google Play
Download on the App Store

संग्रह ५२

अस्तुरीचा हात पुरुषाच्या हातात

वचन दिलं बाई हिरव्या मांडवात ।

साळू सासर्‍याला जाती आन म्या बांधिले गोडधोड

भूक लागल तिथं सोड ।

साळू जाती सासर्‍याला आयाबायाची लामन

संगं सवळ्याचा बामन ।

साळू जाती सासर्‍याला तिच्या वटीला कवळदान

संगं मुराळी गाडीवान ।

साळू जाती सासर्‍याला ढेळजाला उभ्या राहू

सया बोलल्याता तुझ्या मैनाला वाटं लावूं ।

सासरी जाताना सयाला पुसना

नेनंती बाई माजी हरन गळयाची सुटना ।

सासरी जाताना माया धरीती पोटाशी

शोभाताई माझे कधी हरनी भेटशी ।

सासरी जाते येळी घोडं लागलं चडनी

बाई माझ्या नेनंतीच्या उभ्या मयनाला घडनी ।

सासरी चालली सखे बाई ग लाडाची

वर्‍हे सावली ताडाची तिच्या ग बांदवाची ।

माझ्या ग दारामधी सांडलं कंख पानी

नेनंती माझी मैना सासर्‍याला गेली तानी ।

उंच वसरीला कोन निजला सावळा

माझ्या नेनंत्याचा हात उशाला पिवळा ।

गोठ पाटल्याचा हात कंथाच्या उशाखाली

नेनंत्या बाईला पिरतीची झोप आली ।

भरताराचं राज्य काचाचा बंगला

सुखाचा वाटतो कुंखाच्या ग धन्याला ।

राज्यामंदी राज भोळ राज भरताचं

हळदी कुंखाचं उघडं पाल अत्ताराचं ।

भरताराचं सुख सांगते देवा घरी

कुंकवाच्या करंडयाला खिडक्या नानापरी ।

सासूचा सासरवास नंद तुम्ही हळू बोला

नेनंत्या बाईईचा कंथ बाहेरुन आला ।

यवढा सासूरवास नको करु मायमाता

आपला राम व्हता आली परायाची सीता ।

सासूचा सासरवास कोनापाशी सांगू देवा

भाचा माझा नेनंता मनधरनीचा यावा ।

उन्हाळ्याचं ऊन माझ्या सख्याला सोसना

कुठं सावली दिसना ।

चाफ्या चंदनाची सख्याची नांगरटी

पिकलं पिकलं एका औताला बैल किती ।

पाऊस पडतो रायाच्या शिवारात

गल्ला मावना अंबारीत पानी झालय शेतात ।

तिपनी बाईनं तीनं मनाचा पेरा केला

माझा रासन्या कोमेजला ।

गावाला बाई गेला

सोनं येवढं गेलं माझं ।

जावयाची जात अन्‌ बाई भोंदुन खायाची

बोली सरावन बाळाची कावड काशीला न्यायाची ।

जावई सोयरा जसा चिंचचा आकडा

सदा बोलतो वाकडा ।

जावयाची जात जशी हुलग्याची पेरणी

लेक देऊनीया याची उगीर बोलणी ।

जावयाची जात मोठी बेइमान

मैना आपली देऊनीया शिवी देतो माईहून ।

जावयाची जात कडू लिंबाचा पाला

लेकीबाई मैनारानी तुझ्यासाठीच गोड केला ।

पावन्याला पावुनचार जावयाला दूधभात

लक्ष केलं दान शिवी देतो गोतात ।

ओवी गीते : इतर

स्तोत्रे
Chapters
संग्रह १ संग्रह २ संग्रह ३ संग्रह ४ संग्रह ५ संग्रह ६ संग्रह ७ संग्रह ८ संग्रह ९ संग्रह १० संग्रह ११ संग्रह १२ संग्रह १३ संग्रह १४ संग्रह १५ संग्रह १६ संग्रह १७ संग्रह १८ संग्रह १९ संग्रह २० संग्रह २१ संग्रह २२ संग्रह २३ संग्रह २४ संग्रह २५ संग्रह २६ संग्रह २७ संग्रह २८ संग्रह २९ संग्रह ३० संग्रह ३१ संग्रह ३२ संग्रह ३३ संग्रह ३४ संग्रह ३५ संग्रह ३६ संग्रह ३७ संग्रह ३८ संग्रह ३९ संग्रह ४० संग्रह ४१ संग्रह ४२ संग्रह ४३ संग्रह ४४ संग्रह ४५ संग्रह ४६ संग्रह ४७ संग्रह ४८ संग्रह ४९ संग्रह ५० संग्रह ५१ संग्रह ५२ संग्रह ५३ संग्रह ५४ संग्रह ५५ संग्रह ५६ संग्रह ५७ संग्रह ५८ संग्रह ५९ संग्रह ६० संग्रह ६१ संग्रह ६२ संग्रह ६३ संग्रह ६४ संग्रह ६५ संग्रह ६६ संग्रह ६७ संग्रह ६८ संग्रह ६९ संग्रह ७० संग्रह ७१ संग्रह ७२ संग्रह ७३ संग्रह ७४ संग्रह ७५ संग्रह ७६ संग्रह ७७ संग्रह ७८ संग्रह ७९ संग्रह ८० संग्रह ८१ संग्रह ८२ संग्रह ८३ संग्रह ८४ संग्रह ८५ संग्रह ८६ संग्रह ८७ संग्रह ८८ संग्रह ८९ संग्रह ९० संग्रह ९१ संग्रह ९२ संग्रह ९३ संग्रह ९४