Get it on Google Play
Download on the App Store

बहिण-भाऊ 4

ती भावाला निरोप तरी कोणाबरोबर पाठवणार, पत्र कोणाबरोबर देणार ? स्त्रियांना कोठे आहे ते स्वातंत्र्य ? परंतु एक साधन आहे. वार्‍याबरोबर, पाखरांबरोबर पाठवावा निरोप. त्यांना बातमी घेऊन येण्याविषयी सांगावे :

अरे वार्‍या वार्‍या                धांवशील लांब लांब
बहिणीचा निरोप सांग               भाईरायाला ॥
कावळया कावळया             लांब जाई रे उडून
येई निरोप सांगून                     भाईरायाला ॥

परंतु चिमण्याकावळयांनी का जावे, का ऐकावे ? का म्हणजे ? मी त्यांना अंगणातून हाकलले नाही. त्यांना दाणे घातले, त्यांना का कृतज्ञता वाटत नसेल ?

दाणे मी घालत्यें               तुम्हाला अंगणात
भावाची आणा मात                 चिमण्यांनो ॥
नाही हाकलीले                 कधी अंगणामधून
यावे निरोप सांगून                  भाईरायाला ॥

भाऊ येणार असे तिला वाटू लागते. हातातला घास गळतो, डोळा लवतो. कोणी तरी दूर डोंगर उतरून उन्हातून येताना दिसते. भर दुपारच्या उन्हातून कोण येते ते ? पावसानंतरचे पहिलेच ऊन्ह. फार त्रास देते ते. भाऊच असणार तो :

दुपारचे ऊन                     घाटीडोंगर कोण घेतो
बहीणीसाठी भाऊ येतो                  भाऊबीजे ॥
दुपारचें ऊन                     लागते सणसण
शेला घेतो पांघरून                       भाईराया ॥
तांबडें पागोटें                   उन्हाने भडक्या मारी   
सुरूच्या झाडाखाली                     भाईराया ॥


कोकणातील हे वर्णन दिसते. घाटी चढून येणारा, सुरूच्या झाडाखाली बसणारा हा कोकणचा भाऊ दिसतो. भाऊ येतो व मुले मामा मामा करू लागतात. बहिणीच्या आनंदाला आकाश ठेंगणे होते. ती भावाजवळ प्रेमाने विचारपूस करते. कौतुकाने पुसते:

स्त्रीजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बहिण-भाऊ 1 बहिण-भाऊ 2 बहिण-भाऊ 3 बहिण-भाऊ 4 बहिण-भाऊ 5 बहिण-भाऊ 6 बहिण-भाऊ 7 बहिण-भाऊ 8 बहिण-भाऊ 9 बहिण-भाऊ 10 बहिण-भाऊ 11 बहिण-भाऊ 12 बहिण-भाऊ 13 बहिण-भाऊ 14 बहिण-भाऊ 15 बहिण-भाऊ 16 बहिण-भाऊ 17 बहिण-भाऊ 18 बहिण-भाऊ 19 बहिण-भाऊ 20 बहिण-भाऊ 21 बहिण-भाऊ 22 बहिण-भाऊ 23 बहिण-भाऊ 24 बहिण-भाऊ 25 मायलेकरे 1 मायलेकरे 2 मायलेकरे 3 मायलेकरे 4 मायलेकरे 5 मायलेकरे 6 मायलेकरे 7 मायलेकरे 8 मायलेकरे 9 मायलेकरे 10 मायलेकरे 11 मायलेकरे 12 मायलेकरे 13 मायलेकरे 14 मायलेकरे 15 मायलेकरे 16 मायलेकरे 17 मायलेकरे 18 मायलेकरे 19 मायलेकरे 20 मायलेकरे 21 मायलेकरे 22 मायलेकरे 23 मायलेकरे 24 मायलेकरे 25 मायलेकरे 26 मायलेकरे 27 मायलेकरे 28 मायलेकरे 29 मायलेकरे 30 मायलेकरे 31 मायलेकरे 32 मायलेकरे 33 मायलेकरे 34 मायलेकरे 35 मायलेकरे 36 मायलेकरे 37 मायलेकरे 38 मायलेकरे 39 मुलगी 1 मुलगी 2 मुलगी 3 मुलगी 4 मुलगी 5 मुलगी 6 मुलगी 7 मुलगी 8 मुलगी 9 मुलगी 10 मुलगी 11 मुलगी 12 मुलगी 13 मुलगी 14 मुलगी 15 मुलगी 16 मुलगी 17 मुलगी 18 मुलगी 19 मुलगी 20 मुलगी 21 सुखदु:खाचे अनुभव 1 सुखदु:खाचे अनुभव 2 सुखदु:खाचे अनुभव 3 सुखदु:खाचे अनुभव 4 सुखदु:खाचे अनुभव 5 सुखदु:खाचे अनुभव 6 सुखदु:खाचे अनुभव 7 सुखदु:खाचे अनुभव 8 सुखदु:खाचे अनुभव 9 सुखदु:खाचे अनुभव 10 सुखदु:खाचे अनुभव 11 सुखदु:खाचे अनुभव 12 सुखदु:खाचे अनुभव 13 सुखदु:खाचे अनुभव 14 सुखदु:खाचे अनुभव 15 सुखदु:खाचे अनुभव 16 सुखदु:खाचे अनुभव 17 सुखदु:खाचे अनुभव 18 सुखदु:खाचे अनुभव 19 सुखदु:खाचे अनुभव 20 सुखदु:खाचे अनुभव 21 सुखदु:खाचे अनुभव 22 सुखदु:खाचे अनुभव 23 सुखदु:खाचे अनुभव 24 सुखदु:खाचे अनुभव 25 सुखदु:खाचे अनुभव 26 सुखदु:खाचे अनुभव 27 सुखदु:खाचे अनुभव 28 सुखदु:खाचे अनुभव 29 सुखदु:खाचे अनुभव 30 सुखदु:खाचे अनुभव 31 सुखदु:खाचे अनुभव 32 सुखदु:खाचे अनुभव 33 सुखदु:खाचे अनुभव 34 सुखदु:खाचे अनुभव 35 सुखदु:खाचे अनुभव 36 सुखदु:खाचे अनुभव 37 सुखदु:खाचे अनुभव 38 सुखदु:खाचे अनुभव 39 सुखदु:खाचे अनुभव 40 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 1 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 2 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 3 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 4 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 5 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 6 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 7 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 8 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 9 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 10 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 11 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 12 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 13 ऐतिहासिक व देशाच्या 1 ऐतिहासिक व देशाच्या 2 ऐतिहासिक व देशाच्या 3 ऐतिहासिक व देशाच्या 4 ऐतिहासिक व देशाच्या 5 ऐतिहासिक व देशाच्या 6 ऐतिहासिक व देशाच्या 7 ऐतिहासिक व देशाच्या 8 ऐतिहासिक व देशाच्या 9 ऐतिहासिक व देशाच्या 10 व्रते, सण वगैरे 1 व्रते, सण वगैरे 2 व्रते, सण वगैरे 3 व्रते, सण वगैरे 4 व्रते, सण वगैरे 5 व्रते, सण वगैरे 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 1 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 2 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 3 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 4 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 5 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 7 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 8 पहिली माझी ओवी 1 पहिली माझी ओवी 2 पहिली माझी ओवी 3 पहिली माझी ओवी 4 पहिली माझी ओवी 5 पहिली माझी ओवी 6 सुभाषिते 1 सुभाषिते 2 सुभाषिते 3 सुभाषिते 4 सुभाषिते 5 सुभाषिते 6 सुभाषिते 7 संकीर्ण 1 संकीर्ण 2 संकीर्ण 3 संकीर्ण 4 संकीर्ण 5 संकीर्ण 6 संकीर्ण 7 संकीर्ण 8 संकीर्ण 9 संकीर्ण 10 संकीर्ण 11 सुंदर पत्रे 31 भारतीय संस्कृती 52