मायलेकरे 17
माळयाच्या मळयात विसबंद वेलीं गेला
दृष्टीसाठी गोळा केला तान्हेबाळाच्या ६१
माळयाच्या मळयात विसबंद कोंवळा
तान्हेबाळाच्या जावळा दृष्ट पडे ६२
माळयाच्या मळयात पाचूबंदीचा एक वाफा
दृष्ट होईल बापलेकां तिन्हीसांजा ६३
माळयाच्या मळयात सुगंध ये रोपारोपा
दृष्ट झाली बापलेकां भाईराया ६४
एकापुढें एक चालती बापलेक
दृष्ट होईल मागें थोप गोपूबाळा ६५
माळयाला ताकीद विसबंदाच्या रोपाची
तान्हेबाळां दृष्ट लागली सभेमधल्या लोकांची ६६
हात रे कुतर्या छूत रे मांजरा
तान्हेबाळाच्या काजळा दृष्ट पडे ६७
नका बाळाकडे असे पाहू टकमका
चिताला लागे धका माऊलीच्या ६८
दृष्ट उतरिली मीठमोहर्या नी मेथ्या
न्याहाळीत कोण होत्या तान्हेबाळाला ६९
एकापाठीमागें एक येतील शिवूमिवू
माझ्या ग राजसांना नको पापिणी दृष्ट लावू ७०
जळो जळो दृष्ट तुझ्या पाळण्यावरून गेली
निंबलोणाची जलदी केली उषाताईने ७१
जळो जळो दृष्ट मिठाचे झाले पाणी
बाळ माझे फुलावाणी कोमजलें ७२
जळो जळो दृष्ट मिठाचे झाले खडे
घडी घडी रडे तान्हेबाळ ७३
पापिणीची दृष्ट चुलीमध्ये पडो
माझा कडुलिंब वाढो तान्हेबाळ ७४
कोणें दृष्ट केली पापिणी ग वांझे
कोमेजलें तिन्हीसांजे तान्हेबाळ ७५
कोणे दृष्ट केली तान्हेबाळाच्या डोळिया
करूं पाळणेया आंथरूण ७६
कोणे दृष्ट केली तान्हेबाळाच्या काजळा
रडून भागला तान्हेबाळा ७७
गोरीया गोरेपणा नको भिऊं तू जीवाला
तुझी काळजी देवाला माउलीये ७८
दृष्ट मी काढूं किती मीठमोहर्या काळी माती
गोरेपणा जपूं किती तान्हेबाळाच्या ७९
तुला सांगितले उभे गंध लावू नको
दृष्ट पडेल जाऊ नको गोपूबाळा ८०