सुखदु:खाचे अनुभव 18
पहिल्याने गर्भार कां ग नारी चिंताक्रांत
उद्या होशील पुत्रवंत उषाताई १४१
पळी पंचपात्री कुठें जातोस ब्राह्मणा
पुत्र झाला यजमाना दादारायांना १४२
पुत्र झाला म्हणून दादाराया खोता
दणका केला मोठा सोहाळ्याचा १४३
पुत्र झाला म्हणती आम्हा कळले बावीवरी
साखर गांवावरी वाटीयेली १४४
पुत्र झाला म्हणती आम्हा साखर नाही आली
पुत्र नाही कन्या झाली उषाताईला १४५
जोशाला बोलवा आधी पंचांग बघावें
जातक करावें तान्हेबाळाचें १४६
पांचवी सहावी करावी आधी पूजा
नको दृष्ट माझ्या तान्हेबाळा १४७
नातू झाला म्हणून वाटतात पेढे
नातवासाठी वेडे लोक होती १४८
बाळंतिणी बाई नको येऊं दारा
लागेल तुला वारा दक्षिणेचा १४९
बाळ बाळंतीण आहेत खुशाल
उषाताईच्या पतीला भाईराया पत्र घाल १५०
चला सखियांनो हळदी-कुंकवाला
माझ्या ग उषाताईला भाग्याचा पुत्र झाला १५१
सोळा सोमवार केले सतरावा उजवा
रत्नाच्या पालखी माझ्या बाळाला नीजवा १५२
मला हौस मोठी ताईबाईला पुत्र व्हावा
बाळंतविडा न्यावा कडीतोडे १५३
मला हौस मोठी ताईबाईला पुत्री व्हावी
बाळंतवीड्यावरी जरीची कुंची न्यावी १५४
तुम्हा घरीं ग कारणें आम्हां घरी ग बारसं
माझं येणं होतं कसं शांताबाई १५५
देवाघरचे बाळ आलें आकार घेऊन
त्याला ठेवूं नांव सखी पालखी घालून १५६
देवाघरचें बाळ आलें सगुण साकार
त्याला ठेवूं नांव उषाताई १५७
सवाष्णींची दाटी बाळ पालखी घालती
रामकृष्णाच्या म्हणती पाळण्यांना १५८
पालखी घालून सखीया झोके देती
पाळणे गोड गाती आंदुळता १५९
माझें घर मोठें केर लोटता लोटेना
सभा बैसली उठेना गोपूबाळाची १६०