ऐतिहासिक व देशाच्या 8
पेंढार की आलें आलें मो मोने
मुरुडगांवचें सोने लुटीयेले २१
पेंढार की आलें आले ते दुपारी
बागलीणबाईची सरी लांबविली २२
आधी घेतला चंदन-वंदन मग घेतला सातारा
कुरुंदवाडकरांचा पेटारा चंदनाचा २३
आधी घेतला चंदन-वंदन मग घेतली रायरी
कुरुंदवाडकरांची पायरी चंदनाची २४
आधी घेतला चंदन-वंदन मग घेतला अरगजा
कुरुंदवाडकरांचा दरवाजा चंदनाचा २५
नारायणरावाला मारीलें हाडांचे केले फासे
आनंदीबाई हासे पुण्यामध्यें २६
नारायणरावाला मारीलें हाडांचे केले दोर
आणि पुणें ग शहरांत आनंदीबाई थोर २७
नारायणरावाला मारीलें हाडांचे केले मणी
पुण्याचे झाले धनी बाजीराव २८
नारायणरावाला मारीले मागल्या वेशीपाशी
गंगाबाई माहेराशी गेली होती २९
नारायणरावाला मारीलें आडव्या सोप्यांत
राणीचे वचनांत रघुनाथराव ३०
नारायणरावाला मारीलें मारीलें दुपारीं
गंगाबाई माहेरी होती तेव्हा ३१
नारायणरावाला मारीलें मारीलें दुपारी
त्यांनी खाल्ली होती नुकती लवंग-सुपारी ३२
नारायणरावावरी घातले मारेकरी
त्याचा प्रभूही कैवारी झाला नाही ३३
नारायणरावाला मारीलें मुडदा ठेवीला झांकोनी
आली माहेरा टाकूनी गंगाबाई ३४
नारायणरावाला मारीलें गंगाबाई गरभार
नवा भरविला दरबार रघुनाथरावांनी ३५
नारायणरावाला मारीलें गंगाबाई रडे
आनंदीबाई पेढे वांटीतसे ३६
नारायणरावाला मारीले आनंदीबाईला आनंद
तिनें तबकी गुलकंद वांटीयेला ३७
समुद्र आटला मासा करी पाणी पाणी
राज्याला झाला धनी बाजीराव ३८
आनंदीबाईनें पाप हो फार केले
म्हणून फावलें साहेबांचे ३९
आनंदीबाईनें लोकी भांडण लावीलें
म्हणून फावलें इंग्रजाला ४०