सुखदु:खाचे अनुभव 23
माडीखालीं माडी माडीला चंदन ताटल्या
तबकी तुझ्या पाटल्या उषाताई २४१
माडीखालीं माडी माडीखाली शिडी
पुतळी आहे जाडी उषाताईची २४२
भ्रताराची सेवा काय करीतां चुकली
पायां पडता देखली उषाताई २४३
भ्रताराची सेवा काय करीतां चुकली
पाय पुशी पदरानें उषाताई २४४
भ्रतार पुसतो कोठें गेली प्रियसखी
मागें उभी हंसतमुखी उषाताई २४५
भ्रतार पुसतो कोठें गेली राणी राजा
हंसत मुख सदा उषाताई २४६
कंथ विंचारीतो राणी वल्लभा कोठें गेली
नंदादीपा तेला घाली उषाताई २४७
कंथाची ग खूण दोहींच्या मधून
देत्यें सुपारी शोधून उषाताई २४८
चिकणी सुपारी तुझ्या कंथाला आवड
दिवा घेऊन निवड उषाताई २४९
चिकणी सुपारी दादारायांना लागली
वारा घालता भागली उषाताई २५०
पांच पानी खाई विडा त्यांची बत्तीशी रंगली
त्याची सुरत चांगली गोपूबाळाची २५१
पांचपानी खाई विडा डेखापासून लावी चुना
बापापरीस लेक शहाणा गोपूबाळ २५२
रात्रीची चांदणी जाते कापुराला
विडा देत्यें चतुराला उषाताई २५३
दिवाणाशीं जातां वैरी पाहती तोंडाकडे
माझ्या ग कंथाच्या विडयाला रंग चढे २५४
टिचकी वाजवीतो खिडकी उघडीतो
राणीला खुणवीतो गोपूबाळ २५५
काळी चंद्रकळा ठेवून ठेवून नेसावी
कुंकवाची चिरी माझ्या जन्माला असावी २५६
काळी चंद्रकळा ठेवून ठेवून नेसावी
सार्या जन्माला असावी मायबाई २५७
काळी चंद्रकळा पदरी मोतीजाळी
नेसली सायंकाळी उषाताई २५८
काळी चंद्रकळा कण्हेरी कांठांची
बुधवार पेठेची आणीयेली २५९
काळी चंद्रकळा पदरी रामबाण
नेसली सूर्यपान उषाताई २६०