व्रते, सण वगैरे 3
आणि आपट्याचे सोने लुटायला भाऊ जातो. घरी येतो व बहीण त्याला ओवाळते :
दसर्याचे दिशीं आपट्याची लुटालुटी
सारंगी घोडा पिटी गोपूबाळ
अंबाबाईला बायकांचे नवस असायचे :
नवस मी केला मनांतल्या मनांत
मला पावली जनांत जोगेश्वरी
ज्या गोष्टींसाठी नवस केला, ती गोष्ट मिळाली. आता मला नवस फेडू दे :
नवस मी केला नवसाजोगी झाल्यें
नवस फेडूं आले जोगेश्वरीचा
लहान मुलगी सासरी गेलेली. तिचा सांभाळ अंबाबाईने करावा म्हणून माता नवस करते :
नवस मी केला अंबाबाईला कमळ
परदेशीं तू सांभाळ उषाताईला
नवस मी केला अंबाबाईला ताम्हन
परदेशी गेली लहान उषाताई
अंबाबाईच्या पाया पडून स्त्री म्हणते :
आई अंबाबाई पडते पायां लेक
चुडे अभंग राख जन्मवेरी
शिमग्याच्या सणात बहिणीचे भाऊ डफ हाती घेतात. ते क्षणभर गमतीसाठी खेळी बनतात. बहीण कौतुकाने म्हणते :
शिमग्याच्या सणा भाऊ माझे खेळी
डफावर जाळी मोतियांची
अशी ही वर्णने आहेत. मिळाल्या ओव्या त्या देत आहे :