Get it on Google Play
Download on the App Store

देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3

राम व सीता यांची सेवा-चाकरी करणे हाच लक्ष्मणाचा आनंद. तो त्याच्यासाठी रसाळ फळे आणी. सीतेनेही वनवासातील संसाराला मधुरता आणली. स्त्रियांनी पंचवटीतील राम-सीतेच्या राहणीचे मनोहर वर्णन केले आहे. सीतेने जाईचे वेल लावले आहेत. त्यांच्या हिरव्यागार मंडपात राम आंघोळ करतो; परंतु कढत पाण्याला विसावण हवे होते. गोदावरीचे पाणी आणणे कठीण; मग रामाने तेथेच बाण मारून पाणी काढले.

रामाच्या अंघोळीला         पाणी नाहीं विसाणाला
अमृताचे झरे                 लाविले ग पाषाणाला

रामाची आंघोळ चालते. सीता सर्वत्र सडासंमार्जन करून रांगोळी काढते. रामाच्या संध्येसाठी ती स्वच्छ पाण्याचा तांब्या भरून ठेवते :

रामकुंडावरी             रामराया संध्या करी
सावळी सीताबाई             अमृताने तांब्या भरी

सीता त्या पंचवटीत कुमारिकांना परकर-चोळया वाटते. सुवासिनींना हळदीकुंकू देते, ब्राह्मणांना धोतरजोडे देते असे वर्णिले आहे. जशी एखादी भरल्या घरातील सुवासिनी वागते तशी सीता वनात राहते. सीता वनात आहे हे जणू ओव्या करणार्‍या बायका विसरल्या.

सीता रामाची शय्या तयार करते, त्याला विडा देते, त्याचे प्रेमाने पाय चेपते. रामाला घाम वगैरे आला तर सीता आपल्या पदराने तो पुसून टाकते व घाम पुसणार्‍या प्रेमळ पत्‍नीकडे राम बघतो. किती गोड हे स्वभावचित्र !

रामाला आला घाम         सीता पुसते घोळानें
पाहतसे तिच्या मुखा             रामराया ग प्रेमानें
रामराया आला घाम         सीताबाई घाली वारा
पतिसंगतीत प्रेमें             वनवास कंठी सारा

पंचवटीत थंडी फार. गोदावरीच्या तीरावर बसती, गार गार वाटायचे. त्यामुळे रामरायाला पडसे आले व सीतेने त्याला आले खायला दिले असे घरगुती सांसारिक वर्णन आहे :

रामरायाला पडसे         सीता देते त्याला आलें
पंचवटीमधें त्यांचे             पर्णकुटी घर झालें

राम व सीता यांचा वेळ तरी कसा जाई ? राम फुलझाडे लावी, सीता पाणी घाली. रानातील पाखरांची नावे सीतेने विचारावी व सीतेचे अज्ञान पाहून रामाने हसावे. मग सीतेला राग येई. तो राग हळूच हात लावून राम दूर करी :

रामरायाला पुसते         सीता पांखरांची नांवे
रामरायानें हसावें             कौतुकाने
सीता रागावली             रानी रुसून बैसली
रामरायें हासविली             स्पर्शमात्रें

रानात राहता राहता रावणाचे संकट आले. सीतेला सुवर्णमृगाच्या चर्माची चोळी शिवावी असे वाटले. मोठमोठ्यांसही मोह फसवितो :

सोन्याच्या चोळीचा         मोह सीतेला सुटला
कोण प्रपंची विटला             सर्व सुखा

सीतेला रावण नेतो. राम हिंडू लागतात. शबरी भेटते. शबरीची बोरे अधाशाप्रमाणे राम खाऊ लागले. सीतेला देत ना. ती भांडू लागली :

शबरीची बोरें             एकटा राम खाई
सीतेचें त्याच्याशी             मग गोड भांडण होई

स्त्रीजीवन

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
बहिण-भाऊ 1 बहिण-भाऊ 2 बहिण-भाऊ 3 बहिण-भाऊ 4 बहिण-भाऊ 5 बहिण-भाऊ 6 बहिण-भाऊ 7 बहिण-भाऊ 8 बहिण-भाऊ 9 बहिण-भाऊ 10 बहिण-भाऊ 11 बहिण-भाऊ 12 बहिण-भाऊ 13 बहिण-भाऊ 14 बहिण-भाऊ 15 बहिण-भाऊ 16 बहिण-भाऊ 17 बहिण-भाऊ 18 बहिण-भाऊ 19 बहिण-भाऊ 20 बहिण-भाऊ 21 बहिण-भाऊ 22 बहिण-भाऊ 23 बहिण-भाऊ 24 बहिण-भाऊ 25 मायलेकरे 1 मायलेकरे 2 मायलेकरे 3 मायलेकरे 4 मायलेकरे 5 मायलेकरे 6 मायलेकरे 7 मायलेकरे 8 मायलेकरे 9 मायलेकरे 10 मायलेकरे 11 मायलेकरे 12 मायलेकरे 13 मायलेकरे 14 मायलेकरे 15 मायलेकरे 16 मायलेकरे 17 मायलेकरे 18 मायलेकरे 19 मायलेकरे 20 मायलेकरे 21 मायलेकरे 22 मायलेकरे 23 मायलेकरे 24 मायलेकरे 25 मायलेकरे 26 मायलेकरे 27 मायलेकरे 28 मायलेकरे 29 मायलेकरे 30 मायलेकरे 31 मायलेकरे 32 मायलेकरे 33 मायलेकरे 34 मायलेकरे 35 मायलेकरे 36 मायलेकरे 37 मायलेकरे 38 मायलेकरे 39 मुलगी 1 मुलगी 2 मुलगी 3 मुलगी 4 मुलगी 5 मुलगी 6 मुलगी 7 मुलगी 8 मुलगी 9 मुलगी 10 मुलगी 11 मुलगी 12 मुलगी 13 मुलगी 14 मुलगी 15 मुलगी 16 मुलगी 17 मुलगी 18 मुलगी 19 मुलगी 20 मुलगी 21 सुखदु:खाचे अनुभव 1 सुखदु:खाचे अनुभव 2 सुखदु:खाचे अनुभव 3 सुखदु:खाचे अनुभव 4 सुखदु:खाचे अनुभव 5 सुखदु:खाचे अनुभव 6 सुखदु:खाचे अनुभव 7 सुखदु:खाचे अनुभव 8 सुखदु:खाचे अनुभव 9 सुखदु:खाचे अनुभव 10 सुखदु:खाचे अनुभव 11 सुखदु:खाचे अनुभव 12 सुखदु:खाचे अनुभव 13 सुखदु:खाचे अनुभव 14 सुखदु:खाचे अनुभव 15 सुखदु:खाचे अनुभव 16 सुखदु:खाचे अनुभव 17 सुखदु:खाचे अनुभव 18 सुखदु:खाचे अनुभव 19 सुखदु:खाचे अनुभव 20 सुखदु:खाचे अनुभव 21 सुखदु:खाचे अनुभव 22 सुखदु:खाचे अनुभव 23 सुखदु:खाचे अनुभव 24 सुखदु:खाचे अनुभव 25 सुखदु:खाचे अनुभव 26 सुखदु:खाचे अनुभव 27 सुखदु:खाचे अनुभव 28 सुखदु:खाचे अनुभव 29 सुखदु:खाचे अनुभव 30 सुखदु:खाचे अनुभव 31 सुखदु:खाचे अनुभव 32 सुखदु:खाचे अनुभव 33 सुखदु:खाचे अनुभव 34 सुखदु:खाचे अनुभव 35 सुखदु:खाचे अनुभव 36 सुखदु:खाचे अनुभव 37 सुखदु:खाचे अनुभव 38 सुखदु:खाचे अनुभव 39 सुखदु:खाचे अनुभव 40 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 1 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 2 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 3 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 4 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 5 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 6 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 7 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 8 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 9 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 10 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 11 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 12 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 13 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 14 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 15 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 16 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 17 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 18 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 19 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 20 देवादिकांच्या व पौराणिक ओव्या 21 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 1 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 2 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 3 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 4 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 5 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 6 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 7 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 8 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 9 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 10 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 11 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 12 तीर्थक्षेत्रे, पुरेपट्टणे 13 ऐतिहासिक व देशाच्या 1 ऐतिहासिक व देशाच्या 2 ऐतिहासिक व देशाच्या 3 ऐतिहासिक व देशाच्या 4 ऐतिहासिक व देशाच्या 5 ऐतिहासिक व देशाच्या 6 ऐतिहासिक व देशाच्या 7 ऐतिहासिक व देशाच्या 8 ऐतिहासिक व देशाच्या 9 ऐतिहासिक व देशाच्या 10 व्रते, सण वगैरे 1 व्रते, सण वगैरे 2 व्रते, सण वगैरे 3 व्रते, सण वगैरे 4 व्रते, सण वगैरे 5 व्रते, सण वगैरे 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 1 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 2 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 3 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 4 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 5 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 6 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 7 ऋतुवर्णन, सृष्टिवर्णन 8 पहिली माझी ओवी 1 पहिली माझी ओवी 2 पहिली माझी ओवी 3 पहिली माझी ओवी 4 पहिली माझी ओवी 5 पहिली माझी ओवी 6 सुभाषिते 1 सुभाषिते 2 सुभाषिते 3 सुभाषिते 4 सुभाषिते 5 सुभाषिते 6 सुभाषिते 7 संकीर्ण 1 संकीर्ण 2 संकीर्ण 3 संकीर्ण 4 संकीर्ण 5 संकीर्ण 6 संकीर्ण 7 संकीर्ण 8 संकीर्ण 9 संकीर्ण 10 संकीर्ण 11 सुंदर पत्रे 31 भारतीय संस्कृती 52