Get it on Google Play
Download on the App Store

ग्रंथपरिचय 5

सुत्तनिपातांतील सुत्तांचें वर्गीकरण व त्यांतील विषय :- सुत्तनिपातांतील सुत्तांचें अनेक शीर्षकांखालीं वर्गीकरण केलें जातें. ब्राह्मणधम्मिक (१९) कसिभारद्वाज (४), सुन्दरिकभारद्वाज (३०), किंवा माघ (३१), या सुत्तांत ब्राह्मणांचें जीवन व त्यांच्या यज्ञाविषयीं माहिती दिली आहे. आमगन्धसुत्तांत (१४) बुद्धधर्मांतील पावित्र्य व अपावित्र्य ह्यांसंबंधीची कल्पना व तिची तत्कालीन ब्राह्मणांच्या कल्पनेहून भिन्नता दाखविली आहे. मेत्तसुत्तांत (८) ब्रह्मविहाराची कल्पना सांगितली आहे. पराभव (६), महामंगल (१६), नावा (२०), किंसील (२१), व धम्मिक (२६), या सुत्तांत नीतिपर उपदेश दिसून येतो. हेमवत (९), सूचिलोम (१७), व आळवक (१०), ह्या सुत्तांमध्यें महाभारतांतील यक्षप्रश्नांप्रमाणें यक्षप्रश्न आढळतात. ह्यांत यक्ष गौतमबुद्धाला कांहीं प्रश्न विचारतात व बुद्ध त्यांचें शंकानिरसन करतो. धनिय (२) व कसिभारद्वाज (४) ह्या सुत्तांमध्यें सुंदर संवाद मिळतात. कांहीं निव्वळ स्तोत्रपद्धतीचीं सुत्तें आहेत. वंगीस (२४), सेल (३३) ह्या सुत्तांत बुद्धाचें गुणगान आहे. वसल (७) व वासेट्ठे (३५) ह्या सुत्तांमध्यें जन्म श्रेष्ठ कीं कर्म श्रेष्ठ याची चर्चा केली आहे. विजय (११), सल्ल (३४), काम (३९) व द्वयतानुपस्साना (३८) ह्या सुत्तांमध्यें तत्त्वज्ञानविषयक चर्चा आहे. रतनुत्त (१३) भुताखेतांपासून संरक्षण करणार्‍या स्तोत्र (परित्त)- पद्धतीप्रमाणें आहे. कोकालीय-सुत्तामध्यें (३६) पौराणिक विवेचन पद्धति असून पापी लोक नरकयोनीप्रत जाऊन तेथें दु:खें कशीं भोगतात याचें वर्णन आहे. उरग (१), खग्गविसाण (३), मुनि (१२), धम्मचरिय (१८), तिस्समेतेय्य (४५), मागन्दिय (४७), पुराभेद (४८), तुवट्टक, अत्तदण्ड आणि सारिपुत्त (५२-५४) हीं सुत्तें भिक्षूंच्या जीवनाविषयीं असून त्यांचें ध्येय व आचरण काय असावें हें त्यांत सांगितले आहे. व शेवटीं, पूर्वीच उल्लेखल्याप्रमाणें, बुद्धासंबंधीचीं कथानकें आहेत. तीं म्हणजे, पब्बज्जा (२७), पधान (२८) व नाळक सुत्तें (३७). पारायणवग्गाच्या आरंभीही (५५) कथानक असून तें ऋग्वेद किंवा महाभारतांतील१ (१. ऋ. १०.१०, ८५, ९५; महा. ३. १९२, १९४.) आख्यानपद्धतीचें आहे.

सुत्तांचीं नांवें:- सुत्तनिपातांतील सुत्तांचीं नावें एकाच ठराविक पद्धतीचीं अशीं दिलेलीं दिसत नाहींत. अट्ठकथाकारानें पुष्कळ सुत्तांना दुसरीं वैकल्पिक नांवें दिलीं आहेत विजयसुत्ताला (११) कायविच्छन्दनिकसुत्त असेंही म्हणतात. नावासुत्ताला (२०) धम्मसुत्त, सुन्दरिकभारद्वजाला (३०) पूरळास, धम्मचरियाला (१८) कपिल, सम्मापरिब्बाजनियाला (२५) महासमय व सारिपुत्तसुत्ताला (५४) थेरपञ्हसुत्त-अशीही नांवें दिलेलीं आढळतात. नांवें देण्याच्या पद्धतींत खालील प्रकार दिसतात:-

(अ) पब्बज्जा (२७), पधान (२८), विजय (११), मुनि (१२), व ब्राह्मण-धम्मिक (१९)—ह्या सुत्तांना त्यांच्या त्यांच्या विषयांवरून शीर्षकें दिली आहेत. (आ) धनिय (२), सेल (३३), नाळक (३७), माघ (३१), व सभिय (३२) ह्या सुत्तांना त्यांतील महत्त्वाच्या व्यक्तीवरून नांवें दिली आहेत. (इ) उरग (१), खग्गविसाण (३), पराभव (६), नावा (३०), पसूर (४६), पुराभेद (४८) या सुत्तांना त्यांतील धृपदांतील किंवा इतर ठिकाणच्या एखाद्या महत्त्वाच्या शब्दावरून किंवा एखाद्या उपमेवरून नांवें दिलीं आहेत. (ई) हिरि (१५) व किंसील (२१) या सुत्तांना त्यांच्या सुरवातीच्या शब्दांवरून नावें दिलीं आहेत.

सुत्तनिपाताच्या अंतरंगाचें परीक्षण :- (अ) श्रमण—सुत्तनिपातांत बौद्धधर्माची प्राथमिक अवस्थाच दिसून येते असें वर म्हटलेंच आहे. उत्तरकालीन मठव्यवस्था दिसून येत नाहीं. बुद्धाच्या काळीं धर्मोपदेश करीत करीत आपापल्या धर्माचें तत्त्वज्ञान सांगत हिंडणारे धर्मगुरू आढळून येत. पूरणकस्सप, मक्खलिगोसाल, अजितकेसकंबली, पकुधकच्चायन, संजयबेलट्ठिपुत्त व निगण्ठनातपुत्त-हे वेगवेगळ्या सहा पंथांचे गुरू होते. त्यांचे अनुयायी आजीविक, निगण्ठ इत्यादि व इतर ब्राह्मण हे वादप्रिय म्हणून प्रसिद्ध असल्याचें सांगितलें आहे (३८१-८२).

सुत्तनिपात

धर्मानंद कोसंबी
Chapters
प्रास्ताविक चार शब्द 1 प्रास्ताविक चार शब्द 2 भाषातरकारांची प्रस्तावना 1 भाषातरकारांची प्रस्तावना 2 भाषातरकारांची प्रस्तावना 3 ग्रंथपरिचय 1 ग्रंथपरिचय 2 ग्रंथपरिचय 3 ग्रंथपरिचय 4 ग्रंथपरिचय 5 ग्रंथपरिचय 6 ग्रंथपरिचय 7 ग्रंथपरिचय 8 ग्रंथपरिचय 9 ग्रंथपरिचय 10 ग्रंथपरिचय 11 ग्रंथपरिचय 12 सुत्तनिपात 1 सुत्तनिपात 2 सुत्तनिपात 3 सुत्तनिपात 4 सुत्तनिपात 5 सुत्तनिपात 6 सुत्तनिपात 7 सुत्तनिपात 8 सुत्तनिपात 9 सुत्तनिपात 10 सुत्तनिपात 11 सुत्तनिपात 12 सुत्तनिपात 13 सुत्तनिपात 14 सुत्तनिपात 15 सुत्तनिपात 16 सुत्तनिपात 17 सुत्तनिपात 18 सुत्तनिपात 19 सुत्तनिपात 20 सुत्तनिपात 21 सुत्तनिपात 22 सुत्तनिपात 23 सुत्तनिपात 24 सुत्तनिपात 25 सुत्तनिपात 26 सुत्तनिपात 27 सुत्तनिपात 28 सुत्तनिपात 29 सुत्तनिपात 30 सुत्तनिपात 31 सुत्तनिपात 32 सुत्तनिपात 33 सुत्तनिपात 34 सुत्तनिपात 35 सुत्तनिपात 36 सुत्तनिपात 37 सुत्तनिपात 38 सुत्तनिपात 39 सुत्तनिपात 40 सुत्तनिपात 41 सुत्तनिपात 42 सुत्तनिपात 43 सुत्तनिपात 44 सुत्तनिपात 45 सुत्तनिपात 46 सुत्तनिपात 47 सुत्तनिपात 48 सुत्तनिपात 49 सुत्तनिपात 50 सुत्तनिपात 51 सुत्तनिपात 52 सुत्तनिपात 53 सुत्तनिपात 54 सुत्तनिपात 55 सुत्तनिपात 56 सुत्तनिपात 57 सुत्तनिपात 58 सुत्तनिपात 59 सुत्तनिपात 60 सुत्तनिपात 61 सुत्तनिपात 62 सुत्तनिपात 63 सुत्तनिपात 64 सुत्तनिपात 65 सुत्तनिपात 66 सुत्तनिपात 67 सुत्तनिपात 68 सुत्तनिपात 69 सुत्तनिपात 70 सुत्तनिपात 71 सुत्तनिपात 72 सुत्तनिपात 73 सुत्तनिपात 74 सुत्तनिपात 75 सुत्तनिपात 76 सुत्तनिपात 77 सुत्तनिपात 78 सुत्तनिपात 79 सुत्तनिपात 80 सुत्तनिपात 81 सुत्तनिपात 82 सुत्तनिपात 83 सुत्तनिपात 84 सुत्तनिपात 85 सुत्तनिपात 86 सुत्तनिपात 87 सुत्तनिपात 88 सुत्तनिपात 89 सुत्तनिपात 90 सुत्तनिपात 91 सुत्तनिपात 92 सुत्तनिपात 93 सुत्तनिपात 94 सुत्तनिपात 95 सुत्तनिपात 96 सुत्तनिपात 97 सुत्तनिपात 98 सुत्तनिपात 99 सुत्तनिपात 100 सुत्तनिपात 101 सुत्तनिपात 102 सुत्तनिपात 103 सुत्तनिपात 104 सुत्तनिपात 105 सुत्तनिपात 106 सुत्तनिपात 107 सुत्तनिपात 108 सुत्तनिपात 109 सुत्तनिपात 110 सुत्तनिपात 111 सुत्तनिपात 112 सुत्तनिपात 113 सुत्तनिपात 114 सुत्तनिपात 115 सुत्तनिपात 116 सुत्तनिपात 117 सुत्तनिपात 118 सुत्तनिपात 119 सुत्तनिपात 120 सुत्तनिपात 121 सुत्तनिपात 122 सुत्तनिपात 123 सुत्तनिपात 124 सुत्तनिपात 125 सुत्तनिपात 126 सुत्तनिपात 127 सुत्तनिपात 128 सुत्तनिपात 129 सुत्तनिपात 130 सुत्तनिपात 131 सुत्तनिपात 132 सुत्तनिपात 133 सुत्तनिपात 134 सुत्तनिपात 135 सुत्तनिपात 136 सुत्तनिपात 137 सुत्तनिपात 138 सुत्तनिपात 139 सुत्तनिपात 140 सुत्तनिपात 141 सुत्तनिपात 142 सुत्तनिपात 143 सुत्तनिपात 144 सुत्तनिपात 145 सुत्तनिपात 146 सुत्तनिपात 147 सुत्तनिपात 148 सुत्तनिपात 149 सुत्तनिपात 150 सुत्तनिपात 151 सुत्तनिपात 152 सुत्तनिपात 153 सुत्तनिपात 154 सुत्तनिपात 155 सुत्तनिपात 156 सुत्तनिपात 157 सुत्तनिपात 158 सुत्तनिपात 159 सुत्तनिपात 160 सुत्तनिपात 161 सुत्तनिपात 162 सुत्तनिपात 163 सुत्तनिपात 164 सुत्तनिपात 165 सुत्तनिपात 166 सुत्तनिपात 167 सुत्तनिपात 168 सुत्तनिपात 169 सुत्तनिपात 170 सुत्तनिपात 171 सुत्तनिपात 172 सुत्तनिपात 173 सुत्तनिपात 174 सुत्तनिपात 175 सुत्तनिपात 176 सुत्तनिपात 177 सुत्तनिपात 178 सुत्तनिपात 179 सुत्तनिपात 180 सुत्तनिपात 181 सुत्तनिपात 182 सुत्तनिपात 183 सुत्तनिपात 184 सुत्तनिपात 185 सुत्तनिपात 186 सुत्तनिपात 187 सुत्तनिपात 188 सुत्तनिपात 189 सुत्तनिपात 190 सुत्तनिपात 191 सुत्तनिपात 192 सुत्तनिपात 193 सुत्तनिपात 194 सुत्तनिपात 195 सुत्तनिपात 196 सुत्तनिपात 197 सुत्तनिपात 198 सुत्तनिपात 199 सुत्तनिपात 200 सुत्तनिपात 201 सुत्तनिपात 202 सुत्तनिपात 203 सुत्तनिपात 204 सुत्तनिपात 205 सुत्तनिपात 206 सुत्तनिपात 207 सुत्तनिपात 208 सुत्तनिपात 209 सुत्तनिपात 210 सुत्तनिपात 211 सुत्तनिपात 212 सुत्तनिपात 213 सुत्तनिपात 214 सुत्तनिपात 215 सुत्तनिपात 216 सुत्तनिपात 217 सुत्तनिपात 218 सुत्तनिपात 219 सुत्तनिपात 220 सुत्तनिपात 221 सुत्तनिपात 222 सुत्तनिपात 223 सुत्तनिपात 224 सुत्तनिपात 225 सुत्तनिपात 226 सुत्तनिपात 227 सुत्तनिपात 228 सुत्तनिपात 229