ग्रंथपरिचय 11
देव व गन्धर्व देखील त्याची स्थिति जाणत नाहींत (६४४). ही शब्दातीत स्थिति आहे. बावरीच्या सोळा शिष्यांपैकीं एकानें म्हणजे उपसीवानें बुद्धाला प्रश्न विचारला कीं, मुनि विमुक्त झाल्यानंतर तो कोणच्या स्थितींत असतो? तो उच्छेद पावतो कीं शाश्वत कालपर्यंत निरोगी असा असतो? बुद्धानें उत्तर केलें कीं, तो अस्तंगत आहे. त्याची मोजमापानें गणना केली जात नाहीं, व कोणचेही शब्द त्याचें वर्णन करूं शकत नाहींत.
अत्थंगतस्स न पमाणमत्थि । येन नं वज्जु तं तस्स नत्थि ।
सब्बेसु धम्मेसु समूहतेसु । समूहता वादपथाऽपि सब्बे ।। (१०७६)
बुद्धधर्म : नीतिधर्म-- बुद्धधर्माला नीतिधर्म असेंही कित्येक वेळां म्हटलें जातें व ह्याला भरपूर बळकटी सुत्तनिपातांत आढळते. ईश्वराबद्दल जरी बुद्धधर्मांत- विशेषत: प्राचीन बुद्धधर्मांत-मुग्धता बाळगलेली आढळते, तरी बौद्ध लोक देव-देवता, स्वर्ग, नरक, कर्म, पुनर्जन्म यांवर विश्वास ठेवतात. ब्राह्मणांचे देव, शक्र, ब्रह्मा, वगैरे-ह्यांना बुद्धापेक्षां ते कनिष्ठ समजतात व ते बुद्धाकडे येऊन त्याला वन्दन करतात असें वर्णन आढळतें. नीतिमय आयुष्य घालविण्याबद्दल व जगाचें खरें स्वरूप जाणण्याबद्दल भिक्षूंना व गृहस्थलोकांना बुद्ध नेहमीं उपदेश करीत असे. धम्मिकसुत्तांत (२६) नीतिमय आयुष्य घालविण्याबद्दलचे नियम सांगितले आहेत व त्या नियमांचें पालन झालें म्हणजे गृहस्थ-व्रताचें पालन झालें. ह्या नीतिपरतेचे दुसरे लक्षण जें दिसून येतें तें हें कीं, ब्राह्मण, श्रमण, स्नातक (न्हातक) खेत्तजिन, वेदगू, परिब्बाजक, नाग, पण्डित, सोत्थिय, इत्यादि शब्दांचा अर्थ नीतिपर लावणें होय. अशा तर्हेचे या शब्दांचे अर्थ सभियसुत्तांत (३२) दिलेले आढळतात.
भाषा व विचारमांडणी :- सुत्तनिपाताचें प्रचीनत्व त्याच्या विषयांप्रमाणें त्याच्या भाषेवरूनही दिसून येते. डॉ. फाउसबोल ह्यांनीं खालील विशेषाकडे विद्वानांचें लक्ष वेधलेंच आहे :-
नामांची व क्रियापदांचीं वैदिक बहुवचनी रूपें-समूहतासे (१४), पच्चयासे (१५), पण्डितासे (८७५-७६); किंवा, चरामसे (३२), सिक्खिसामसे (८१४).
संक्षिप्त रूपें-विनिच्छया, लक्खणा, (विनिच्छयानि, लक्खणानि); मन्ता, परिञ्ञा, लाभकभ्या (मन्ताय, परिञ्ञाय, लाभकभ्याय) सन्त्या, दुग्गच्चा, तिथ्या, सम्मुच्चा, थियो.
कांहीं ठिकाणीं छन्दाकरितां रूपें संक्षिप्त केलेलीं आहेत—
तद (तदा) ६८५, जनेत्व (जनेत्वा) ६९५, यद (यदा) ६९६, सिंचित्व (सिंचित्वा) ६७१.
वैदिक कृदन्त रूपें : विप्पहातवे, उण्णमेतवे, संपयातवे, (वैदिक तवै-प्रत्ययापासून).
वाढविलेलीं रूपें—आतुमानं (८८८), सुवामि (६६६), सुवाना (२१०).
आर्षरूपें—सग्घसि (सक्खिस्ससि), पाव किंवा पावा (पवदति), पवेच्छे (पवेसेय्य), सुस्सं (सुणिस्सामि), दट्ठु (दिस्वा), परिब्बसानो (परिवसमानो), अवोचासि (अवोच), रुण्णेन (रुदितेन) ५८४, उग्गहायान्त (उग्गण्हन्ति) ७९१.
अनियमित शब्द—व्यप्पथ (१६४, ९६१), भुनहू, पटिसेनियन्ति, क्यास्स (९६१), उपय (७८७), अवविदाता (७८४).
कांहीं ठिकाणीं सांकेतिक शब्दयोजना किंवा संक्षिप्त रचना आढळते—कुप्पपटिच्चसन्ति (७८४), सञ्ञसञ्ञी, विसञ्ञसञ्ञी, विभूतसञ्ञी (८७४), दिगुण. एकगुण (७१४).