सुत्तनिपात 146
पाली भाषेत :-
७२४ ये दुक्खं नप्पजानन्ति अथो दुक्खस्स संभवं।
यत्थ च सब्बसो दुक्खं असेसं उपरुज्झति।तं मग्गं न जानन्ति दुक्खूपसमगामिनं।।१।।
७२५ चेतोविमुत्तिहीना ते अथो पञ्ञाविमुत्तिया।
अभब्बा ते अन्तकिरियाय ते वे जातिजरूपगा।।२।।
७२६ ये च दुक्खं पजानन्ति अथो दुक्खस्स संभवं।
यत्थ च सब्बसो दुक्खं असेसं उपरुज्झति।
तं च मग्गं पजानन्ति दुक्खूपसमगामिनं।।३।।
७२७ चेतोविमुत्तिसंपन्ना अथो पञ्ञाविमुत्तिया।
भब्बा ते अन्तकिरियाय न ते जातिजरूपगा ति।।४।।
सिया अञ्ञेन पि परियायेन सम्माद्वयतानुपस्सना ति, इति चे भिक्खवे पुच्छितारो अस्सु, सिया तिऽस्सु वचनीया। कथं च सिया। यं किंचि दुक्खं सम्भोति, सब्बं उपधिपच्चया ति अयं एकानुपस्सना, उपधीनं त्वेव असेसविरागनिरोधा नत्थि दुक्खस्स सम्भवो ति अयं दुतियानुपस्सना। एवं सम्मा.....पे....अथापरं एतदवोच सत्था—
मराठी अनुवादः-
७२४ जे दु:ख आणि दु:खाचा उगम जाणत नाहींत, आणि तें दु:ख जेथें नि:शेष विरोध पावतें तें स्थान (निर्वाण), व त्या दु:खनिरोधाप्रत जाणारा मार्ग जाणत नाहींत, (१)
७२५. त्यांना चित्ताची विमुक्ति आणि प्रज्ञेनें मिळालेली विमुक्ति नाहीं; ते (संसारदु:खाचा) अन्त करूं शकत नाहीत, आणि तेच जन्मजरा पावतात.(२)
७२६ जे दु:ख आणि दु:खाचा उगम जाणतात, आणि तें दु:ख जेथें नि:शेष निरोध पावतें तें स्थान व त्या दु:खनिरोधाप्रत जाणारा मार्ग जाणतात, (३)
७२७ ते चित्तविमुक्तीनें व प्रज्ञेनें मिळविलेल्या विमुक्तीनें संपन्न होत;ते (संसारदु:खाचा) अन्त करण्यास समर्थ होत आणि ते जन्मजरा पावत नाहींत.(४)
दुसर्याही पर्यायानें सम्यक्-द्वैतानुपश्यना असेल काय असें जर, भिक्षूंनो, तुम्हांस कोणी विचारणारे भेटतील तर, अशी असेल, असें त्यांस म्हणावें. ती कशी? जें कांहीं दु:ख उद्भवतें, तें सर्व उपाधींपासून, हीं एक अनुपश्यना, आणि उपाधींचा वैराग्यानें अशेष निरोध केल्यानें दु:खाचा उद्भव होत नाहीं, ही दुसरी अनुपश्यना. भिक्षूंनो, याप्रमाणें द्वैताची...इत्यादी...तो सुगत शास्ता म्हणाला—