Get it on Google Play
Download on the App Store

प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 5

बड्या लाटसाहेबांच्या कार्यकारिणीतील काही सभासदांची नेमणूक खास इंग्लंडमधून एकदम होते.  हिंदी सनदी नोकरवर्गापैकी ते नसतात.  सिव्हिल सर्व्हिसमधील लोकांचे वागणे-बोलणे आणि यांचे वागणे-बोलणे यांत पुष्कळदा स्पष्ट फरक दिसतो.  त्या चौकटीत त्यांना काम करणे कठीण जात नाही.  परंतु हुकमी सत्तेची बेपर्वाई व अहंमन्य मुद्रा धारण करून वागणे तितके सहजपणे त्यांना जमत नाही.  विशेषत: या कार्यकारिणीचे (नुकते अलीकडेच नेमणुकी होऊ लागलेले) जे हिंदी सभासद आहेत त्यांना तर हे मुळीच जमत नाही.  त्या बिचार्‍यांची बुध्दिमत्ता कितीही असली व संख्याही बरीच असली तरी ते या नाटकमंडळीतील सटरफटर पात्रे गणली जातात हे उघड दिसते.  सनदी नोकरवर्गातील हिंदी लोक चढत्या अधिकारपदाच्या कोणत्याही श्रेणीचे असोत, त्यांना आतल्या गोटात घेतले जात नाही.  काही थोडे मोर नाचतो म्हणून आपणही नाचण्याची ऐट आणतात.  परंतु त्यांना ते तितकेसे जमत नाही.  त्या पोकळ बढाईपायी त्यांची चेष्टा मात्र होते.

मला वाटते की, हिंदी सनदी नोकरांतील गोर्‍या लोकांची नवी पिढी जुन्या पिढीपेक्षा मनोरचनेने थोडी निराळी आहे.  जुन्या चौकटीत ते एकदम नेटके बसत नाहीत.  परंतु राज्याची सत्ता व धोरण अनुभवी व मुरब्बी जुन्या सभासदांच्या हाती असल्यामुळे त्यांना तद्‍नुरूप व्हावे लागते.  प्रस्थापित परंपरा, सनदी नोकरांचा बडा धर्म त्यांना पत्करावा लागतो.  नाहीतर राजीनामा देऊन घराचा रस्ता सुधारावा लागतो.

मला आठवते की, माझ्या लहानपणी प्रसिध्द होणार्‍या हिंदुस्थानातील ब्रिटिश मालकीच्या वृत्तपत्रांतून या अधिकार्‍यांविषयी बातम्या आणि त्यांचे वक्तव्य हेच फक्त असे.  बदल्या, बढत्या, नोकरीतील इतर सटरफटर गोष्टी; इंग्रज लोकांच्या लीला, त्यांच्या करमणुकी; त्यांचे ते पोलो, शर्यती, नाचतमाशे आणि नवशिक्यांचे नाट्यप्रयोग यांनी त्यांची वृत्तपत्रे भरलेली असत.  हिंदी लोकांविषयी, हिंदी लोकांच्या राजकारणाविषयी, सांस्कृतिक, सामाजिक किंवा आर्थिक जीवनाविषयी त्यात एक अक्षरही नसे.  ही वर्तमानपत्रे वाचून हिंदी लोक अशी काही वस्तू आहे अशी शंकासुध्दा कोणाला येण्याचे काही कारण नव्हते.

मुंबईला क्रिकेटचे चौरंगी सामने होत असत.  हिंदू, मुसलमान, पारशी आणि युरोपियन अशा चौघांचे संघ असत.  परंतु युरोपियनांच्या संघाला नाव 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' असे असे.  बाकीच्यांना नुसती हिंदू, मुसलमान, पारशी अशी नावे असत.  परंतु मुंबई इलाख्याचे प्रतिनिधी कोण तर युरोपियन !  बाकीचे जणू परके-उपरे, आणि म्हणून त्यांना तेवढ्याकरता ती विशिष्ट नावे.  परंतु युरोपियन संघ म्हणजे बॉम्बे प्रेसिडेन्सी संघ !  हे चौरंगी सामने अजूनही होत असतात.  जातीय तत्त्वावर हे व्हावेत की होऊ नयेत म्हणून पुष्कळ भवती न भवती होत असते.  परंतु बॉम्बे प्रेसिडेन्सी संघ हे नाव जाऊन आता युरोपियनांच्या संघाला युरोपियन संघ असेच म्हणतात असे मी समजतो.

हिंदुस्थानातील इंग्रजांच्या क्लबांना प्रांतिक वा प्रादेशिक नावे असत : अलाहाबाद क्लब, बंगाल क्लब इत्यादी.  या क्लबांतून इंग्रजांना किंवा खरोखर गोर्‍यांना, युरोपियनांनाच फक्त प्रवेश असे.  प्रादेशिक किंवा प्रांतिक नावे घ्यायला किंवा आपापल्यापुरतेच—दुसर्‍यांना आत न घेणार— असे क्लब असायला हरकत नाही.  दुसर्‍यांनी आपल्यात येणे त्यांना नसेल आवडत तर ठीक.  परंतु ती प्रांतिक किंवा प्रादेशिक नावे घेण्याचे कारण ब्रिटिशांना लागलेली जुनी सवय की हिंदुस्थानात कोणाला किंमत असेल, हिंदुस्थान म्हणून मिरवायचा कोणाला अधिकार असेल तर तो फक्त त्यांनाच.  खरा बंगाल, खरे अलाहाबाद म्हणजे त्यातले ब्रिटिश लोक, बाकीचे सगळे लोक म्हणजे फालतू वाढ, ते अलबते-गलबते.  आपल्या पायरीने अदबीने वागले तरच त्यांचा काही उपयोग, नाहीतर त्यांची उगीच कटकट.  एकच रीतभात व एकाच संस्कृतीच्या ओढीने चार लोक फुरसतीच्या वेळी खेळण्याकरता किंवा भेटून मनमोकळे चार घटका एकमेकांच्या सहवासात घालविण्याकरता जमले, व तेथे त्यांना इतर कोणी येणे आवडत नसले, तर ते अगदी योग्य आहे.  पण ह्या क्लबातून युरोपियनेतरांना मज्जाव असण्याचे कारण आपण युरोपियन असा वंशाभिमानाचा तोरा हेच मुख्य आहे.  इंग्रजांनी किंवा युरोपियनांनी आपल्यापुरते क्लबे चालवले तर मला तरी त्याचे काही वाटणार नाही; आणि कोणा हिंदी माणसाचेही तिकडे जायचे अडले नाही.  परंतु हिंदी लोकांना वगळण्यात उघडउघड सत्तांधता आणि अहंमन्यता आहे, युरोपियनांची जात वरची अशी त्यात कल्पना आहे; आणि म्हणून या प्रकाराला वेगळेच स्वरूप येते.  मुंबईत एक युरोपियनांचा सुप्रसिध्द क्लब असा आहे की, त्यात नोकराखेरीज इतर हिंदी मनुष्य, एखादा संस्थानिक असो किंवा मोठ्यातला मोठा कारखानदार असो, त्या क्लबाच्या प्रेक्षकांच्या व पाहुण्यांच्या खोलीतही त्याला परवानगी नव्हती व अजूनही नसेल.

भारताचा शोध

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 1 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 2 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 3 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 4 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 5 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 6 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 7 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 8 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 9 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 10 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 11 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 12 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 13 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 14 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 15 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 16 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 17 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 18 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 19 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 20 प्रकरण १: अहमद नगरचा किल्ला 21 प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 1 प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 2 प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 3 प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 4 प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 5 प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 6 प्रकरण २ : बेडेनवेलर : लॉसेन 7 प्रकरण ३ : शोध 1 प्रकरण ३ : शोध 2 प्रकरण ३ : शोध 3 प्रकरण ३ : शोध 4 प्रकरण ३ : शोध 5 प्रकरण ३ : शोध 6 प्रकरण ३ : शोध 7 प्रकरण ३ : शोध 8 प्रकरण ३ : शोध 9 प्रकरण ३ : शोध 10 प्रकरण ३ : शोध 11 प्रकरण ३ : शोध 12 प्रकरण ३ : शोध 13 प्रकरण ३ : शोध 14 प्रकरण ३ : शोध 15 प्रकरण ३ : शोध 16 प्रकरण ३ : शोध 17 प्रकरण ३ : शोध 18 प्रकरण ३ : शोध 19 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 1 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 2 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 3 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 4 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 5 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 6 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 7 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 8 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 9 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 10 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 11 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 12 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 13 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 14 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 15 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 16 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 17 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 18 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 19 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 20 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 21 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 22 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 23 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 24 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 25 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 26 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 27 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 28 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 29 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 30 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 31 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 32 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 33 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 34 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 35 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 36 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 37 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 38 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 39 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 40 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 41 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 42 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 43 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 44 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 45 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 46 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 47 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 48 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 49 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 50 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 51 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 52 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 53 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 54 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 55 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 56 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 57 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 58 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 59 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 60 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 61 प्रकरण ४ : भारताचा साक्षात्कार 62 प्रकरण ५ : युगायुगांतून 1 प्रकरण ५ : युगायुगांतून 2 प्रकरण ५ : युगायुगांतून 3 प्रकरण ५ : युगायुगांतून 4 प्रकरण ५ : युगायुगांतून 5 प्रकरण ५ : युगायुगांतून 6 प्रकरण ५ : युगायुगांतून 7 प्रकरण ५ : युगायुगांतून 8 प्रकरण ५ : युगायुगांतून 9 प्रकरण ५ : युगायुगांतून 10 प्रकरण ५ : युगायुगांतून 11 प्रकरण ५ : युगायुगांतून 12 प्रकरण ५ : युगायुगांतून 13 प्रकरण ५ : युगायुगांतून 14 प्रकरण ५ : युगायुगांतून 15 प्रकरण ५ : युगायुगांतून 16 प्रकरण ५ : युगायुगांतून 17 प्रकरण ५ : युगायुगांतून 18 प्रकरण ५ : युगायुगांतून 19 प्रकरण ५ : युगायुगांतून 20 प्रकरण ५ : युगायुगांतून 21 प्रकरण ५ : युगायुगांतून 22 प्रकरण ५ : युगायुगांतून 23 प्रकरण ५ : युगायुगांतून 24 प्रकरण ५ : युगायुगांतून 25 प्रकरण ५ : युगायुगांतून 26 प्रकरण ५ : युगायुगांतून 27 प्रकरण ५ : युगायुगांतून 28 प्रकरण ५ : युगायुगांतून 29 प्रकरण ५ : युगायुगांतून 30 प्रकरण ५ : युगायुगांतून 31 प्रकरण ५ : युगायुगांतून 32 प्रकरण ५ : युगायुगांतून 33 प्रकरण ५ : युगायुगांतून 34 प्रकरण ५ : युगायुगांतून 35 प्रकरण ५ : युगायुगांतून 36 प्रकरण ५ : युगायुगांतून 37 प्रकरण ५ : युगायुगांतून 38 प्रकरण ५ : युगायुगांतून 39 प्रकरण ५ : युगायुगांतून 40 प्रकरण ५ : युगायुगांतून 41 प्रकरण ५ : युगायुगांतून 42 प्रकरण ५ : युगायुगांतून 43 प्रकरण ५ : युगायुगांतून 44 प्रकरण ५ : युगायुगांतून 45 प्रकरण ५ : युगायुगांतून 46 प्रकरण ५ : युगायुगांतून 47 प्रकरण ५ : युगायुगांतून 48 प्रकरण ५ : युगायुगांतून 49 प्रकरण ५ : युगायुगांतून 50 प्रकरण ५ : युगायुगांतून 51 प्रकरण ५ : युगायुगांतून 52 प्रकरण ५ : युगायुगांतून 53 प्रकरण ५ : युगायुगांतून 54 प्रकरण ५ : युगायुगांतून 55 प्रकरण ५ : युगायुगांतून 56 प्रकरण ५ : युगायुगांतून 57 प्रकरण ५ : युगायुगांतून 58 प्रकरण ५ : युगायुगांतून 59 प्रकरण ५ : युगायुगांतून 60 प्रकरण ५ : युगायुगांतून 61 प्रकरण ५ : युगायुगांतून 62 प्रकरण ५ : युगायुगांतून 63 प्रकरण ५ : युगायुगांतून 64 प्रकरण ५ : युगायुगांतून 65 प्रकरण ५ : युगायुगांतून 66 प्रकरण ५ : युगायुगांतून 67 प्रकरण ५ : युगायुगांतून 68 प्रकरण ५ : युगायुगांतून 69 प्रकरण ५ : युगायुगांतून 70 प्रकरण ५ : युगायुगांतून 71 प्रकरण ५ : युगायुगांतून 72 प्रकरण ५ : युगायुगांतून 73 प्रकरण ५ : युगायुगांतून 74 प्रकरण ५ : युगायुगांतून 75 प्रकरण ५ : युगायुगांतून 76 प्रकरण ५ : युगायुगांतून 77 प्रकरण ५ : युगायुगांतून 78 प्रकरण ५ : युगायुगांतून 79 प्रकरण ५ : युगायुगांतून 80 प्रकरण ५ : युगायुगांतून 81 प्रकरण ५ : युगायुगांतून 82 प्रकरण ५ : युगायुगांतून 83 प्रकरण ५ : युगायुगांतून 84 प्रकरण ५ : युगायुगांतून 85 प्रकरण ५ : युगायुगांतून 86 प्रकरण ५ : युगायुगांतून 87 प्रकरण ५ : युगायुगांतून 88 प्रकरण ५ : युगायुगांतून 89 प्रकरण ६ : नवीन समस्या 1 प्रकरण ६ : नवीन समस्या 2 प्रकरण ६ : नवीन समस्या 3 प्रकरण ६ : नवीन समस्या 4 प्रकरण ६ : नवीन समस्या 5 प्रकरण ६ : नवीन समस्या 6 प्रकरण ६ : नवीन समस्या 7 प्रकरण ६ : नवीन समस्या 8 प्रकरण ६ : नवीन समस्या 9 प्रकरण ६ : नवीन समस्या 10 प्रकरण ६ : नवीन समस्या 11 प्रकरण ६ : नवीन समस्या 12 प्रकरण ६ : नवीन समस्या 13 प्रकरण ६ : नवीन समस्या 14 प्रकरण ६ : नवीन समस्या 15 प्रकरण ६ : नवीन समस्या 16 प्रकरण ६ : नवीन समस्या 17 प्रकरण ६ : नवीन समस्या 18 प्रकरण ६ : नवीन समस्या 19 प्रकरण ६ : नवीन समस्या 20 प्रकरण ६ : नवीन समस्या 21 प्रकरण ६ : नवीन समस्या 22 प्रकरण ६ : नवीन समस्या 23 प्रकरण ६ : नवीन समस्या 24 प्रकरण ६ : नवीन समस्या 25 प्रकरण ६ : नवीन समस्या 26 प्रकरण ६ : नवीन समस्या 27 प्रकरण ६ : नवीन समस्या 28 प्रकरण ६ : नवीन समस्या 29 प्रकरण ६ : नवीन समस्या 30 प्रकरण ६ : नवीन समस्या 31 प्रकरण ६ : नवीन समस्या 32 प्रकरण ६ : नवीन समस्या 33 प्रकरण ६ : नवीन समस्या 34 प्रकरण ६ : नवीन समस्या 35 प्रकरण ६ : नवीन समस्या 36 प्रकरण ६ : नवीन समस्या 37 प्रकरण ६ : नवीन समस्या 38 प्रकरण ६ : नवीन समस्या 39 प्रकरण ६ : नवीन समस्या 40 प्रकरण ६ : नवीन समस्या 41 प्रकरण ६ : नवीन समस्या 42 प्रकरण ६ : नवीन समस्या 43 प्रकरण ६ : नवीन समस्या 44 प्रकरण ६ : नवीन समस्या 45 प्रकरण ६ : नवीन समस्या 46 प्रकरण ६ : नवीन समस्या 47 प्रकरण ६ : नवीन समस्या 48 प्रकरण ६ : नवीन समस्या 49 प्रकरण ६ : नवीन समस्या 50 प्रकरण ६ : नवीन समस्या 51 प्रकरण ६ : नवीन समस्या 52 प्रकरण ६ : नवीन समस्या 53 प्रकरण ६ : नवीन समस्या 54 प्रकरण ६ : नवीन समस्या 55 प्रकरण ६ : नवीन समस्या 56 प्रकरण ६ : नवीन समस्या 57 प्रकरण ६ : नवीन समस्या 58 प्रकरण ६ : नवीन समस्या 59 प्रकरण ६ : नवीन समस्या 60 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 1 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 2 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 3 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 4 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 5 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 6 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 7 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 8 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 9 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 10 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 11 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 12 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 13 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 14 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 15 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 16 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 17 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 18 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 19 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 20 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 21 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 22 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 23 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 24 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 25 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 26 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 27 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 28 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 29 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 30 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 31 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 32 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 33 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 34 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 35 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 36 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 37 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 38 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 39 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 40 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 41 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 42 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 43 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 44 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 45 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 46 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 47 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 48 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 49 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 50 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 51 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 52 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 53 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 54 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 55 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 56 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 57 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 58 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 59 प्रकरण ७ : अंतिम परिस्थिती (१) 60 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 1 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 2 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 3 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 4 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 5 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 6 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 7 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 8 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 9 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 10 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 11 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 12 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 13 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 14 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 15 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 16 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 17 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 18 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 19 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 20 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 21 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 22 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 23 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 24 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 25 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 26 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 27 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 28 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 29 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 30 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 31 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 32 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 33 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 34 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 35 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 36 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 37 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 38 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 39 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 40 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 41 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 42 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 43 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 44 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 45 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 46 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 47 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 48 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 49 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 50 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 51 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 52 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 53 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 54 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 55 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 56 प्रकरण ८ : अंतिम परिस्थिती (२) 57 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 1 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 2 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 3 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 4 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 5 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 6 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 7 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 8 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 9 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 10 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 11 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 12 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 13 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 14 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 15 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 16 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 17 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 18 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 19 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 20 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 21 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 22 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 23 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 24 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 25 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 26 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 27 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 28 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 29 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 30 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 31 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 32 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 33 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 34 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 35 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 36 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 37 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 38 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 39 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 40 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 41 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 42 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 43 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 44 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 45 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 46 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 47 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 48 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 49 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 50 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 51 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 52 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 53 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 54 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 55 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 56 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 57 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 58 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 59 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 60 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 61 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 62 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 63 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 64 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 65 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 66 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 67 प्रकरण ९ : अंतिम परिस्थिती (३) 68 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 1 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 2 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 3 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 4 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 5 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 6 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 7 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 8 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 9 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 10 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 11 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 12 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 13 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 14 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 15 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 16 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 17 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 18 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 19 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 20 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 21 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 22 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 23 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 24 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 25 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 26 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 27 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 28 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 29 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 30 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 31 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 32 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 33 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 34 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 35 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 36 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 37 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 38 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 39 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 40 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 41 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 42 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 43 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 44 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 45 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 46 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 47 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 48 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 49 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 50 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 51 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 52 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 53 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 54 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 55 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 56 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 57 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 58 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 59 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 60 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 61 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 62 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 63 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 64 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 65 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 66 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 67 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 68 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 69 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 70 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 71 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 72 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 73 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 74 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 75 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 76 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 77 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 78 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 79 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 80 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 81 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 82 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 83 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 84 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 85 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 86 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 87 प्रकरण १० : पुन्हा एकवार अहमदनगर किल्ला 88