Get it on Google Play
Download on the App Store

भारतीय संस्कृती 79

आज सर्व जगात हेच अधर्माचे अर्थशास्त्र अमलात आहे, म्हणून तर सर्वत्र विषमता आहे, म्हणून  दु:ख, दैन्य, दारिद्रय यांचा सुकाळ आहे. काही भांडवलवाले सर्व जगावर सत्ता गाजवीत आहेत. भारतीय संस्कृती ही गोष्ट सहन करणार नाही. भारतीय संस्कृती अद्वैतावर उभारलेली, समाजधारणेवर उभारलेली आहे.

''सर्वेऽत्र सुखिन: सन्तु
सर्वे सन्तु निरामया:
सर्वे भद्रणि पश्यन्तु ॥''


ही भारतीय संस्कृतीची ध्येये आहेत, एकाला सुखी करण्यासाठी, एकाला चैनीत लोळावयास मिळावे म्हणून लाखो लोकांनी कसे तरी कीडमुंगीप्रमाणे जगावे, मर मर मरावे, असे भारतीय संस्कृती सांगत नाही.

''अवघाचि संसार सुखाचा करीन ।
आनंदे भरीन तिन्ही लोक ॥''


ही भारतीय संतांची घोषणा आहे. सर्वांना सुखी व समृध्द करण्याचा झेंडा संतांनी खांद्यावर घेतला आहे. मजुरांना पशुंप्रमाणे गुलामांप्रमाणे वागवणारे दांभिक कारखानदार, शेतक-यांना पिळणारे दांभिक सावकार, कुळांना गांजणारे खोत व जमीनदार, आणि या पिळवणूकीला आर्शीवाद देणारे दांभिक संत; मंहत हे भारतीय संस्कृतीचे उपासक नाहीत. सनातन संस्कृती निर्मिली आहे. संकुचित व क्षुद्र वृत्तीच्या अनुदार लोकांना ती समजेल असे मला वाटत नाही. आज भारतीय संस्कृतीच्या नावाखाली मोठमोठ्या गप्पा मारणारे लोक विषमता नि:शंक पाहात आहेत. त्यांना त्याचे दु:ख नाही. श्रमहीन छळणा-या श्रीमंतांना त्यांचे शत आशीर्वाद आहेत. हे श्रीमंत किती जणांना रडवीत आहेत इकडे त्यांचे लक्ष नसते. ''भारतीय संस्कृती, भारतीय संस्कृती'' म्हणून गाजावाजा करणारे हे लोक भारतीय संस्कृतीचा वध करीत आहेत! संतांना व ऋषींना धुळीत मिळवीत आहेत! उपनिषदे व वेदान्त यांना मूठमाती देत आहेत ! भारतीय संस्कृतीचा आत्मा साम्यवादीचा ओळखू शकेल.

''दरिद्रान् भर कौन्तेय ''

असा महाभारतात अर्थशास्त्राचा सिध्दांत सांगितला आहे. जो दरिद्री आहे त्याचे भरण केले पाहिजे. जे खळगे असतील ते भरुन काढले पाहिजेत. परंतु एकीकडे खळगे भरुन काढावयास दुसरीकडच्या टेकड्या खणाव्या लागतील. आज समाजात एकीकडे पैशाचे ढीग आहेत आणि दुसरीकडे कवडीही नाही, हे पैशाचे ढींग सर्वत्र वाटून दिले पाहिजेत.

समाजातील संपत्तीची साधने समाजाच्या मालकीची हवीत. व्यक्तीची त्याची मालकी अपायकारक आहे. विशेषत: प्रचंड उत्पादनाची साधने तरी खाजगी असता कामा नयेत. याशिवाय समाजातील हे खळगे दूर करता येणार नाहीत. समाजात जी संपत्ती निर्माण होईल तिचे नीट विभाजन झाले पाहिजे.

आजपर्यंत जो तो आपल्या विशेष गुणधर्मांची विशेष किंमत करीत असे. परंतु कोणत्याही कर्माची, कोणत्याही कौशल्याची किंमत आपण कशी ठरविणार? मजुराच्या आठ तास अंग मोडून केलेल्या कामाची का दोन आणेच किंमत, आणि डॉक्टराच्या पाच मिनिटे भेटीची का तीन रुपये किंमत? कारकुनाच्या कामाची का महिना पंधरा रुपयेच आणि मामलेदाराच श्रमांची चारशे रुपये? प्राथामिक शाळेतील शिक्षकांच्या अध्यापनाची का वीस रुपये किमत, आणि प्रोफेसरांच्या प्रत्ययही दोन-तीन तास शिकविण्याची का हजार पाचशे किंमत? थंडीवा-यात, रात्री; बेरात्री दिवा दाखविणा-या रेल्वेच्या कामागाराची का दहा रुपये किंमत, आणि गाडीवरुन हिंडणार इंजिनियर त्याच्या श्रमांची का पाचशे रुपये किंमत? रस्ता झाडणा-याला महिना पाच रुपये आणि एका गवयाच्या तासभर गायनाला पाचशे रुपये?

भारतीय संस्कृती

पांडुरंग सदाशिव साने
Chapters
भारतीय संस्कृती 1 भारतीय संस्कृती 2 भारतीय संस्कृती 3 भारतीय संस्कृती 4 भारतीय संस्कृती 5 भारतीय संस्कृती 6 भारतीय संस्कृती 7 भारतीय संस्कृती 8 भारतीय संस्कृती 9 भारतीय संस्कृती 10 भारतीय संस्कृती 11 भारतीय संस्कृती 12 भारतीय संस्कृती 13 भारतीय संस्कृती 14 भारतीय संस्कृती 15 भारतीय संस्कृती 16 भारतीय संस्कृती 17 भारतीय संस्कृती 18 भारतीय संस्कृती 19 भारतीय संस्कृती 20 भारतीय संस्कृती 21 भारतीय संस्कृती 22 भारतीय संस्कृती 23 भारतीय संस्कृती 24 भारतीय संस्कृती 25 भारतीय संस्कृती 26 भारतीय संस्कृती 27 भारतीय संस्कृती 28 भारतीय संस्कृती 29 भारतीय संस्कृती 30 भारतीय संस्कृती 31 भारतीय संस्कृती 32 भारतीय संस्कृती 33 भारतीय संस्कृती 34 भारतीय संस्कृती 35 भारतीय संस्कृती 36 भारतीय संस्कृती 37 भारतीय संस्कृती 38 भारतीय संस्कृती 39 भारतीय संस्कृती 40 भारतीय संस्कृती 41 भारतीय संस्कृती 42 भारतीय संस्कृती 43 भारतीय संस्कृती 44 भारतीय संस्कृती 45 भारतीय संस्कृती 46 भारतीय संस्कृती 47 भारतीय संस्कृती 48 भारतीय संस्कृती 49 भारतीय संस्कृती 50 भारतीय संस्कृती 51 भारतीय संस्कृती 52 भारतीय संस्कृती 53 भारतीय संस्कृती 54 भारतीय संस्कृती 55 भारतीय संस्कृती 56 भारतीय संस्कृती 57 भारतीय संस्कृती 58 भारतीय संस्कृती 59 भारतीय संस्कृती 60 भारतीय संस्कृती 61 भारतीय संस्कृती 62 भारतीय संस्कृती 63 भारतीय संस्कृती 64 भारतीय संस्कृती 65 भारतीय संस्कृती 66 भारतीय संस्कृती 67 भारतीय संस्कृती 68 भारतीय संस्कृती 69 भारतीय संस्कृती 70 भारतीय संस्कृती 71 भारतीय संस्कृती 72 भारतीय संस्कृती 73 भारतीय संस्कृती 74 भारतीय संस्कृती 75 भारतीय संस्कृती 76 भारतीय संस्कृती 77 भारतीय संस्कृती 78 भारतीय संस्कृती 79 भारतीय संस्कृती 80 भारतीय संस्कृती 81 भारतीय संस्कृती 82 भारतीय संस्कृती 83 भारतीय संस्कृती 84 भारतीय संस्कृती 85 भारतीय संस्कृती 86 भारतीय संस्कृती 87 भारतीय संस्कृती 88 भारतीय संस्कृती 89 भारतीय संस्कृती 90 भारतीय संस्कृती 91 भारतीय संस्कृती 92 भारतीय संस्कृती 93 भारतीय संस्कृती 94 भारतीय संस्कृती 95 भारतीय संस्कृती 96 भारतीय संस्कृती 97 भारतीय संस्कृती 98 भारतीय संस्कृती 99 भारतीय संस्कृती 100 भारतीय संस्कृती 101 भारतीय संस्कृती 102 भारतीय संस्कृती 103 भारतीय संस्कृती 104 भारतीय संस्कृती 105 भारतीय संस्कृती 106 भारतीय संस्कृती 107 भारतीय संस्कृती 108 भारतीय संस्कृती 109 भारतीय संस्कृती 110 भारतीय संस्कृती 111 भारतीय संस्कृती 112 भारतीय संस्कृती 113 भारतीय संस्कृती 114 भारतीय संस्कृती 115 भारतीय संस्कृती 116 भारतीय संस्कृती 117 भारतीय संस्कृती 118 भारतीय संस्कृती 119 भारतीय संस्कृती 120 भारतीय संस्कृती 121 भारतीय संस्कृती 122 भारतीय संस्कृती 123 भारतीय संस्कृती 124 भारतीय संस्कृती 125 भारतीय संस्कृती 126 भारतीय संस्कृती 127 भारतीय संस्कृती 128 भारतीय संस्कृती 129 भारतीय संस्कृती 130 भारतीय संस्कृती 131 भारतीय संस्कृती 132 भारतीय संस्कृती 133 भारतीय संस्कृती 134 भारतीय संस्कृती 135 भारतीय संस्कृती 136 भारतीय संस्कृती 137 भारतीय संस्कृती 138 भारतीय संस्कृती 139 भारतीय संस्कृती 140 भारतीय संस्कृती 141 भारतीय संस्कृती 142 भारतीय संस्कृती 143 भारतीय संस्कृती 144 भारतीय संस्कृती 145 भारतीय संस्कृती 146 भारतीय संस्कृती 147 भारतीय संस्कृती 148 भारतीय संस्कृती 149 भारतीय संस्कृती 150 भारतीय संस्कृती 151 भारतीय संस्कृती 152 भारतीय संस्कृती 153 भारतीय संस्कृती 154 भारतीय संस्कृती 155 भारतीय संस्कृती 156 भारतीय संस्कृती 157 भारतीय संस्कृती 158 भारतीय संस्कृती 159 भारतीय संस्कृती 160 मातृभोजन गीत भारतीय संस्कृती 162 भारतीय संस्कृती 163 भारतीय संस्कृती 164 भारतीय संस्कृती 165 भारतीय संस्कृती 166 भारतीय संस्कृती 167 भारतीय संस्कृती 168 भारतीय संस्कृती 169 भारतीय संस्कृती 170 भारतीय संस्कृती 171 भारतीय संस्कृती 172 भारतीय संस्कृती 173 भारतीय संस्कृती 174 भारतीय संस्कृती 175 भारतीय संस्कृती 176 भारतीय संस्कृती 177 भारतीय संस्कृती 178 भारतीय संस्कृती 179 भारतीय संस्कृती 180 भारतीय संस्कृती 181 भारतीय संस्कृती 182 वाघ मानव परस्पर सबंधं निबंध